Live Now

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on OCTOBER 11 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
11 October 2025 06:40 PM (IST)

गोपीचंद पडळकरांचे जयंत पाटलांवर गंभीर आरोप

 

Gopichand Padalkar on Jayant Patil : भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. जयंत पाटलांनी मंत्री असताना अनेकांच्या जमिनी हडपल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत केलाय. या मुलाखतीत त्यांनी जयंत पाटलांनी हडप केलेल्या जमिनींच्या यादीचा पाढाच वाचला... सांगली जिल्ह्यातले व्यापारी रमेश पोरवाल यांचा मृत्यू बेळगावच्या रुग्णालयात झाला तेव्हा जयंत पाटील हेलिकॉप्टरनं बेळगावला गेले. तिथं त्यांनी रमेश पोरवालचे अंगठे घेऊन जमीन आणि शॉपिंग कॉम्लेक्स त्यांच्याकडून हडपल्याचा आरोप गोपिचंद पडळकरांनी केलाय. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

11 October 2025 02:04 PM (IST)

कोल्हापुरात बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त

 

Kolahapur : कोल्हापुरात बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त...एक कोटी 11 लाखांच्या बनावट नोटा जप्त...सांगली पोलिसांची मोठी कारवाई...-बनावट नोटा प्रकरणात एका पोलिसाचा सहभाग...पोलीस हवालदारासह 5 जणांना अटक...चहाच्या नावाखाली सुरु होता बनावट नोटा छापण्याचा कारखाना 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

11 October 2025 01:41 PM (IST)

मराठवाड्यात महायुतीत मिठाचा खडा?

Sanjay Shirsat : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा गटप्रमुख मेळावा पार पडला. यावेळी शिवसेनेतील नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. आगामी निवडणुका महायुती म्हणून लढायच्यात, मात्र काही जणांकडून आमचा छळकपट असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय. गेले काही दिवस महायूतीत अंतर्गत मतभेद पाहायला मिळत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत बरेच वाद पाहायला मिळत आहेत.. त्यामुळे शिरसाट यांचा रोख नेमका कुणाकडे याबाबत चर्चा रंगल्यात... तसंच मराठवाड्यात महायुतीत मिठाचा खडा पडला का अशी चर्चा रंगलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

11 October 2025 01:02 PM (IST)

जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा

 

Mumbai : जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा....राजकीय पक्ष काढतोय, कबुतर आमचं चिन्ह..बीएमसी निवडणुकीत उमेदवार उभे करणार...आमचा पक्ष भगवान महावीरांचा, राजकीय नाही...संत कधी कोणत्या पक्षाला पाठिंबा देत नाही...जैन मुनींकडून सरकारला दिवाळीपर्यंतचा अल्टिमेटम 

11 October 2025 12:13 PM (IST)

'एखाद दुसरा व्यक्ती मेला तर काय होतं?', कबुतरांवरून जैनमुनींचं वादग्रस्त विधान

 

Mumbai : कबुतरांच्या विष्ठेमुळे माणसं मरतात असं सांगणा-या डॉक्टरांना मूर्ख समजतो असं वक्तव्य जैनमुनी कैवल्य महाराज यांनी केलंय. मुंबईत कबुतरांसाठी धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी एखाद दुसरा व्यक्ती मेला तर काय होतं असंही या जैनमुनींनी म्हटलंय. तसंच या धर्मसभेला लोढा आले नाहीत ही सरकारची मिलीभगत असल्याचं वक्तव्य कैवल्य महाराजांनी केलंय. 

11 October 2025 11:33 AM (IST)

'प्राण्यांवर अत्याचार होत असेल तर..', कबुतरांवरुन जैन धर्मगुरुचं वादग्रस्त विधान

 

Mumbai : 'प्राण्यांवर अत्याचार होत असेल तर...'शस्त्र घ्यायला तयार आहोत- जैन धर्मगुरु..'साधू संतांनी फडणवीसांना सीएम बनवलं' कबुतरांवरुन जैन धर्मगुरुचं वादग्रस्त विधान

11 October 2025 11:11 AM (IST)

राज्यातील बोगस दिव्यांगावर होणार कारवाई 

 

Fake Handicap Certificate : भंडारा जिल्ह्यात शासकीय नोकरीत बोगस दिव्यांग आहेत... अशी बातमी झी 24 तासाने 27 मे रोजी दाखविली होती... या संदर्भात तत्कालीन पालकमंत्री यांनी चौकशीचे आदेश देत एका महिन्यात सर्वांची मेडिकल तपासणी करून कारवाईचे आदेश दिले होते... पण अद्यापही कारवाई करण्यात आली नव्हती... अनेकांनी शासकीय नोकरी मिळविण्यासाठी, बदलीत सूट घेण्यासाठी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलं होतं... ही बातमी झी 24 तासाने लावून धरली होती... आता 9 ऑक्टोंबरला शासन निर्णय काढण्यात आला आहे... आता राज्यभरातील सर्व विभागातील दिव्यांग प्रवर्गात नोकरीला असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी वैश्विक ओळखपत्र (UDID) अद्यावत करणे बंधनकारक आहे. जर मेडिकल तपासणीत 40 टक्क्यांपेक्षा कमी आढळून आले तर अशांवर कलम 91 नुसार शिस्त भंगाची कारवाई करण्यात यावी तसेच त्यांच्याकडून घेतलेल्या लाभाची वसुली करावी व तीन महिन्यात शासनाला तसा अहवाल सादर करावा असे आदेश दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी काढले आहे...तर स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी हा मुद्दा उचलून धरल्याबाबाद राज्य सरकारने याची दखल घेत आता खऱ्या दिव्यांगाला लाभ मिळणार आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

11 October 2025 10:41 AM (IST)

ठाण्यात मनसे, शिवसेना UBTचा एकत्र मोर्चा

 

Thane : ठाण्यात नागरिकांच्या समस्यांसंदर्भात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र मोर्चा काढणार आहे....येता 13 तारखेला मासुंदा तलाव ते ते महापालिका भवन मार्गावर असणार हा भव्य मोर्चा असेल..ठाणे शहरातील पाणी समस्या रस्त्यातील खड्डे आणि इतर नागरी सुविधांना अनुसरून असणार मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा एकत्र मोर्चा असेल..मोर्चासाठी दोन्ही पक्षाकडून चांगलीच तयारी करण्यात येत असून आज एक संयुक्त पत्रकार परिषद देखील दोन्ही पक्षांची पार पडली..या पत्रकार परिषदेत मनसे नेते अविनाश जाधव माजी आमदार राजू पाटील व माजी खासदार राजन विचारे उपस्थित होते..या मोर्चामध्ये आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व मनसे पक्षासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व काँग्रेस पक्ष सहभागी होणार का याकडे सर्वांचे लक्ष..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

11 October 2025 10:11 AM (IST)

कल्याणमध्ये सुरक्षारक्षकाकडून अल्पवयीन मुलीशी छेडछाड

 

Kalyan : कल्याणमध्ये एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये सुरक्षारक्षकाने एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केली. खडकपाडा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. इमारतीच्या लिफ्टकडे मुलगी येत असताना सुरक्षारक्षकानं अश्लील चाळे केले. या घटनेनंतर इमारतीतील संतप्त रहिवाशांनी सुरक्षारक्षकाला चोप दिला. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

 

11 October 2025 09:52 AM (IST)

मुंबईत आज भाजपचं मंथन

 

Mumbai BJP : भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू झालीय. मुंबईत आज महत्त्वाची बैठक बोलावलीय. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुकीबाबत मंथन होणारेय. बैठकीला कोकणातील नेते उपस्थित राहणारेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यावेळी मार्गदर्शन करणारेत. निवडणुका युती म्हणून एकत्र लढवाव्यात का? यावरही चर्चा होण्याची शक्यता आ

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

 

11 October 2025 09:07 AM (IST)

मविआ शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटणार

 

Mahavikas  Aghadi : मविआ शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटणार...14 ऑक्टोबरला निवडणूक आयुक्तांची भेट घेणार...शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेट घेणार...मनसे अध्यक्ष राज ठाकरेही शिष्टमंडळात सहभागी होणार...खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे......भेटीनंतर सर्व नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषदही होणार आहे 

11 October 2025 08:33 AM (IST)

शिवसेना UBTचा आज संभाजीनगरात हंबरडा मोर्चा 

 

Shivsena (UBT) : मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतक-यांसाठी ठाकरे मैदानात उतरले असून आज संभाजीनगरात शिवसेना UBTचा हंबरडा मोर्चा निघणार आहे..उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे...संभाजीनगरच्या क्रांती चौकातून सकाळी 11 वाजता हा मोर्चा निघणार आहे.. सरसकट कर्जमाफीसह शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी हा मोर्चा होत आहे... तसेच सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचा दावा पक्षाने केलाय... त्यामुळे आता शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत...दरम्यान ठाकरेंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंनी जोरदार टीका केलीय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

11 October 2025 08:03 AM (IST)

झेडपी, नगरपालिका निवडणुकीचा निर्णय दिवाळीनंतर?

 

Maharashtra Politics : आधी निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची घ्यायची की नगरपालिका, नगरपंचायतींची, याचा फैसला राज्य निवडणूक आयोग दिवाळीनंतर करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली... त्यामुळे आधी नगरपालिकांची निवडणूक होणार याबाबत तूर्त अनिश्चितता आहे...दिवाळीनंतर राज्य आयोग जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करेल... राज्यात अलीकडे झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेले अतोनात नुकसान या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आधी घेणे संयुक्तिक ठरेल का याबाबत आयोग जिल्हाधिकाऱ्यांची मते जाणून घेणार आहे... सध्या प्रत्येक जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, शेतकरी आणि सामान्य नागरिक हे अतिवृष्टी, महापुराच्या फटक्यातून किती प्रमाणात बाहेर आले आहेत, याचीही माहिती आयोग घेईल...दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबरला मुंबईतील मुख्यालयात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलविली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीबाबत आयोग कोणकोणती कार्यवाही करत आहे याची माहिती या प्रतिनिधींना बैठकीत दिली जाईल....

11 October 2025 07:39 AM (IST)

मुंबई-पुणे रेल्वे प्रवास आज खोळंबणार

 

Mumbai-Pune Railway : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी आज विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे
. या ब्लाॅकमुळे मुंबई – पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रगती, डेक्कन क्वीन, डेक्कन, इंटरसिटी, इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्यात. ब्लॉक कालावधीत नेरळ – कर्जत आणि कर्जत – खोपोली दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.तर, काही लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. या ब्लाॅकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची चिन्हे आहेत.

11 October 2025 07:37 AM (IST)

म्हाडाच्या 5,354 घरांची आज सोडत

 

Mhada Lottery : म्हाडा कोकण मंडळाच्या ठाणे आणि वसईतील 5 हजार 354 सदनिकांच्या विक्रीसाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संगणकीय सोडत काढली जाणार आहे. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सकाळी 11 वाजता संगणकीय सोडत काढली जाणारेय. तर ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 77 भूखंड विक्रीचीही सोडत यावेळी निघणार आहे. या सोडतीसाठी 1 लाख 84 हजार 994 अर्ज प्राप्त झाले असून, अनामत रकमेसह 1 लाख 58 हजार 424 अर्ज आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS: