Live Now

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on OCTOBER 17 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर
17 October 2025 06:12 PM (IST)

इंद्रनील नाईक गोंदियाचे नवे पालकमंत्री

 

Indranil Naik New Guardian Minister Of Gondia : इंद्रनील नाईक गोंदियाचे नवे पालकमंत्री...शासनाकडून शासन निर्णय जाहीर...बाबासाहेब पाटलांनी तब्येतीचं कारण देत पालकमंत्रिपदाचा दिला होता राजीनामा..गोंदियाचे नवे पालकमंत्री इंद्रनील नाईक असतील अशी घोषणा पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी केली होती...-त्यानंतर आज याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला...

बातमीचा व्हिडीओ पाहा : 

 

17 October 2025 05:12 PM (IST)

बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार

 

Beed OBC : मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या बालेकिल्ल्यात ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतोय...मराठा-कुणबी जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी समाज एकवटणार आहे...मेळाव्याला धनंजय मुंडे, लक्ष्मण हाकेंसह मोठे ओबीसी नेते उपस्थित आहेत...बीडच्या छत्रपती संभाजीनगर क्रीडांगणावर थोड्याच वेळात मेळाव्याला सुरुवात होणारय...दरम्यान ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असल्याचा निर्धार छगन भुजबळांनी व्यक्त केलाय...तर मराठा-कुणबी जीआरबाबत भुजबळांना काहीसा संभ्रम असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय.. 

17 October 2025 02:13 PM (IST)

आशिष शेलारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Ashish Shelar On Raj Thacekray & Uddhav Thacekray : भोंगे मुक्त मुंबईच्या घोषणेचं काय झालं... असा सवाल करत मंत्री आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.... टिळक भवनापर्यंत जाईपर्यंत घोषणेचा रंग बदलला का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला... भोंगे मुक्त मुंबई या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा पार पडला... यावेळी शेलारांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला...

17 October 2025 02:01 PM (IST)

मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली

Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती...मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलीय,. मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलीये... एडव्होकेट मंगेश ससाणे यांनी ही याचिका दाखल केलीये. मुंबई हायकोर्टाने मागच्या आठवड्यामध्ये हैदराबाद गॅझेटियरचा जीआर कायम राहणार असल्याचा मोठा निर्णय घेतला होता. याच निर्णयाला आव्हान करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. आता पुढील सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. 

17 October 2025 01:53 PM (IST)

तरुण मुलींनी जिमला जाऊ नये - पडळकर

Gopichand Padalkar : तरुण मुलींनी जिमला जाऊ नये, जिमला जाण्यापेक्षा घरीच योगा करा, असं वक्तव्य करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा बरळलेत. तर मुलींनी जिममध्ये जाण्यापूर्वी ट्रेनर पाहावा, असा अजब सल्ला पडळकरांनी दिलाय. आता पडळकरांच्या वक्तव्यानं ते पुन्हा वादात सापडण्याची शक्यताय. 

17 October 2025 01:41 PM (IST)

नेस्ले 16 हजार कर्मचा-यांना नारळ देणार 

Nestle - देशातील सर्वात मोठी फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुडस क्षेत्रातील कंपनी नेस्लेकडून कर्मचारी कपात केली जाणार आहे... कंपनी एकूण 16  हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याच्या तयारीत आहे... ही संख्या नेस्लेच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 6 टक्के आहेत. नेस्लेचे नवे सीईओ फिलिप नवरातिल यांच्याकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे...  फिलिप नवरातिल यांनी काहीच दिवसांपूर्वी नेस्ले कंपनीत पदभार स्वीकारला आहे. नवरातिल म्हणाले की संपूर्ण जग वेगानं बदलत आहे. नेस्लेला देखील याच वेगानं बदलावं लागेल. यासाठी काही कठोर आणि आवश्यक पावलं उचलावी लागणार आहेत. ते यासाठी तयार आहेत. नेस्लेनं दिलेल्या माहितीनुसार ही कर्मचारी कपात 2 वर्षाच्य कालावधीमध्ये पूर्ण होईल. लेऑफमध्ये 16 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जाईल. जागतिक स्तरावर कर्मचारी कपात केलील जाईल. म्हणजेच, नेस्ले जगातील त्यांच्या प्रत्येक शाखेतून कर्मचाऱ्यांना कमी करेल. व्यवस्थापनातील 12 हजार आणि सप्लाई चेन क्षेत्रातील 4000 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं जाईल.  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 October 2025 01:39 PM (IST)

ऐन दिवाळीत भाजीपाला महागला

Vegetable Price Hike : ऐन दिवाळीच्या तोंडावर भाजीपाला महागलाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांत भाजीपाल्यांच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणात सडल्यान बाजारात आवक घटली. त्यातच वाहतुकीतील अडथळ्यांमुळे बाजारात शेतमाल पोहोचण्यास विलंब होत असल्याने बाजारातील मागणीपेक्षा पुरवठा कमी झालाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 October 2025 11:47 AM (IST)

विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर आरोप

Vijay Wadettiwar : सरकारनं शेतक-यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय.. दिवाळीपूर्वी मदत मिळेल असं आश्वासन सरकारनं दिलं होतं मात्र अद्यापही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला नसल्याची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय... कापूस खरेदीतही सरकारनं हात आखडता घेतलाय. त्यामुळे शेतक-यांनी दिवाळीच्या दिवशी एक तास दिवे बंद करुन सरकारचा निषेध करावा असं आवाहन त्यांनी राज्यातील शेतक-यांना केलंय..

17 October 2025 10:25 AM (IST)

मेट्रोमध्ये झोपाल तर दंड भरावा लागणार

Dubai Metro Rule : कुठल्याही वाहनानं प्रवास केला तरी डुलकी लागतेच.. त्यात वातानुकूलित यंत्रणा असलेल्या मेट्रोतून प्रवास करताना झोप आली नाही तरच नवल.. पण आता मेट्रोत झोपाल तर दंड भरावा लागणार आहे. दुबईच्या रस्ते आणि वाहतूक प्राधिकरणानं तत्काळ नवी मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. त्यानुसार दुबई मेट्रोमध्ये झोपल्यास 100 'दिरहम' म्हणजे साधारण अडीच हजार इतका दंड ठोठावला जाईल. काही प्रवासी मेट्रोच्या डब्यांमध्ये जमिनीवर बसतात, आडवे होतात, गेटसमोर उभे राहतात, बसतात किंवा सीटवर पाय ठेवतात, अशी कुठलीही कृती केल्यास त्या प्रवाश्यावर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 October 2025 10:11 AM (IST)

दिवाळीनिमित्त डबेवाल्यांची सेवा तात्पुरती बंद

Dabewala Service : मुंबईतील ठिकठिकाणच्या कार्यालयांमध्ये जेवणाचे डबे पुरविणारे डबेवाले दिवाळीनिमित्त रजेवर जाणारेत. येत्या 20  ऑक्टोबरपासून डबेवाले पाच दिवसांच्या रजेवर असतील. दिवाळीला डबेवाल्यांनी गावी जाण्याचा नियोजन आखलंय. त्यामुळे दिवाळीत डबेवाल्यांची सेवा तात्पुरती बंद राहणारेय. 20 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत डबेवाल्यांची सेवा बंद राहणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 October 2025 10:09 AM (IST)

राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिलेंचं निधन

Shivajirao Kardile : राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं आहे... वयाच्या 67व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालंय..2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला होता... शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे...कर्डिले यांनी सरपंच म्हणून आपली राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती..राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही ते काही काळ कार्यरत होते... 2009ला त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली....2009ते 2014 असे 10 वर्षे त्यांनी राहुरीचं प्रतिनिधित्व केलं होतं... 2019 ला राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला होता... मात्र 2024च्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवाजी कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरेंचा पराभूत केलं होतं..  

17 October 2025 09:42 AM (IST)

भास्कर जाधवांचं निवडणुकीबाबत मोठं विधान

Bhaskar Jadhav On Election : सरकारबद्दल राज्यात प्रचंड असंतोषाचं वातावरण असल्याचं भास्कर जाधवांचं म्हणणं आहे. प्रत्येक टप्प्यावर सर्वच स्तरातल्या मतदारांना फसवून मतदान घेतलं मात्र आता मतदार जागरूक झालाय,त्यामुळे या निवडणुका सरकारला जड जाणार याची कल्पना असल्यामुळे निवडणुका होतील की नाही याबाबत शंका असल्याचं भास्कर जाधवांनी मोठं विधान केलंय. पक्ष चोरले, निशाणी चोरली,आमदार चोरले,नेते चोरले....आता काय चोरायचं म्हणून मतदार चोरले असा सवाल उपस्थित करत राज्यात असे चोर ठेवायचे का हा विचार मतदारांनी करण्याची गरज भास्कर जाधवांनी व्यक्त केलीय

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 October 2025 09:27 AM (IST)

दिवाळी पार्श्वभूमीवर FDAची राज्यात कारवाई

FDA Raid : 'सण महाराष्ट्राचा - संकल्प अन्नसुरक्षेचा' अभियानांतर्गत अन्न व औषध प्रशासनाने  राज्यभर धडक कारवाई सुरू केलीय.. ११ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर या कालावधीत घेतलेल्या तपासणी मोहिमेत दूध, खाद्यतेल, तूप, खवा-मावा, मिठाई, ड्रायफ्रूट्स, चॉकलेट्स, भगर आणि इतर अन्नपदार्थांचे एकूण ४,६७६ नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले. त्यापैकी ९१८ नमुने प्रमाणित, ५१ कमी दर्जाचे, १६ असुरक्षित आणि आठ खोटे लेबल असलेले पदार्थ आढळले. जवळपास ८ लाख ३ हजार ९४२ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, अहवालांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही मोहीम दिवाळीपर्यंत म्हणजे २५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

17 October 2025 09:01 AM (IST)

चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक

Silver Rate : गेले काही दिवस सातत्याने वाढत असलेल्या चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागलाय...गुरुवारी चांदीच्या दरात तब्बल 10 हजार 300 रुपयांची घसरण झाली आहे...त्यामुळे चांदी प्रतिकिलो 1 लाख 80 हजारांपर्यंत खाली आली आहे... तर सोन्याच्या दरात मात्र दरवाढ कायम आहे... सोने काल दिवसभरात 721 रुपयांच्या वाढीसह 1 लाख 32 हजारांवर पोहोचले आहे...

17 October 2025 08:57 AM (IST)

सोनं खरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल

 

Gold Rate : सोन्याच्या किमती दिवसागणिक नवा उच्चांक गाठत असल्या, तरी ग्राहकांच्या सोने खरेदीच्या उत्साहात मात्र तसूभरही फरक पडला नसल्याचे चित्र आहे... ग्राहकांच्या सोने खरेदीच्या पॅटर्नमध्ये बदल होतो आहे... सोन्याच्या दागिन्यांऐवजी ग्राहक आता सोन्याचे बार आणि नाणी यांच्या खरेदीवर भर देत असल्याचे दिसून येत आहे...सराफा व्यावसायिकांच्या अंदाजानुसार यंदा दिवाळीत 20 टक्के सोने विक्रीचा अंदाज आहे...  

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author