)
MNS on 1st November Morcha : मुंबईत 1 नोव्हेंबरला काढण्यात येणा-या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. तसंच या मोर्चात नागरिकांनीही मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन बाळा नांदगावकर यांनी केलं. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं बाळा नांदगावकर तब्बल 20 वर्षांहून जास्त कालखंडानंतर शिवसेना भवनात दाखल झाले.
Sanjay Raut on 1st November Morcha : मविआसह मनसेनं निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारलाय... निवडणूक आयोगानं मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त कराव्यात असं आवाहन पुन्हा एकदा मविआसह मनसेनं केलंय.. निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिलीय.. तसेच निवडणूक आयोगाला दणका देणारचं असा इशाराही संजय राऊतांनी दिलाय.
Raj Thackeray : सत्ताधारी पक्षाचे आमदार भर सभेत मतदारांचा अपमान करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. एक आमदार जाहीर भाषणात म्हणतो, मी 20 हजार मतदार बाहेरून आणलेत...तुम्हाला आकडेवारी जुळवून सत्ता मिळवायची असेल तर निवडणुका हव्यातच कशाला असा सवाल त्यांनी सत्ताधा-यांना विचारलाय. यावेळी त्यांनी विलास भुमरेंचा व्हिडिओही लावला..
Raj Thackeray : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला खुलं आव्हान दिलं आहे.... जोपर्यंत मतदार यादीतील घोळ दूर होत नाही आणि यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा, असे राज ठाकरे यांनी मेळाव्यात सांगितले....तसेच मनसैनिकांनाही मतदार यादीतील घोळ समोर आणण्याच्या सूचना केल्या असून मतदारांनाही सतर्क राहण्याचं आवाहन केलंय..
Washim : वाशिम जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय.. गेल्या दोन महिन्यांत झालेल्या विक्रमी पावसाने वाशिम जिल्ह्यात अक्षरशःधुमाकूळ घातला... या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन,कपाशी,तूर आणि मूग या पिकांसह फलबागाचं नुकसान झालं.. तर शेतात पाणी साचल्याने अनेक पिकं नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यातून वाचू शकली नाहीत... विशेषतः तुरीच्या पिकावर या अतिवृष्टीचा गंभीर परिणाम झालाय.. शेतात निर्माण झालेल्या अतिओलाव्यामुळे तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय... त्यामुळे तुरीचे पीक कोमेजत असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Sachin Sawant : काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर राष्ट्रवाद आणि धर्माच्या नावाखाली सत्तेचे राजकारण केल्याचा गंभीर आरोप केलाय. मेट्रो-३च्या स्थानकांना नाव देताना भाजपनं राष्ट्राच्या देवता, पूजनीय व्यक्ती आणि महानायकांच्या प्रतिष्ठेचे व्यापारीकरण केल्याचा आरोप सावंत यांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नावाला खासगी कंपनीचे नाव जोडल्यानं सावंत यांनी आक्षेप घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला कॉर्पोरेट नाव जोडणे योग्य आहे का? हा आपल्या अभिमानाचा आणि इतिहासाचा अपमान नाही का? असा सवाल सचिन सांवत यांनी केलाय
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Nilesh Ghaywal : पुण्यातील कोथरुड गोळीबार प्रकरणानंतर गुंड निलेश घायवळवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झालेत. मकोकासह खंडणी उकळल्याचाही गुन्हा घायवळवर दाखल झालाय.. या 10 पैकी 8 गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात तर वारजे आणि सिंहगड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Maharashtra Olympic : राज्य ऑलिम्पिक संघटना निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून अध्यक्षपदासाठी आता अजितदादा विरुद्ध मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत होणार आहे...उमेदवारी अर्ज माघारीची मुदत काल संपली..यामध्ये कुणीही माघार घेतलेली नाही...त्यामुळे आता अजितदादा आणि मुरलीधर मोहोळ यांची राजकीय कुस्ती होणार असून 2 नोव्हेंबरला एमओएचा पैलवान नक्की कोण असणार आहे हे स्पष्ट होणार आहे...सोबतच वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी दोन तर उपाध्यक्षपदासाठी 4 उमेदवार मैदानात आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
IMD Rain Alert : ऐन दिवाळीत राज्यात पावसाची शक्यता आहे...पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे..हा पाऊस सर्वत्र नसणार आहे..मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहील... त्यामुळे रात्रीचे तापमान ऊबदार असेल, तर दिवसाचे तापमान तुलनेत कमी असणार आहे... महामुंबई परिसरातही मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय...आजपासून मुंबईच्या तापमानात काहीशी घट होणार आहे...त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळेल...मात्र पावसाच्या शक्यतेमुळे ऐन दिवाळीच्या उत्सवावर पाणी फिरण्याची शक्यता आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा
Uday Samant : रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीतून शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी महायुतीच्या मित्रपक्षांना धमकीवजा इशारा दिलाय.. महायुती म्हणून निवडणूक लढायचीय. मात्र कुणाला खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवून असा इशारा सामंतांनी दिलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Nashik : नाशिक शहरात पुढील वर्षी होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यात वैदिक विधींसाठी प्रशिक्षित पुरोहित मोठ्या प्रमाणात लागणार आहेत. ते उपलब्ध व्हावेत म्हणून सरकारतर्फे नाशिकची औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI मध्ये ‘वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट’ हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. अल्पमुदतीच्या या रोजगारक्षम अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आधुनिक तंत्रशिक्षणासोबत आध्यात्मिक ज्ञानाचा संगम घडवण्याचा हा प्रयत्न आहे. याला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी विरोध केलाय. तसंच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील स्थानिक पुरोहितांनी विरोध दर्शवला आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Nagarpalika Election : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे...त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता...त्यात 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे...निवडणूक आयोगाने तीन टप्प्यात निवडणुकांची तयारी केली असल्याची माहिती आहे...त्यानुसार आधी नगरपालिका, नंतर जिल्हा परिषद आणि सर्वात शेवटी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -