Live Now

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on OCTOBER 20  महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
20 October 2025 06:14 PM (IST)

परभणीत तरुणीवर सामूहिक अत्याचार...

परभणीत तरुणीवर सामूहिक अत्याचार

Parbhani Rape : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील भोगावमध्ये 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आलीय. इटोली शिवारात हा प्रकार घडलाय. पोलिसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतलंय. त्यात एका अल्पवयीन आरोपीचादेखील समावेश आहे. या प्रकरणात पोलीस चौकशी करीत आहे.

20 October 2025 02:29 PM (IST)

परांडा नगरपरिषदेत बोगस मतदार नोंदणी?...

परांडा नगरपरिषदेत बोगस मतदार नोंदणी?

 

Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील परांडा नगरपरिषदेत बोगस मतदार नोंदणीचा एक गंभीर आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. परांडा नगरपरिषद क्षेत्रातील एका घराच्या पत्त्यावर हिंदू, मुस्लिम, दलित, माळी, ब्राह्मण अशा विविध जाती-धर्मांच्या 37 व्यक्तींची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर यामध्ये उत्तर प्रदेशातून आलेल्या पाच मजुरांचाही समावेश असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ज्या घराचा हा पत्ता वापरण्यात आला आहे, ते घर शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचे असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अरबाज पठाण यांनी केलाय.  

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

20 October 2025 01:43 PM (IST)

 छ. संभाजीराजे सासरच्यांकडून मारले गेले, बच्चू कडूंचं ...

 'छ. संभाजीराजे सासरच्यांकडून मारले गेले', बच्चू कडूंचं वादग्रस्त विधान

 

Bachu Kadu : 'छत्रपती संभाजीराजे सासरच्यांकडून मारले गेले'...'औरंगजेब मात्र उगाच बदनाम झाला'... वतनदारी बंद केली म्हणून राजे मारले गेले' ...माजी मंत्री बच्चू कडू यांचं वादग्रस्त विधान

20 October 2025 01:11 PM (IST)

पराभव दिसू लागल्यानं महायुतीवर आरोप, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला...

'पराभव दिसू लागल्यानं महायुतीवर आरोप', एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला

 

Eknath Shinde : राज ठाकरेंनी निवडणुक आयोगाला इशारा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलंय. आधी निवडणुका लवकर घ्या म्हणणारे आता निवडणुका पुढे ढकलण्याची भाषा करतायत असा टोला शिंदेंनी राज ठाकरेंना लगावलाय.. पराभव दिसू लागल्याने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करत असल्याचं शिंदेंनी म्हटलंय.. पराभव दिसायला लागल्यावर महायुतीवर आरोप करण्यात येतायत असंही शिंदेंनी म्हटलंय.. जोपर्यंत मतदार यादीतील घोळ दूर होत नाही आणि यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा, अशा इशारा राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिला होता...

20 October 2025 12:38 PM (IST)

त्या 200 दिवसांत दोनदा मरता मरता वाचलो- धनंजय मुंडे ...

त्या 200 दिवसांत दोनदा मरता मरता वाचलो- धनंजय मुंडे 

 

Dhananjay Munde : त्या दोनशे दिवसांत दोनदा मरता मरता वाचलो अशी भावनिक प्रतिक्रिया माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलीय.. जनतेच्या आशीर्वादामुळे जिवंत असल्याचं मुंडेंनी म्हटलंय. मिळालेल्या मंत्रिपदाचा आनंदही घेता आला नसल्याची खंतीही मुंडेंनी व्यक्त केलीय. 

20 October 2025 12:11 PM (IST)

सप्तश्रृंगी देवीचं मंदिर रात्री 12पर्यंत खुलं राहणार...

सप्तश्रृंगी देवीचं मंदिर रात्री 12पर्यंत खुलं राहणार

 

Vani Saptashrungi Temple : वनी गडावरील सप्तश्रृंगी देवीचं मंदिर दर्शनासाठी रात्री 12वाजेपर्य खुलं राहणार आहे.. 22 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर खुलं राहणार आहे.. तसंच रोप वे ट्रॉलीची सुविधा देखील पहाटे 5 ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे...दिवाळीत भाविकांची गर्दी वाढल्याने मंदिर प्रशासनाने याबाबतचा निर्णय घेतलाय....
 

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

 

20 October 2025 11:17 AM (IST)

स्वतःला संपवण्यापेक्षा आमदाराला संपवा, बच्चू कडूंचा संताप...

'स्वतःला संपवण्यापेक्षा आमदाराला संपवा', बच्चू कडूंचा संताप

 

 

Bachu Kadu : बुलढाण्यातील पातुर्डा गावात रविवारी राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली... या परिषदेत बच्चू कडू यांनी सरकारवर घणाघाती टीका केलीय...राज्यातील शेतक-यांच्या अधोगतीला सरकारच जबाबदार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय...तसेच शेतकरी आत्महत्येवरूनही प्रचंड संताप व्यक्त केलाय.. अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला संपवा असा सल्लाच बच्चू कडूंनी शेतक-यांना दिलाय... तर शेतकरी प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये...सर्वांनी शेतक-यांसाठी काम केलं पाहिजे असा सल्ला कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दिलाय...

 

20 October 2025 10:42 AM (IST)

गुवाहाटीला जाऊन आलेले लोक नरकासूर- संजय राऊत...

गुवाहाटीला जाऊन आलेले लोक नरकासूर- संजय राऊत
 

Sanjay Raut : पोटदुखी'वरून दोन्ही शिवसेनेत खडाजंगी...एकनाथ शिंदेंची टीका, संजय राऊतांचा पलटवार...'गुवाहाटीला जाऊन आलेले नरकासूर आहेत'...संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल...नरकासूराप्रमाणे यांचाही अंत होईल-राऊत...गुवाहाटीला जाऊन आलेल्यांना जनता चिरडून टाकेल- राऊत...दरम्यान शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या पोटात दुखतंय अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली होती त्याला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय... 

20 October 2025 10:13 AM (IST)

बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले अटकेत...

बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले अटकेत

Ranjit Kasale : बीड जिल्ह्यातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले यास गुजरात पोलिसांनी लातूरमधून ताब्यात घेतले. सुरत परिसरातील जबरी घरफोडी प्रकरणातील आरोपींकडून कासले यांचे नाव समोर आल्यानंतर गुजरात पोलिसांनी दोन दिवस शोध मोहीम राबवली होती. एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने कासले यास रात्री अटक करून गुजरातला रवाना करण्यात आले. अटकेनंतर रणजित कासलेनं पुष्पा स्टाईल केल्याचं पाहायला मिळालं.. कासलेवर आधीही गुन्हे दाखल आहेत. आता नविन गुन्हेत वाढ झाली आहे. अटक होत असतानाच कासले यांनी माध्यमांसमोर ‘बॉसला अटक झाली आहे असं बोलले त्यांनंतर पोलिसांनी त्यांना गाडीत बसवून तातडीने रवाना केलं...

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

 

20 October 2025 09:38 AM (IST)

निवडणुकांआधी महायुतीत नाराजी सूर- सूत्र...

निवडणुकांआधी महायुतीत नाराजी सूर- सूत्र

 

Shivsena : निवडणुकांवरुन महायुतीत नाराजीचा सूर उमटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेना पदाधिका-यांकडून स्वबळाची मागणी होत असल्याची माहिती मिळतेय. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत हा नाराजीचा सूर उमटलाय.. नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद विभागातील पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, वसई-विरार आणि भिवंडी महानगरपालिकांमध्ये शिवसेना-भाजप युतीबाबत संभ्रम कायम आहे. भाजप नेते संजय केळकर, गणेश नाईक आणि इतर नेत्यांच्या स्वतंत्र लढतीच्या वक्तव्यांमुळे शिवसेनेकडूनही खबरदारी म्हणून स्वबळाची तयारी सुरू असल्याची माहीती मिळतेय.. मुंबई वगळता इतर जिल्ह्यांत मतभेद कायम असल्याचीही माहीती मिळतेय. 

20 October 2025 09:05 AM (IST)

मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली...

मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली

 

Mumbai : सगळीकडे दिवाळीचा जल्लोष साजरा होत असतानाच हवा प्रदूषणामुळे मुंबईकरांची चिंता वाढवली आहे..रविवारी मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता प्रचंड घसरली होती..बहुतांश भागातील हवा धोकादायक श्रेणीत पोहोचली होती.. मालाड, नेव्हीनगर,माझगाव हे हवा प्रदूषणाचे हॉटस्पॉट ठरलेत..मुंबई शहराचा एक्यूआय थेट 172 अंकांवर पोहोचला होता...त्यामुळे प्रदूषणकारी फटाके फोडणे टाळण्याचा सल्ला हवामानतज्ञांनी दिलाय... 

20 October 2025 08:49 AM (IST)

पुण्यात लक्ष्मीपूजनानिमित्त मेट्रो सेवेत बदल ...

पुण्यात लक्ष्मीपूजनानिमित्त मेट्रो सेवेत बदल 

 

Pune : पुण्यात लक्ष्मीपूजनानिमित 21 ऑक्टोबरला पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. संध्याकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार आहे. २२ ऑक्टोबरपासून मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होईल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. पुणे मेट्रो प्रशासनाने गैरसोयीबद्दल दिलगीर असल्याचेही जाहीर केले आहे

20 October 2025 08:01 AM (IST)

राज्यातून 2 कोटींचे भेसळयुक्त पदार्थ जप्त ...

राज्यातून 2 कोटींचे भेसळयुक्त पदार्थ जप्त 

 

State : दिवाळीत खाद्यपदार्थांमध्ये मोठी भेसळ करण्यात येते..त्याविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभरात मोहीम राबवलीये..अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 'सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षितते'चा या अभियानांतर्गत राज्यभरात ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 353 अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून त्यातील 196 आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आलीये...या कारवाईत 2 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आलेत.. यात खवा, गायीचं तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, बटर, वनस्पती तूप, भगर या पदार्थांचा समावेश आहे..

Add Zee News as a Preferred Source
TAGS: