)
Nashik Police : नाशिकमध्ये पोलिसांना आव्हान देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी दिला चोप.. सीपीकडे जा नाहीतर एसीपी कडे जा काही फरक पडत नाही म्हणणाऱ्या तरुणाचा जिरावला माज.. परिसरात भांडण करून दहशत निर्माण करण्याचा करत होता प्रयत्न.. पोलिसांना घाबरत नसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी उतरवला माज.
MCA President Election : एमसीएच्या अध्यक्षपदाची 12 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे.. निवडणुकीपूर्वी एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात बैठक पार पडली.. वानखेडे स्टेडियम येथील गरवारे क्लब येथे 20 मिनिटं बैठक पार पडली.. मागील निवडणुकीत शरद पवार यांचं पॅनल आणि आशिष शेलार यांचं पॅनेल ऐनवेळी एकत्रित आलं होतं...यंदाच्या निवडणुकीत दोन्ही एकत्रित येणार की वेगळा निर्णय घेणार याकडे लक्ष.
Electricity Concession for Fishermen : फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय.. शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना ही मिळणार वीज सवलत.. मंत्री नितेश राणेंच्या मागणीनुसार शासनाकडून निर्णय जारी.. मस्त्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यामुळे वीज सवलत लागू.. मच्छीमार, मस्त्य संवर्धक, मस्त्य व्यवसायिक यांना सवलत लागू.. मस्त्य व्यवसाय प्रकल्पांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत लागू करण्याचा सरकारचा निर्णय.. सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाची एनएफडीबी अंतर्गत नोंदणी आवश्यक.
Satara Suicide Update : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी झी २४ तासच्या बातमीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाई केलीय. संबंधित पोलीस अधिका-याचं निलंबन करण्यात आलंय. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सातारा पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली. यानंतर संबंधित पोलिसाला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही फडणवीसांनी दिलेत.
Satara Suicide Update : साता-यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्याप्रकरणी आताची सगळ्यात मोठी बातमी.... साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावरच त्यांनी आत्महत्येचे कारण लिहिले असल्याचे समोर आले असून, त्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Himalaya : भारतातील अनेक शहरांवर पुराचा धोका निर्माण झालाय... भविष्यात अनेक शहरं बुडणार का अशी भीती व्यक्त होतेय. कारण हवामान बदलामुळे हिमालयातील जलसाठ्यांत 14 वर्षात 9.24 टक्क्यांनी वाढ झालीये... केंद्रीय जल आयोगाने ऑगस्टच्या मासिक अहवालात ही माहिती दिली आहे. ग्लेशियर लेकमधील जलसाठ्यांचे एकूण क्षेत्रफळ 2011 मध्ये 5.30 लाख हेक्टर होते. ते 2025 मध्ये 5.79 लाख हेक्टर झालंय. केंद्रीय जल आयोगाने इशारा दिला आहे की, ग्लेशियर लेकची संख्या आणि त्याचं क्षेत्रफळ वाढल्याने त्यांच्यापासून येणा-या पुराचा धोकाही वाढतो. असे पूर कधी येतील याबद्दल अचूक अंदाज व्यक्त करणे शक्य नाही. त्यामुळे ग्लेशियर लेकच्या स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे लागतं...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Bhandara Chandrashekhar Bawankule : भंडाऱ्यातील सर्व कार्यकर्त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत असं वक्तव्यही बावनकुळे यांनी केलं. भंडाऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं. भाजपमध्ये आपल्याला एकही बंडखोरी नको, एक जरी बंडखोरी झाली किंवा चुकीचं बटन दाबलं तर सत्यानाश होईल असं राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. जर कुणी बंडखोरी केलीच तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे पाच वर्षांसाठी बंद होतील असा इशाराही त्यांनी दिला.
बामतीचा व्हिडीओ पाहा -
Pimpri-Chichwad : पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना घडलीय... पतीच्या सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पत्नीने गळा आवळून पतीची हत्या केली.. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय... नकुल आनंद भोईर असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, चैताली भोईर असं हत्या करणा-या पत्नीचं नाव आहे.... या दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला.... यावेळी हा वाद विकोपाला गेल्याने रागाच्याभरात पत्नीने पतीचा कापडाने गळा आवळून खून केला....याप्रकरणी पोलिसांनी चैताली भोईर हिला तात्काळ ताब्यात घेतलं असून पोलीस अधिक तपास करतंय..
Mumbai-Pune Express Way : सध्या सहा पदरी असलेला मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे आता दहा पदरी करण्यात येणार आहे... महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याबाबत निर्णय घेतला असून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येत आहे... येत्या १० दिवसांत हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे... महामार्गाचे दहा पदरीकरण झाल्यास मुंबई-पुणे प्रवास वाहतूक कोंडीमुक्त आणि अतिजलद होण्यास मदत होईल..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thane : दिवाळीत ठाणेकरांनी सोनं-चांदीच्या खरेदीला मोठी पसंती दिलीये...दिवाळीत ठाण्यात 70 कोटींची सोनं-चांदीची दागिन्यांची उलाढाल झालीये..यात धनत्रयोदशीला सर्वाधिक विक्री झाली असून ठाणेकरांनी सोनं ऐवजी चांदी खरेदीला अधिक महत्त्व दिलंय.. ठाणे ज्वेलर्स असोसिएशने याबाबतची माहिती दिलीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Indian Military : भारतातील तिन्ही दलांची युद्धक्षमता वाढणार आहे.. युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने तब्बल 79 हजार कोटींच्या शस्त्रास्त्र आणि लष्करी हार्डवेअर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीये..यात नाग क्षेपणास्त्र, युद्धनौका, हेरगिरी करणारी अद्यावत उपकरणांचा समावेश आहे.. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत या खरेदी प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Shivsena UBT Melava : सोमवारी वरळी डोम इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आदित्य ठाकरे बोगस वोटिंग बॉम्ब फोडणार आहेत.... दिल्लीत राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे सादरीकरण केलं अगदी तशाच प्रकारे मुंबईतील मतदार यादीतील घोळाचा सादरीकरण आदित्य ठाकरे करणार आहेत.. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केलीये.. त्यात प्रचंड घोळ असून तो कशा पद्धतीने करण्यात आला? आणि आगामी महापालिका निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची आहे याचं मार्गदर्शन आदित्य ठाकरे सोमवारच्या मेळाव्यात करणार आहेत. या निर्धार मेळाव्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील नेते विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख हे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत... पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करतील..
Ulhasnagar : उल्हासनगरातील कॅम्प नंबर तीन परिसरात एका तरुणानं गाड्यांची तोडफोड केलीये. कनवाराम चौकात रात्री दारुच्या नशेत या तरुणानं गाड्यांची ही तोडफोड केलीये. हा तरुण हातात दारूची बाटली घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या बाईक लोटून देत असतानाचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलाय. या तरुणाने नागरिकांच्या घराबाहेर ठेवलेल्या कुंड्यांचेही तोडफोड केलीये... सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत..
Ravindra Dhangekar : कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन होस्टेल खरेदी प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप केला होता.. यानंतर आता धंगेकरांनी नवीन आरोप केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये.. मोहोळ हे पुण्याचे महापौर असताना ते बिल्डर बढेकरांची गाडी वापरत होते.. असा गौप्यस्फोट धंगेकरांनी केलाय...याच बडेकर बिल्डरनं जैन बोर्डिंगची जमीन खरेदीसाठी दुस-या क्रमांची बोली लावली होती..तसंच कोथरुड भागात पुनर्विकासाचे अनेक प्रोजेक्ट बढेकर बिल्डरकडे आहेत..असंही धंगेकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.. याच बरोबर बढेकर कंपनीत दमदाटी करून त्यावेळी त्यांनी पार्टनरशीप मिळवल्याचा आरोपही धंगेकरांनी केलाय...