Live Now

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on OCTOBER 31 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर
31 October 2025 06:27 PM (IST)

'डॉक्टर तरुणी मृत्यूप्रकरणी SIT नेमा', मुख्यमंत्र्यांचे डीजीपींना आदेश

 

Devendra Fadnavis : फलटण प्रकरणातील डॉक्टर तरुणी मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी, SIT नेमली जाणार आहे. महिला IPS अधिका-याच्या नेतृत्त्वात SIT गठीत करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिले आहेत. 

31 October 2025 05:28 PM (IST)

'बच्चू कडू एकनाथ शिंदेंसोबत दिसतील',आमदार रवी राणांचा दावा

 

Ravi Rana on Bacchu Kadu : बच्चू कडू थोड्याच दिवसात एकनाथ शिंदेंसोबत दिसतील असा मोठा दावा आमदार रवी राणा यांनी केलाय...कालच्या बैठकीदरम्यान शिंदेंसोबत जे वीस पंचवीस मिनिट बच्चू कडूशी बोलणं झालं..त्यात त्याचं ठरल्याचा दावा रवी राणा यांनी केलाय...या आंदोलनामध्ये शेतक-यांना फक्त वेठीस धरून बच्चू कडूंनी आपला राजकीय रोट्या शेकल्याचा आरोपही रवी राणा यांनी केलाय...

31 October 2025 04:46 PM (IST)

मविआसह इतर पक्ष हायकोर्टात जाणार

Mahavikas Aghadi : उद्याच्या सत्याचा मोर्चानंतर मविआ आणि सहयोगी पक्ष मतदार यादी घोळासंदर्भात कोर्टाचे दरवाजे ठोठावणार...मतचोरीच्या मुद्यावर रस्त्यावर आणि न्यायालयातही लढाई लढण्याची विरोधी पक्षांची तयारी

31 October 2025 04:22 PM (IST)

राज ठाकरे यांना अटक करा- गुणरत्न सदावर्ते

 

Gunaratna Sadavarte : राज ठाकरे यांना अटक करा'....'उद्याच्या मोर्चाच्या आधी अटक करा'...वकील गुणरत्न सदावर्तेंची मागणी 

 

31 October 2025 01:17 PM (IST)

कार्तिकी एकादशी यात्रेसाठी विठ्ठल मंदिर सज्ज

Padharpur : रविवारी कार्तिकी एकादशी आहे.. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरी वारक-यांनी गर्दीनं फुलून गेलीय. मात्र यंदा राज्यात काही भागात अतिवृष्टी आणि महापूर यामुळे मोठं नुकसान झालंय. त्यामुळे वारक-यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यात्रा कालावधीत भाविकांना दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून दर्शनमंडपाची निर्मिती करण्यासह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावं, यासाठी प्राधान्य दिलंय. त्यासाठी अनुभवी अडीच हजार स्वयंसेवक आणि सुरक्षारक्षकांची नियुक्ती केलीय. 125 सीसीटीव्ही कॅमेरेही लावले आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

31 October 2025 12:37 PM (IST)

पवईतील रोहित आर्य एन्काऊंटरवरुन वाद

Powai Encounter Update : पवईतील मुलांच्या ओलीस नाट्याचा सूत्रधार असलेला माथेफिरू रोहित आर्यचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मुलांची सुटका करताना खरेच त्याला मारण्याची गरज होती का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह दिसून येतात. काही चकमक फेम अधिकाऱ्यांनी ही कारवाई योग्य असल्याचे सांगितले तर अनेक माजी अधिकाऱ्यांना ही चकमक अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. माजी पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर यांनी पोलिसांची ही कारवाई अयोग्य असल्याचे सांगितलंय. प्रदीप शर्मा यांनी मात्र या कारवाईचे समर्थन केलंय. त्याच्या हातात एअर गन होती. ते नेमके शस्र काय होते ते सुरवातीला माहित नव्हते. तो मुलांना धोका पोहोचवू शकला असता, त्यामुळे त्याच्यावर केलेला गोळीबार योग्य होता, असेही शर्मा यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे अॅडव्होकेट नितीन सातपुते या संदर्भात कोर्टात याचिका दाखल करणार आहेत.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा

31 October 2025 12:34 PM (IST)

तेजस एक्स्प्रेसच्या कंत्राटदाराला दंड

Tejas Experess : मडगाव-तेजस एक्स्प्रेसच्या कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात आलाय.. प्रवाशांना नाश्त्याऐवजी १० रुपयांचा बिस्किटाचा पुडा आणि जेवणात आधी ठरलेल्या पदार्थांएवजी अन्य पदार्थ दिल्याच्या तक्रारीची आयआरसीटीसीने दखल घेतली आहे. या प्रकरणी आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाने संबंधित कंत्राटदाराला दंड ठोठावला. दिवाळीनंतर कोकणातून मुंबईकडे तेजस एक्स्प्रेसने प्रवास करताना, प्रवाशांच्या खानपानात घोळ असल्याचे आढळून आलं होतं... कुडाळ ते ठाणे असा तेजस एक्स्प्रेसने प्रवास करताना प्रवाशांना कचोरी, समोसा देण्याऐवजी फक्त एक बिस्कीटचा पुडा देण्यात आला...ज्या प्रवाशांना तिकिटात जेवणाचा पर्याय निवडला नव्हता, अशा प्रवाशांना कचोरी आणि समोसे चढ्या दराने देण्याचा प्रकार घडला होता...मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसमध्ये इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारे जाहीर केलेल्या खाद्यपदार्थानुसार एक सुकी कचोरी किंवा समोसा, चीज सँडविच, प्री मिक्स चहा अथवा कॉफी, कॅरमल पॉपकॉर्न आणि सीलबंद थंडपेय मिळणे अपेक्षित होते... मात्र, प्रत्यक्षात प्रवाशांना एक बिस्कीट पाकीट, एक मसाला शेंगदाणे पाकीट, सीलबंद थंडपेय आणि चहा देण्यात आलं. याप्रकरणी कारवाई करण्यात आलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

31 October 2025 11:48 AM (IST)

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विजय लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला असून, हिमालय घोरपडे हे राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत... रवींद्र भाबड हे तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत...एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि पात्रतागुण जाहीर केले आहेत... राज्यसेवा मुख्य परीक्षा २७ ते २९ मेदरम्यान घेण्यात आली होती. त्यानंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या 1516 उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली.या मुलाखती ३० ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आल्या. या मुलाखती संपल्यानंतर रात्री अंतिम निकाल जाहीर झाला...

बातमीचा व्हिडीओ पाहा 

31 October 2025 11:16 AM (IST)

रोहित आर्यच्या आरोपांवर शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

Powai Encounter Update : पवई एन्काऊंटरमधील रोहित आर्यला 9 कोटी 90 लाख दिले होते असं स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागानं दिलंय.. रोहित आर्य यांच्या अप्सरा मीडिया एंटरटेन्मेंट नेटवर्क प्रोजेक्ट धील 'लेट्स चेंज' या उपक्रमाअंतर्गत 'स्वच्छता मॉनिटर' या उपक्रमाला सीएसआरच्या माध्यमातून सप्टेंबर २०२२ आणि जून २०२३ अशा दोन वेळा मान्यता देण्यात आल्या होत्या. यासाठी सुरुवातीला या कार्यक्रमासाठी या संस्थेला विभागाने नऊ कोटी ९० लाख इतकी रक्कम दिली होती; मात्र त्यानंतर तिसऱ्यांदा २०२३-२४ मध्ये 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या अभियानांतर्गत दोन कोटी इतका निधी स्वच्छता मॉनिटर टप्पा दोन हे अभियान राबविण्यासाठी शासन मान्यता देण्यात आली होती. मात्र त्यात रोहित आर्यने मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आल्याने स्वच्छता मॉनिटर टप्पा दोन उपक्रम राबविता आले नाहीत, असा स्पष्ट खुलासा विभागाकडून करण्यात आला आहे

बातमीचा व्हिडीओ पाहा 

31 October 2025 11:08 AM (IST)

आता तिसरीपासून AI शिकणार मुलं 

AI Education :  केंद्र सरकारने तिसऱ्या वर्गापासून एआय शिकविण्याचा निर्णय घेतला आहे... २०२६-२७ पासून हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल... उच्च शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी सांगितले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकारसह केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांच्या अभ्यासक्रमात एआय विषय समाविष्ट केला जाणार आहे... पुढील दोन वर्षात तिसरीच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करायचा आहे. यासाठी युद्धपातळीवर तयारी करावी लागणार आहे. अभ्यासक्रम तयार करणे आणि त्यासाठी शिक्षकांना तयार करणे, या गोष्टी लवकरात लवकर कराव्या लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे..

31 October 2025 10:16 AM (IST)

राज्यात पोलीस भरतीला सुरुवात 

Police Bharti : मुंबईसह राज्यभरात बेरोजगार असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र न्यू पोलीस दलांमध्ये एकूण १५ हजार ३०० पदांसाठी भरती सुरू करण्यात आलीय. अर्ज भरण्याची अखेरची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे. या भरतीअंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई (एसआरपीएफ), पोलीस बॅन्डस्मन, कारागृह शिपाई ही पदे भरली जाणारेत. १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान १८ ते २८ वर्ष असायला हवे. अर्ज भरताना खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला ४५० रुपये, तर मागास प्रवर्गातील उमेदवाराला ३५० रुपये फी भरावी लागेल. 

बातमीचा व्हिडीओ पाहा 

31 October 2025 09:20 AM (IST)

बच्चू कडू आणि राजू शेट्टींवर गुन्हा दाखल

Bacchu Kadu & Raju Shetty : बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासह शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंगणा पोलिसांत या गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय.. शेतकरी आंदोलनादरम्यान बेकायदेशीर महामार्ग अडवणं आणि नागरिकांची गैरसोय केल्याचा ठपका आंदोलकांवर ठेवण्यात आलाय.. केंद्रीय कापूस खरेदी केंद्राजवळील मैदानात आंदोलनाची परवानगी असताना आंदोलकांनी वर्धा महामार्ग अडवला. त्यामुळे जवळपास 30 तासांहून अधिकवेळ वाहतूक कोंडी झाली. या आंदोलनामुळे अनेकांना  अन्नपाणी आणि इतर सोयीपासून  वंचित ठेवण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. 

31 October 2025 09:16 AM (IST)

मुंबई एअरपोर्टवर 13 कोटी गांजा जप्त

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर तीन स्वतंत्र प्रकरणांत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी १२ कोटी ४१ लाख रुपयांच्या गांजासह ५६ लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या तस्करीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. सहा लोकांकडून गांजा जप्त करण्यात आला  ते बँकॉक इथून आले होते. आरोपींकडे अमली पदार्थ असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना होती. त्यानुसार आरोपी मुंबईत दाखल होताच अधिकाऱ्यांनी त्यांच्या सामानाची तपासणी केली. यावेळी १२ किलो ४१८ ग्रॅम गांजा आढळला. तर, दुसऱ्या प्रकरणात शारजाहून आलेल्या तिघांच्या बॅगेत ४० आयफोन १७ प्रो मॅक्स, ३० लॅपटॉप, १२ मद्याच्या बाटल्या, सिगारेट असा ५६ लाखांचा मुद्देमाल आढळला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author