Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

1 Oct 2023, 22:47 वाजता

वाघनखांबद्दल इतिहासकारही खरे असू शकतात-अजित पवार

 

Ajit Pawar on Waghnakh : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसंदर्भात वस्तुस्थिती काय आहे, ते जाणून घेऊ, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

1 Oct 2023, 22:14 वाजता

आशियाई स्पर्धेत भारताकडून एकाच दिवसात तब्बल 15 पदकांची कमाई

 

Asian Games : आशियाई स्पर्धेत भारतासाठी रविवारचा दिवस पदकांचा दिवस ठरला आणि भारतानं पदकांचं अर्धशतकही पूर्ण केलं. भारतानं एकाच दिवसात तब्बल 15 पदकांची कमाई केलीय. यात सर्वाधिक 9 मेडल्स अॅथलेटिक्समध्ये मिळाली आहेत. अविनाश साबळेनं भारताला अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण कामगिरी करून दिली तर तेजिंदर तूरनं गोळाफेकीत सुवर्ण मिळवत इतिहास रचला.. तर नेमबाजीतही भारताला एका सुवर्णासह एक रौप्य आणि एक ब्रॉन्झ मेडल मिळालाय. तबॅडमिंटनमध्येही पुरुष संघानं इतिहास रचत पहिल्यांदाच फायनल गाठली. मात्र चीनी जोडीला जोरदार टक्कर दिला तरी भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. सध्या भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानी असून भारताकडे 13 गोल्डसह 53 पदकं आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

1 Oct 2023, 21:01 वाजता

हार्बर रेल्वेवर 5 रात्रीचा ट्रॅफिक ब्लॉक

 

Harbour Railway Megablock : पनवेलमध्ये सोमवार ते शनिवार हार्बर रेल्वेवर मध्यरात्रीचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, अप आणि डाउन 2 नव्या लाईन्सच्या बांधकामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री साडे बारा ते पहाटे साडे पाचपर्य़ंत हा पाच रात्रींचा ब्लॉक असेल. त्यामुळे या काळात
पनवेलसाठी शेवटची लोकल ट्रेन सीएसएमटीहून रात्री १०.५८ ला सुटणार आहे. 
 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

1 Oct 2023, 20:43 वाजता

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली

 

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळलीये. दासगावजवळ मातीचा ढिगारा, दगड, झाडे झुडपे रस्त्यावर. कोकणात जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळलीये. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल. वाहतुकीवर कुठलाही परिणाम नाही.

1 Oct 2023, 20:11 वाजता

मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात घट

 

CNG, PNG Rates : महानगर गॅस लिमिटेडनं मोठा निर्णय घेतला आहे. सीएनजीच्या दरात ३ रुपये आणि पीएनजीच्या दरात २ रुपयांची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. 
 

1 Oct 2023, 19:31 वाजता

वाघ नखावरून वाद करण्याची गरज नाही- शरद पवार

 

Sharad Pawar on Waghnakh : शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन राज्यात सुरु असलेल्या राजकीय वादावर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.. वाघनखावरुन वाद निर्माण करण्याची गरज नसल्याचा सल्लाच शरद पवारांनी दिलाय

बातमीचा व्हिडीओ पाहा-

1 Oct 2023, 19:02 वाजता

पुढच्या 48 तासांत राज्यात पावसाची शक्यता

 

IMD Alert :  पुढच्या ४८ तासात राज्यात पावसाची शक्यता आहे. गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये पुढचे २ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुण्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात ३ तारखेनंतर मात्र पावसाचा जोर कमी होईल

बातमीचा व्हिडीओ पाहा-

1 Oct 2023, 18:37 वाजता

नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात गौतमी पाटीलचा डान्स 

 

Zee 24 Taas Impact : नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणामध्ये गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमाची बातमी झी २४ तासनं दाखवल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिका-यांनी वलखेड शाळेला भेट देऊन चौकशी सुरू केलीय.. शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते.. हे ग्रामपालिकेचं मैदान असल्यानं काहीही वावगं केलं नसल्याचा दावा स्थानिक सरपंचांनी केला होता. तर शिक्षण खात्याला चौकशीचा अहवाल पाठवणार असल्याचं शिक्षणाधिका-यांनी स्पष्ट केलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

1 Oct 2023, 18:03 वाजता

वाघ नखं खोटी असतील तर सिद्ध करा- शिवेंद्रराजे भोसले

 

Shivendra Raje Bhosale on Waghnakh : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं खोटी असतील तर ते विरोधकांनी सिद्ध करा, असा आव्हान शिवेंद्रराजे भोसलेंनी दिलंय. विरोधकांनी वाघ नखांबाबत राजकारण करू नये. असा सल्ला शिवेंद्रराजेंनी दिलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

1 Oct 2023, 17:43 वाजता

शिवसेना म्हणजे महाराजांची वाघनखं- संजय राऊत

 

Sanjay Raut vs Eknath Shinde : वाघनखांवरून शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटातही कलगीतुरा रंगलाय... शिवसेना म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची खरी वाघनखं असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय.. तर काही जणांनी शिवरायांचा आदर्श सोडून अफझलखानाचा आदर्श घेतलाय असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारलाय.