Gadchiroli Jadutona : गडचिरोलीत दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Gadchiroli Jadutona : गडचिरोलीत दोघांना जिवंत जाळलं

3 May 2024, 11:17 वाजता

नागपुरात भाजप आणि काँग्रेस आमनेसामने

 

Nagpur BJP Vs Congress : नागपुरातील मतदार यादीतील घोळावरून भाजप-काँग्रेस आमने-सामने आलेयत...मविआ सरकार असताना मविआमधील नागपुरातील मंत्र्यांनीच नागपुरातील मतदार यादीत घोळ घातल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केलाय...मात्र काँग्रेसने भाजपचा हा आरोप फेटाळून लावत पराभवाच्या भीतीनेच भाजप आमदार असा आरोप करत असल्याचं काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी म्हटलंय...नागपुरात मतदान घटल्याने मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप भाजपने केला होता...त्याची चौकशी करून अधिका-यांवर कारवाईची मागणी केली होती...त्यावरून आता भाजपने मविआवर आरोप केलाय...तर काँग्रेसने आरोप फेटाळून लावलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 May 2024, 10:27 वाजता

बच्चू कडू यांचा सुप्रिया सुळेंना पाठिंबा

 

Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या प्रहार शिक्षक संघटनेनं बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केलाय. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन मिळाल्याचं सांगत सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर करण्यात आलाय. अमरावतीत महायुतीविरोधात बच्चू कडूंनी शड्डू ठोकलाय, आता बारामतीतही सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्याची भूमिका बच्चू कडूंनी घेतलीय. बच्चू कडू महायुतीचे घटक असतानाही अमरावती आणि बारामतीत विरोधी भूमिका घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 May 2024, 10:24 वाजता

मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

 

Thane Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधवांवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय...अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर 5 कोटींची खंडणी आणि मारहाण केल्याप्रकरणी मुंबईच्या एल टी मार्ग खंडणी विभागात गुन्हा दाखल झालाय...सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी तक्रार केली होती...त्या तक्रारीवरून अविनाश जाधवांवर खंडणी, मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 May 2024, 09:52 वाजता

राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार

 

Loksabha Election 2024 : राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार आहेत...तर अमेठीतून के.एल शर्मा काँग्रेसकडून निवडणूक लढणार आहेत...सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढायच्या...मात्र, आता त्या राज्यसभेवर गेल्यानं राहुल गांधी रायबरेलीतून लढणार आहेत...आज राहुल गांधी शक्तिप्रदर्शन करत रायबरेलीतून अर्ज भरणार आहेत...तर के एल शर्मा हे अमेठीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत...के.एल शर्मा यांची लढत ही स्मृती इराणींसोबत होणाराय...तर प्रियांका गांधी निवडणूक लढणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय...

बातमी पाहा - Loksabha Election 2024 : सस्पेंस संपला! काँग्रेससाठी रायबरेलीतून राहुल गांधी, तर अमेठीतून 'या' नेत्याची उमेदवारी निश्चित

3 May 2024, 09:47 वाजता

महायुतीचे उमेदवार भरणार उमेदवारी अर्ज

 

Loksabha Election : महायुतीचे उमेदवारांच्या उमेदवारांची आज अर्ज भरण्याची लगबग दिसून येतेय. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम उमेदवारी अर्ज भरतील. त्यांची लढत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याशी होतेय. शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकरही आज अर्ज भरतील. ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर त्यांच्याविरोधात आहेत. दक्षिण मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतोय. याठिकाणी अरविंद सावंत आणि यामिनी जाधव एकमेकांसमोर आहेत. यामिनी जाधव आज अर्ज भरतील. तिकडे ठाणे आणि भिवंडीतून नरेश म्हस्के आणि कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करतील. नरेश म्हस्केंविरोधात राजन विचारे मैदानात आहेत. तर भिवंडीत कपिल पाटलांविरोधात सुरेश म्हात्रे रिंगणात आहेत. पालघरमध्ये भाजपनं डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी दिलीय. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या भारती कामडी रिंगणात आहेत.  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 May 2024, 08:43 वाजता

संजय निरुपम यांचा आज शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

 

Sanjay Nirupam : संजय निरुपम यांचे अखेर ठरलाय.. आज निरुपम एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत..  ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी त्यांच्या प्रक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत संजय निरुपम त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करतील..  काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर निरुपम काय भूमिका घेणार याकडे सा-यांचं लक्ष लागलं होतं.. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती... अखेर त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 May 2024, 08:14 वाजता

ठाकरे गट रायगड जिल्हाप्रमुख गाडीवर हल्ला

 

Raigad Attack : शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर हल्ला झालाय. मुंबई गोवा महामार्गावर टेमपाले ते वीरच्या दरम्यान गाडीवर दगडफेक करण्यात आलीय...या हल्ला प्रकरणी विकास गोगावलेंसह 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय...हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा विकास गोगावलेंवर दाखल करण्यात आलाय...या हल्ल्यात चालक किरकोळ जखमी झालाय...मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून गाडी पुढे पळवली...त्यामुळे गाडीतील सर्वजण बचावले...या हल्ल्यात गाडीचं मोठं नुकसान झालंय. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाड येथील सभा आटोपून नवगणे परत इंदापूर इथं आपल्या घरी जात असताना रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला...हा हल्ला आमदार भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांच्या चिथावणीवरून झाला आणि हल्ल्याच्या वेळी विकास गोगावले हजर होते असा आरोप नवगणेंनी केलाय...

बातमी पाहा - रायगडमध्ये राडा! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, गाडी फोडली; गोगावलेंच्या मुलावर आरोप

3 May 2024, 08:11 वाजता

बारामतीत अजित पवार, देवेंद्र फडणवीसांची आज प्रचारसभा

 

Loksabha Election : बारामती... लोकसभा निवडणुकीतला हायहोल्टेज मतदारसंघ... इथं नणंद विरुद्ध भावजय लढतीत कोण बाजी मारणार? सुप्रिया सुळे हॅटट्रिक साधणार की सुनेत्रा पवार त्यांना मात देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यासाठी मविआ आणि महायुतीच्या नेत्यांनी सभांचा धडाका लावलाय. कालच्या पवारांच्या सभांनंतर आज अजितदादा आणि देवेंद्रफडणवीस जाहीर सभा घेतायत. संध्याकाळी वारजे माळवाडी इथं सुनेत्रा पवारांसाठी सभा असणारेय. इथं अजित पवार आणि फडणवीस काय तोफ डागतात याकडे लक्ष असेलं. 

3 May 2024, 07:48 वाजता

पुण्यात राहुल गांधींची प्रचारसभा

 

Pune Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा होणारेय. मविआ उमेदवार रवींद्र धंगेकर, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, संज्योत वाघेरे यांच्यासाठी राहुल गांधी पुण्यात सभा घेतायत. इथल्या SSPMS  मैदानावर ही सभा होणारेय. पुण्यात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मोठी टीका केली होती. या टीकेला राहुल गांधी काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.