4 Oct 2023, 22:55 वाजता
अजितदादांना 5 वर्षांसाठी सीएम करणार- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांबाबत मोठं विधान केलंय. अजित पवारांना केवळ सहा महिन्यांसाठी नव्हे तर पूर्ण पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करणार असं विधान एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
4 Oct 2023, 22:14 वाजता
10 खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार- बच्चू कडू
Bacchu Kadu : सरकारमधले मतभेद कमी होण्यास तयार नाहीत..शिंदे गटासह भाजपबरोबर हातमिळवणी कऱणारे आमदार बच्चू कडू सध्या मित्रांवर नाराज आहेत आणि ती नाराजी ते उघडपणे बोलून दाखवत आहेत आता तर त्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना खुलं आव्हान दिलंय. अजून 10 खासदार पाठवा बच्चू कडूंना पाडण्यासाठी, मात्र बच्चू कडू पडणार नाही असा इशाराच त्यांनी बावनकुळेंना दिलाय. भाजप एकीकडे सत्तेत बोलवतात आणि दुसरीकडे मित्रत्व पाळत नाही. बावनकुळे अनिल बोंडेंना कडूंना पाडायला सांगतात असा आरोप बच्चू कडूंनी केलाय. ते वाशिममध्ये दिव्यांग कल्याण विभागाच्या कार्यक्रमात बोलत होते....
बातमीचा व्हिडीओ पाहा-
4 Oct 2023, 21:56 वाजता
शिंदे गटाचा दसरा मेळावा क्रॉस मैदानावर?
Shinde Group on Dasra Melava : शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा चर्चगेटच्या क्रॉस मैदानात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बीकेसी मैदानात बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे. तर शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटानं बीएमसीकडे अर्ज केलाय. त्यामुळे ऐनवेळी गोंधळ होऊ नये यासाठी शिंदे गटानं प्लान बी तयार ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. क्रॉस मैदानासाठी शिंदे गटानं अर्जही दाखल केल्याचं समजतंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
4 Oct 2023, 21:07 वाजता
नगर अर्बन बँकेचा परवाना रद्द
Nagar Urban Bank License cancelled : अहमदनगर येथील नगर अर्बन बँकेचा भारतीय रिझर्व बँकेने परवाना रद्द केलाय.. शंभरहून अधिक वर्षाची परंपरा असलेली अर्बन बँक बंद होणार असल्याच्या चर्चेमुळे नागरिक आणि व्यापा-यांचे धाबे दणाललेत. काही वर्षांपासून अनियमित कर्ज वाटप प्रकरणांमुळे बँक चर्चेत आली होती.. प्रशासक नेमूनदेखील बँक पूर्वपदावर आली नाही..अखेर सहकार कायदा 1949 च्या कलम 56 चं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत रिझर्व बँकेने बँक परवाना रद्द केलाय..
4 Oct 2023, 20:38 वाजता
चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला
Chandrakant Patil visiting CM Shinde : मराठा आरक्षणाच्या चर्चेच्या निमित्ताने उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर गेले आहेत. पुण्याचं पालकमंत्रिपद गेल्यानंतर पाटलांनी लगेचच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलंय. पुण्याचं पालकमंत्रिपद गेल्यामुळे चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे भाजप नेते नाराज असल्याचं समजतंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
4 Oct 2023, 20:08 वाजता
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे उद्या वाहतुकीसाठी बंद
Mumbai-Pune Expressway Close : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे उद्या दुपारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूक उद्या दुपारी १२ ते २ अशी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वेवरील बोरघाटजवळ कमान बसवण्याचं काम करण्यात येणार असल्यानं ही वाहतूक जुन्या हायवेवर वळवण्यात येणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
4 Oct 2023, 19:02 वाजता
पालकमंत्रिपदासाठी छगन भुजबळांना डावललं?
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात ज्येष्ठ मंत्री असलेल्या छगन भुजबळांना पालकमंत्रिपदासाठी डावलण्यात आलंय. नाशिकमध्ये अजित पवार गटातला पक्षांतर्गत विरोध त्यांना भोवल्याची चर्चा आहे. मात्र त्यांना दुस-या कोणत्यातरी जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देता आलं असतं. मात्र तेदेखील त्यांना देण्यात आलेलं नाही. यासाठी मात्र त्यांना ओबीसींच्या बैठकीतला अजित पवारांशी घेतलेला पंगा महागात पडल्याची चर्चा रंगू लागलीय. अजितदादांशी त्यांचा वाद झाल्यामुळेच त्यांना पालकमंत्रिपदापासून दूर ठेवल्याची चर्चा आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
4 Oct 2023, 18:33 वाजता
भालाफेकीत नीरज चोप्रानं पुन्हा जिंकलं सुवर्णपदक
Neeraj Chopra Won the Gold Medal : एशियन गेम्समध्ये नीरजची सुवर्ण कामगिरी केलीये. भालाफेकीत नीरजनं सुवर्णपदक पटकावलंय. चौथ्या राऊंडमध्ये 88.88 मीटरचा थ्रो करुन पुन्हा मिळवलं सुवर्ण पदक. भारताच्या किशोर जेनाला भालाफेकीत रौप्यपदक मिळालंय. तर भारताची आतापर्यंत 76 पदकांची कमाई झालीये.
4 Oct 2023, 18:07 वाजता
पालकमंत्रिपदाबाबत चंद्रकांत पाटलांचं मौन
Chandrakant Patil : पालकमंत्र्यांच्या नव्या जबाबदा-यांवर भाष्य करण्यास चंद्रकांत पाटलांनी नकार दिलाय... पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आलीय.. त्यांच्या जागी पुण्याचे नवे पालकमंत्री म्हणून अजित पवारांची नियुक्ती करण्यात आलीय.. या घडामोडींबाबत विचारणा केली असता चंद्रकांत पाटील यांनी हात जोडून नमस्कार केला.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
4 Oct 2023, 17:46 वाजता
आपचे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक
AAP MP Sanjay Singh Arrested by ED : आपचे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहेत. दिल्ली मद्य घोटाळ्याच्या आरोपात सिंग यांना अटक करण्यात आली आहेत. मनीष सिसोदियानंतर आता संजय सिंह तुरूंगात. भाजप आणि आपमध्ये संघर्ष आणखी वाढतोय. सिंग यांच्या अटकेच्या निषेधार्थ आप कार्यकर्त्यांचा राडा.
बातमीचा व्हिडीओ पाहा-