5 Oct 2023, 21:48 वाजता
ऑनलाईन बेटिंग अॅपप्रकरणी हुमा, कपिल अडचणीत
ED Summons to Huma Kureshi, Kapil Sharma : महादेव बेटिंग अॅपप्रकरणी रणबीर कपूरनंतर आता अभिनेत्री हुमा कुरेशी आणि कॉमेडियन कपिल शर्माही ईडीच्या रडारवर आले आहेत. हुमा आणि कपिलला ईडीनं समन्स बजावलाय. त्यामुळे दोघांची याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची यापूर्वीच महादेव बेटिंग अॅपच्या जाहिरातीप्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आलीय. त्यामुळे आता या दोघांचीही चौकशी करण्यात येणार असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Oct 2023, 18:35 वाजता
पंतप्रधान मोदी 14 किंवा 17 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत येण्याची शक्यता
PM Modi in Navi Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येणार असल्याची सूत्रांची माहिती. मोदी 14 किंवा 17 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत येण्याची शक्यता. मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येणार असल्याची सूत्रांची माहिती.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Oct 2023, 17:58 वाजता
पालकमंत्रिपदाच्या वाटपावरुन शिंदे गट नाराज?
CM Shinde left for Delhi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पालकमंत्रिपदाच्या वाटपावरुन शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे... शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पालकमंत्रिपद बदलण्यात आलं. ती पदं अजित पवार गटाला देण्यात आली.. शिवाय अजित पवारांनाही आणखी काही पदं हवी असल्याची माहिती मिळतेय... यावरच अमित शाहांसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय....तर नक्षलसंदर्भातल्या एका बैठकीसाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याची माहिती फडणवीसांनी दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Oct 2023, 17:05 वाजता
दबाव असल्यानं आमदार अजित पवारांसोबत- जयंत पाटील
Jayant Patil on NCP MLA : अजित पवारांसोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केलाय.. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारासोबत माझी चर्चा झाली. आम्ही मनापासून शरद पवारांसोबत आहोत. सध्या थोडा दबाव आहे म्हणून आम्ही इकडे राहतोय, असं आमदारांनी सांगितल्याचं जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत सांगितलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Oct 2023, 14:48 वाजता
फडणवीसांच्या सचिवांच्या नावे बोगस ई-मेल
Fake E-mail : थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावानंच सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या खासगी सचिवांच्या नावानं बोगस ईमेल करुन फसवणुकीचा प्रकार उघड झालाय. ऊर्जा खात्यातल्या एका अधिका-याच्या बदलीसंदर्भात वरिष्ठ अधिका-याची खोटी सही करुन हा ईमेल पाठवण्यात आला होता. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Oct 2023, 13:08 वाजता
सोनं आणि चांदीच्या दरात घसरण
Gold & Silver Price Rate : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांत घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरातल्या चढउताराचा हा परिणाम आहे. गेल्या 10 दिवसांत सोन्याचे दर 3000 रूपयांनी घसरले. तर चांदीचे दर 10 दिवसांत 6000 रूपयांनी कमी झालेत. मात्र आता पितृपक्षानंतर नवरात्र, दसरा आणि दिवाळी त्याचबरोबर लग्नसराईमुळे सोन्याची मागणी पुन्हा वाढणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Oct 2023, 13:04 वाजता
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये वार-प्रहार
Sanjay Raut & Devendra Fadanvis : तपास यंत्रणांच्या भीतीने अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्याचा उल्लेख शरद पवारांनी नुकताच केला होता. त्यालाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही दुजोरा दिलाय.. ईडीचा धाक, भीती आणि अटकेची टांगती तलवार अजित पवार गटावर असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांसह संजय राऊतांवरही पलटवार केलाय.. पवार साहेबांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता याची आठवणही फडणवीसांनी यावेळी करुन दिली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Oct 2023, 12:28 वाजता
शरद पवार, अजित पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार, अजित पवार यांना उद्या निवडणूक आयोगाने सुनावणीसाठी नोटीस पाठवली आहे. मात्र उद्या या सुनावणीला शरद पवार आयोगासमोर उपस्थित राहणार नाहीत. शरद पवार गटाने 9 हजार शपथपत्र आयोगाकडे सादर केलीयत. अजित पवारांच्या गटाने 5000 शपथपत्र दाखल केली आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. उद्या आयोगासमोर शरद पवारांचे वकील अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहेत.अजित पवार गटानेही आयोगाकडे काही कागदपत्रं सादर केली आहेत. समर्थन देणा-या आमदारांची संख्या जास्त असल्याचा दावा अजित पवार गटाने केलाय.
बातमीचे व्हिडीओ पाहा -
5 Oct 2023, 11:44 वाजता
कल्याणमध्ये विद्यार्थ्यांची कोट्यवधींची फसवणूक
Kalyan Student Cheating : सरकारमान्य नर्सिंग कोर्सच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमधून समोर आलीय...उडान इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, विश्वकर्मा सिटी ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट सेंटरमध्ये हा प्रकार घडलाय...सरकारमान्य इन्स्टिट्यूट असल्याचं सांगून प्रत्येक विद्यार्थ्याकडून 1 लाख 75 हजार रुपये उकळण्यात आले होते...तीन वर्ष विद्यार्थ्यांना शिकवण्यातही आलं...त्यानंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिलं...मात्र, सर्टिफिकेट पाहिलं त्यावेळी हे बोगस असल्याचं समोर आलं...यामुळे विद्यार्थ्यांची तीन वर्षेही फुकट गेली आणि पैसेही गेलेयत...याची तक्रार पोलिसांत करण्यात आली असून, संस्थाचालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
5 Oct 2023, 11:31 वाजता
लोकसभेसाठी मविआकडून मोर्चेबांधणीला सुरुवात
Mahavikasaaghadi In Loksabha Election : लोकसभेसाठी महाविकासआघाडीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झालीय. लोकसभेतील जागावाटप निश्चितीसाठी महाविकासआघाडीकडून समन्वय समिती स्थापन करण्यात आलीय. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असावा तसंच जागा वाटप अंतिम करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आलीय. तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन जागावाटपासंदर्भात चर्चा करतील आणि नावे निश्चित करणारेत. आता मविआमधल्या कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -