Pune ACB Raid on Officers : पुणे एसीबीचे 3 बड्या शिक्षण अधिकाऱ्यांवर गुन्हे

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Pune ACB Raid on Officers : पुणे एसीबीचे 3 बड्या शिक्षण अधिकाऱ्यांवर गुन्हे

6 Dec 2023, 22:49 वाजता

शिक्षणखात्यातील अधिका-यांनी कोट्यवधींचं घबाड जमवल्याचं समोर

 

Pune ACB Raid on Officers : राज्यातल्या शिक्षणखात्यातल्या अधिका-यांनी कोट्यवधींचं घबाड जमवल्याची धक्कादायक माहिती एसीबीच्या चौकशीतून समोर आलीय. या तीन लाचखोर अधिका-यांवर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत...पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केलीय. यात टीईटी घोटाळ्यातला मुख्य आरोपी तुकाराम सुपे याच्यासह सांगली जिल्ह्यातले सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे आणि त्यांच्या पत्नी जयश्री कांबळे. तसंच सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी किरण लोहार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या अधिका-यांनी कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याची माहिती पुणे एसीबीनं दिलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

6 Dec 2023, 18:02 वाजता

तुळजाभवानीचा मुकूट, मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिक मोती चोरीला

 

Tuljabhawani Jwellery : तुळजाभवानीचे शिवकालीन आणि पुरातन दागिने चोरीला गेल्याची खळबळजनक माहिती झी २४ तासच्या हाती लागलीय. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये मुकूट, मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिक मोतींचा समावेश आहे. आणि ही माहिती मंदिर संस्थानाने उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्यीय चौकशी समितीच्या अहवालात उघड झालीय. यात 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूटही गायब झाल्याचं समोर आलंय.  ही चोरी लपवण्यासाठी दुसरा मुकूट ठेवल्याचंही उघड झालंय. मात्र या अहवालावर अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

6 Dec 2023, 17:37 वाजता

नवाब मलिक अजित पवार गटात की शरद पवार गटात बसणार?

 

Nawab Malik likely to attend Session : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक उद्या नागपूर अधिवेशनात हजेरी लावण्याची शक्यता आहे. मलिक जामिनावर बाहेर आल्यानंतरही प्रकृती ठीक नसल्यामुळे ते गेल्या अधिवेशनाला उपस्थित नव्हते. आता मलिक उद्या अधिवेशनात येण्याची शक्यता आहे. मात्र अधिवेशनाला आल्यावर मलिक शरद पवार गटाच्या बाजूला बसतात की अजित पवार गटाच्या बाजूला बसतात, याची उत्सुकता आहे. कारण आतापर्यंत मलिकांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

6 Dec 2023, 16:37 वाजता

विरोधकांची महायुती सरकारला घेरण्याची रणनीती

 

Nagpur Winter Session : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजीत केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय. पत्रकार परिषदेत विरोधकांचा महायुती सरकारवर हल्लाबोल.. 'जातीत, धर्मांत तेढ असल्याची राज्याची ओळख' असं वडेट्टीवार यांचं विधान.. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत, सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केलीय. 'सरकारचा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा दृष्टिकोण', वडेट्टीवार यांची सरकारवर टीका... 16 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका, सरसकट पंचनामे होत नाहीत असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

6 Dec 2023, 16:05 वाजता

हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारची अग्निपरीक्षा

 

Nagpur Winter Session : नागपूरमध्ये उद्यापासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारची अग्निपरिक्षा होणार आहे.. कारण मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान यावरुन विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत.. त्यासोबतच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह आणखी काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दाही विरोधक काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सरकारने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजीत केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय. तर सरकारविरोधात विरोधी पक्ष आंदोलनही करणार आहे.. दुसरीकडे अधिवेशनाआधी संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठक पार पडणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची पत्रकार परिषद होईल. तेव्हा विरोधकांच्या आरोपाला सत्ताधारीही जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.

6 Dec 2023, 14:02 वाजता

भाजपच्या खासदारांचे तडकाफडकी राजीनामे

 

Resignation of BJP MPs : केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी राजीनामा दिलाय...विधानसभा जिंकलेल्या सर्व भाजप खासदारांनी राजीनामे लोकसभा अध्यक्षण आणि राज्यसभेचे सभापती यांच्याकडे सुपूर्द केलाय...नरेंद्र तोमर मध्यप्रदेश निवडणुकीत विधानसभेत निवडून आलेयत...त्यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनीही खासदारकी सोडलीय...तर राजस्थानात राजवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी, रीती पाठक हे निवडून आल्याने त्यांनीही राजीनामा दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 Dec 2023, 13:28 वाजता

मुंबईच्या दादरमधील भरतक्षेत्र साडीच्या दुकानावर ईडीची धाड, आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी EDचा छापा

 

ED Raid in Mumbai : मुंबईत साडी व्यापा-यावर ईडीच्या धाडी पडल्यायत. साडीचं प्रसिद्ध दुकान भरतक्षेत्र या दुकानावर ईडीची धाड पडलीय. साडी व्यापा-याच्या विविध दुकानांवर एकाच वेळी ईडीच्या धाडी पडल्यायत. आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी EDनं हे छापे टाकल्याचं समजतंय़. गाला कुटुंबीयांसंदर्भातल्या या कारवाईमध्ये काही लोकांना ताब्यातही घेण्यात आलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

6 Dec 2023, 13:06 वाजता

हिवाळी अधिवेशनात पुन्हा सत्ताधारी आमदारांना निधीचा धमाका?

 

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीआधी महायुती आमदारांना सरकार खूश करणार आहे...हिवाळी अधिवेशनात पुन्हा सत्ताधारी आमदारांना निधी मिळणार असून, सुमारे 4 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर होण्याची शक्यता आहे...अशी माहिती सूत्रांनी दिलीय...स्थानिक विकास निधी सत्ताधारी आमदारांना देत लोकसभा निवडणूक आधी मतांची बेगमी करण्याच्या हालचाली सुरू आहेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 Dec 2023, 12:57 वाजता

मराठा आरक्षणावर लवकरच नवी दिल्लीत बैठक

 

Sambhajiraje on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपतींनी पुढाकार घेतलाय...मराठा आरक्षणासाठी खासदारांनी संसदेत आवाज उठवावा, आरक्षणाबाबत भूमिका मांडावी यासाठी सर्व खासदारांना संभाजीराजेंनी पत्र लिहिलंय...याबाबत दिल्लीत बैठक बोलावण्यात आली असून, खासदारांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदारांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, मराठा समाजाला न्याय मिळावून द्यावा अशी संभाजीराजेंनी विनंती केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 Dec 2023, 12:31 वाजता

दापोली रिसॉर्ट आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सदानंद कदमांना दणका

 

Dapoli Resort Case : दापोली साई रिसॉर्ट आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सदानंद कदम यांना हायकोर्टानं दणका दिलाय. सदानंद कदम यांचा जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळलाय. याप्रकरणी हायकोर्टात सुनावणी पूर्ण झाली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार कदम यांच्या जामीनाची सुनावणी चार दिवसांतच आटोपली होती... मात्र कोर्टानं निकाल राखून ठेवला होता... कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत.. त्यांना जामीन देण्यास ईडीनं विरोध केला होता.

बातमीचा व्हिडीओ पाहा-