Marathi News LIVE Today : राष्ट्रवादी कोणाची? आज अजित पवार गटाचा युक्तिवाद संपला, शरद पवारांना पुढची तारीख प्रसिद्धी पत्रकामार्फत

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : राष्ट्रवादी कोणाची? आज अजित पवार गटाचा युक्तिवाद संपला, शरद पवारांना पुढची तारीख प्रसिद्धी पत्रकामार्फत

6 Oct 2023, 21:06 वाजता

निवडणूक आयोगाने शरद पवारांचा दावा फेटाळला

 

Sharad Pawar's Claim Rejected : केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा फेटाळलाय... अजित पवार गटानं सादर केलेली शपथपत्रं बोगस असल्याचा दावा शरद पवार गटानं केला होता. अजित पवारांनी मृत व्यक्तीचे शपथपत्र जोडल्याचा दावा शरद पवार गटानं केला. तर मृत व्यक्तीचं नव्हे तर त्यांच्या मुलाचं शपथपत्र जोडल्याचे अजित पवारांच्या वकिलांनी निदर्शनास आणलं. तेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार गटाचा आक्षेप फेटाळून लावला.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

6 Oct 2023, 19:17 वाजता

अंतिम निर्णय येईपर्यंत चिन्ह गोठवू नका- शरद पवार

 

Election Commission Hearing on NCP : राष्ट्रवादी कुणाची यावर निवडणूक आयोगामध्ये वादळी सुनावणी झाली....शिवसेनेला ज्या पद्धतीनं संख्याबळाच्या आधारावर चिन्ह दिलं गेलं, त्याचा दाखला अजित पवार गटानं निवडणूक आयोगासमोर दिला. तर अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका, अशी मागणी शरद पवार गटानं केली. सुनावणीत सुरुवातीला अजित पवार गटानं बाजू मांडली, तर त्यामध्ये शरद पवार गटानं प्रतिवाद केले. संख्याबळाच्या आधारावर आम्हालाच चिन्ह देण्यात यावं, असा दावा करत अजित पवार गटानं तब्बल 1 लाख 62 हजार प्रतिज्ञापत्रं सादर केली. तर शरद पवारांनीच राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केल्यानं पक्ष शरद पवारांचाच असल्याचा प्रतिवाद शरद पवार गटानं केला. या सुनावणीत या सुनावणीला शरद पवार स्वतः उपस्थित होते. अजून शरद पवार गटाचा युक्तिवाद शिल्लक आहे. त्यासाठी 9 ऑक्टोबरला म्हणजे येत्या सोमवारी दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगात पुन्हा सुनावणी होणार आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

 

6 Oct 2023, 16:35 वाजता

दोन्ही गटाच्या वकिलांकडून निवडणूक आयोगासमोर कागदपत्र सादर

 

Election Commission Hearing on NCP : राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनावणीला सुरूवात..शरद पवार आयोगाच्या कार्यालयात उपस्थित. जितेंद्र आव्हाडही आयोगाच्या कार्यालयात.. दोन्ही गटाच्या वकिलांकडून निवडणूक आयोगासमोर कागदपत्र सादर. अजित पवार गटाकडून 1 लाख 62 हजार प्रतिज्ञापत्र सादर.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

6 Oct 2023, 15:23 वाजता

शरद पवार सुप्रीम कोर्टात 

 

Sharad Pawar : निवडणूक आयोगात राष्ट्रवादी कुणाची याच्या सुनावणीच्या दिवशीच शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करावी, तसे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी द्यावेत, अशी याचिका शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात केलीय. या प्रकरणाची सुनावणी ९ ऑक्टोबरला होणार आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

6 Oct 2023, 14:52 वाजता

कोविडनं मृत्यू होत असताना ठाकरे घरात बसून नोटा मोजत होते- मुख्यमंत्री

 

Eknath Shinde on Uddhav Thackeray : कोविड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप केले... कोविडनं मृत्यू होत असताना ठाकरे घरात बसून नोटा मोजत होते, अशा शब्दांत शिंदेंनी जोरदार हल्ला चढवला. नांदेड मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय, त्यावर बोलताना शिंदेंनी ठाकरेंनाच धारेवर धरलं. तोंडाला मास्क लावून घरात बसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, असं सांगतानाच कोविड घोटाळ्याची चौकशी होणार असल्याचं शिंदेंनी यावेळी सांगितलं.

6 Oct 2023, 14:32 वाजता

नाशिकमध्ये ड्रग्ज बनवणारा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त

 

Nashik Drugs : मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये सर्वात मोठी कारवाई केलीय. नाशिक शहर हद्दीत असणारा ड्रग्स बनवणारा कारखानाच पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय.. पोलिसांच्या या कारवाईत दीडशेपेक्षा जास्त किलोचं ड्रग्स जप्त केलंय.. ज्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.. नाशिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून श्री गणेशाय इंडस्ट्रिज कंपनीत ड्रग्ज बनवलं जात होतं.. मात्र साकीनाका पोलिसांची तब्बल तीन दिवस कारवाई करत कंपनीच्या मालकासह कामगारांनाही ताब्यात घेतलंय... काही दिवसांआधीच ड्रग्ज माफिया ललित पाटील पुण्यातल्या ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हाती तुरी देऊन फरार झाला होता. त्यानंतर ड्रग्सविरोधी कारवाईसाठी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत.. मुंबई पोलिसांच्या या कारवाईनंतर राज्यातलं ड्रग्जचं मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 Oct 2023, 13:06 वाजता

मंत्रालय प्रवेशावर निर्बंध

 

Mantralaya Gate : मंत्रालयात प्रवेश करण्याबाबत आता मोठा निर्णय घेण्यात आलाय.. मंत्रालयातल्या मुख्य गेटने आता फक्त मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या गाड्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. इतर सर्व VVIP च्या गाड्यांना गार्डन गेटमधून प्रवेश दिला जाणार आहे.. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलाय

6 Oct 2023, 12:49 वाजता

Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'एक फूल 2 हाफ कुठे आहेत?','डीनला धमकवण्यासाठी गुन्हा दाखल केला?','गुवाहाटी, गोव्यात मजा करायला यांच्याकडे पैसे', 'इकडे बळी जातायत, मुख्यमंत्री मात्र दिल्लीत', 'जिल्हा- जिल्ह्यात  व्यवस्थेची तपासणी', 'रुग्णालयात  औषधांचा साठा आहे का तपासा', 'राज्यात औषधांची दलाली होतेय','मंत्र्यांना, नेत्यांना जाब विचारा', 'जालना-बारसूत लाठीचार्ज झाला', 'आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज', 'लाठीचार्जची जबाबदारी कोण घेणार','नागपूर बुडलं, शिंदे का गेलं नाही?'  उद्धव ठाकरे यांचा सवाल.

6 Oct 2023, 12:40 वाजता

Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today :  'राज्यातील संतापजनक घटना','कोरोना काळात औषधांचा तुटवडा नव्हता','वाढत्या मृत्यूच्या प्रमाणामुळे संताप','आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले','औषध पुरवठ्यात दलाल कुठे बसले आहेत का?','औषध पुरवठ्याची सीबीआय चौकशी करा', 'सरकारची सीबीआय चौकशी करा' उद्धव ठाकरे यांची मागणी.
'जाहिरात करायला सरकारकडे खोके आहेत का?', उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटाला टोला.

6 Oct 2023, 12:28 वाजता

 शरद पवार सुनावणीला जाण्याची शक्यता

 

Sharad Pawar : शरद पवार सुनावणीला जाण्याची शक्यता. निवडणूक आयोगासमोर आज पवार सुनावणीला जाण्याची शक्यता. आज सुनावणीला शरद पवार जाण्याची शक्यता. दुपारी 3 वाजता पवार सुनावणीला जाणार झी 24 तासला सूत्रांची माहिती.