Shinde-Fadanvis-Pawar together : गडचिरोलीत शिंदे-फडणवीस-पवार एकत्र
Maharashtra BreakinNews Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
आदिवासी रेला नृत्यात शिंदे-फडणवीस-पवारांचा सहभाग
Shinde-Fadnavis-Pawar together : गडचिरोलीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थानिक आदिवासी रेला नृत्यात भाग घेतला.. देवेंद्र फडणवीसांनी आदिवासींसोबत स्वतःही नृत्य केलं. राष्ट्रवादीचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनीही रेला नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला. फडणवीस इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी ढोल वाजवत कलाकारांचा उत्साह वाढवला. त्याची खास झलक तुम्ही 'झी २४ तास'वर पाहू शकता...
बातमी पाहा - गडचिरोलीत फडणवीसांनी आदिवासी रेला नृत्यावर धरला ठेका, पाहा व्हिडिओ
शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार गडचिरोलीत शासकीय कार्यक्रमात एकत्र
Shinde-Fadnavis-Pawar together : शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पहिल्यांदाच गडचिरोलीत शासकीय कार्यक्रमात एकत्र दिसले. कोटगल एमआयडीसी क्रीडांगणावर पार पडलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात गडचिरोलीतील लाभार्थ्यांना विविध सरकारी योजनांचे दाखले देण्यात आले. यावेळी तिन्ही नेत्यांनी आदिवासी वेशभूषा परिधान केली होती...
दरम्यान, अहंकार असल्यानं उद्धव ठाकरे केंद्राकडे काही मागत नव्हते, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी केला. तर अजित पवार सोबत आल्याने राज्यात विकासाचा त्रिशूळ निर्माण झालाय, असं फडणवीसांनी सांगितलं. राज्याच्या विकासासाठीच सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.बातमी पाहा - उद्धव ठाकरे अहंकारी असल्याने केंद्राकडे काही मागत नव्हते- शिंदे
राष्ट्रवादीवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करा... शरद पवारांचं पंतप्रधानांना आव्हान
Sharad Pawar Live | Yeola Sabha : राष्ट्रवादीतल्या बंडानंतर शरद पवारांनी आज पहिली जाहीर सभा घेतली ती छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात... यावेळी केलेल्या भाषणात पवारांनी येवलेकरांची माफी मागितली... माझा अंदाज चुकला म्हणून माफी मागतो, अशा शब्दांत छगन भुजबळांचं नाव न घेता त्यांनी जोरदार चपराक लगावली... राष्ट्रवादीवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करा... शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना आव्हान.. वय झाल्यानं निवृत्त होण्याचा सल्ला देणाऱ्यांनाही त्यांनी चांगलंच फटकारलं. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला.
बातमी पाहा - वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल- शरद पवारांचा थेट इशारा
दिल्लीतला एक अदृश्य हात हे सगळं षडयंत्र आखतोय - सुप्रिया सुळे
Yeola Sharad Pawar's Sabha : राष्ट्रवादीतील बंडानंतर येवल्यात झालेल्या जाहीर सभेत कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर निशाणा साधला... महाराष्ट्राच्या विरोधात दिल्लीचं षडयंत्र सुरूय... दिल्लीतला एक अदृश्य हात हे सगळं षडयंत्र आखतोय, असा हल्ला सुळेंनी चढवला... तर भावाभावांमध्ये मिठाचा खडा शकुनी मामानं टाकला, अशा शब्दांत फडणवीसांचं नाव न घेता कोल्हेंनी टीका केली.
नागपुरात दूषित पाणीपुरी खाल्ल्यानं तरुणीनं गमवला जीव
Nagpur Panipuri : नागपुरात दूषित पाणीपुरी खाल्ल्यानं एका तरुणीला जीव गमवावा लागलाय... पाणीपुरी खाल्यानं नागपुरात तीन तरुणींना गॅस्ट्रोची लागण झाली होती.. यातील एका तरुणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय... मृत मुलगी मुळची जम्मू-काश्मीरची असून ती शिक्षणासाठी नागपूरला आली होती.. गॅस्ट्रो झाल्यानंतरही त्यांनी उपचारास दिरंगाई केल्यानं तिघींचीही प्रकृती बिघडली.. यात एकीचा मृत्यू झाला असून दोघींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत... अद्याप याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाहीये. दोन्ही मुली शुद्धीवर आल्यांतर त्यांनी कोणत्या ठिकाणी पाणीपुरी खाल्ली होती हे स्पष्ट होणार आहे
ठाकरेंपैकी एक भाऊ सत्तेत बसला पाहिजे- अमित ठाकरे
Amit Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणावर सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाचं वातावरण आहे.. या पार्श्वभूमीवर मनसेकडून एक सही संतापाची ही मोहीम राबवली जात आहे.. अमित ठाकरेंच्या उपस्थितीत दादर रेल्वे स्थानक इथून या मोहिमेला सुरुवात झालीये. यावेळी दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा राज ठाकरे सत्तेत बसले पाहिजेत अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.
बातमी पाहा- दोन ठाकरे बंधू पैकी एक ठाकरे सत्तेत बसला पाहिजे...; अमित ठाकरे यांचे मोठं विधान
Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today : 'ट्रिपल इंजिन राज्याचा विकास करेल', 'हातात खंजीर ठेवणारी माणसं बेभरवश्याची', 'अजित म्हणजे जीत आपला विजय नक्की', 'सगळ्यांना वस्तूस्थिती समजली पाहिजे', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य.
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'ना टायर्ड हू, ना रिटायर्ड हू', शरद पवार यांनी दिला वाजपेंयीच्या कवितेला उजाळा. 'चांगल्या कामासाठी वय अडथळा आणत नाही', अजित पवार यांच्या प्रश्नाला शरद पवार यांचं उत्तर. 'प्रफुल्ल पटेलांना 10 वर्ष केंद्रात मंत्रिपद', 'पराभवानंतर पटेलांना राज्यसभेत पाठवलं','सुप्रिया सुळेंना मंत्रिपद दिलं नाही',
सर्व बंडखोरांचा पराभव होईल', शरद पवार यांचं वक्तव्य.बातमी पाहा- ना टायर्ड हूं ना रिटायर हूं; वयाच्या मुद्द्यावर शरद पवार यांचा अजित पवार यांना टोला
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'नाशिकमध्ये येताना वरुणराजाकडून स्वागत', 'वस्तूस्थिती मांडण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करणार', 'महाराष्ट्रासह 3 राज्यांचा दौरा करणार', 'नाशिक शहराला ऐतिहासिक महत्त्व','यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श','जनतेसमोर वस्तूस्थिती मांडणार', 'भुजबळांना येवल्यात मीच पर्याय दिला', 'ओळखीचे चेहरे दिसल्यानं आत्मविश्वास वाढला', शरद पवार यांचं वक्तव्य.
Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'अजित पवार आमचे नवे साथी, जुने मित्र', 'गडचिरोलीच्या पावणे सात लाख लोकांना लाभ', 'लोकांच्या दारी आपलं सरकार', 'अतिदुर्गम भागातील लोकांपर्यंत योजनांचा लाभ',गडचिरोलीत 20 हजार कोटींची गुंतवणूक आणली 'विकासाचा त्रिशूळ राज्याची गरीबी दूर करणार', 'विरोधकांचा खाक करणार त्रिशूळ', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका.
अजितदादांनी राष्ट्रवादीत परत यावं- जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad on Ajit Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना भावनिक साद घातलीय.. अजित पवारांनी परत यावं, पाहिजे तर मी सगळं सोडून जातो असं आवाहन जितेंद्र आव्हाडांनी केलंय.. तुम्ही परत या मात्र शरद पवारांना त्रास देऊ नका अशी भावनिक साद आव्हाडांनी घातलीय..
बातमी पाहा- मी, जयंत पाटील पक्ष सोडतो! अजित पवार तुम्ही परत या; आव्हाडांची भावनिक साद
अमरावतीत झळकले उद्धव ठाकरेंचे 'भावी पंतप्रधान' आशयाचे बॅनर
Amravati Uddhav Thackeray Banner : अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी लावलेले पोस्टर्स चर्चेचा विषय ठरलेत. कारण उद्धव ठाकरेंचा उल्लेख भावी पंतप्रधान असा करण्यात आलाय. उद्धव ठाकरे येत्या 9 आणि 10 तारखेला विदर्भ दौ-यावर येतायत.. तर अमरावतीत ते 10 जुलैला येणार आहेत. त्याआधीच भावी पंतप्रधान असा मजकूर लिहून अमरावतीत पोस्टर्स लावण्यात आलेत.
बातमी पाहा- Uddhav Thackeray पंतप्रधान होणार? अमरावतीत झळकले बॅनर्स; पाहा व्हिडीओ
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदारांना नोटीस बजावली
Maharashtra Political Crisis : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदारांना नोटीस बजावली आहे. एकनाथ शिंदेंसह 40 आमदार तसंच ठाकरे गटाच्या 14 आमदारांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.. अपात्रतेसंदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी ही नोटीस आहे. येईल.. अपात्रतेविरोधातली कारवाई टाळण्यासाठी या सर्व आमदारांना पुरावे सादर करावे लागणार आहेत. तसंच आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी 7 दिवसांची मुदतही देण्यात आलीय... निवडणूक आयोगाने याआधी विधीमंडळाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवली होती. तेव्हा विधानसभा अध्यक्षही शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करुन यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे...
तुळजाभवानीची अभिषेक पूजा महागली
Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पुजेसाठी आता भक्तांना 500 रुपये मोजावे लागणार आहेत. पूजेसाठी पूर्वी 50 रुपये शुल्क आकारले जात होते... आता यात वाढ करून ती 10 पट करण्यात येणारेय. विश्वस्त आणि मंदीर संस्थानच्या कोट्यातील मोफत VIP थेट दर्शनासाठी 200 रुपये. तर नियमित VIP दर्शनासाठी 500 रुपये शुल्क आकारण्यात येणारेय. विश्वस्तांच्या कोट्यातील मोफत VIP दर्शनही बंद होणार आहे. 10 जुलैपासून या नव्या शुल्काची अंमलबजावणी होणारेय. मंदिर संस्थांच्या विश्वस्तांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.
बातमी पाहा- तुळजाभवानीच्या पूजा झाली महाग; भाविकांना मोजावे लागणार इतके रुपये
संजय राऊतांची एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांना भावनिक साद
Sanjay Raut on Shinde Group MLA : संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांना साद घातलीय. मी बाजूला होता, ठाकरेंकडे तुम्ही परत येताय का असा सवाल संजय राऊतांनी शिंदेंसह 40 आमदारांना विचारलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही राऊतांनी टीकास्त्र सोडलंय. उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सर्व पदं दिली, आमदारकी दिली. मात्र शिंदेंनी गद्दारी केल्याचा आरोप राऊतांनी केलाय..
बातमी पाहा- परत येता का? संजय राऊत एकनाथ शिंदे यांना म्हणाले...
विधानसभा अध्यक्ष शिवसेना आमदारांना नोटीस बजावणार
Maharashtra Political Crisis : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदारांना नोटीस बजावणार आहेत.. एकनाथ शिंदेंसह 40 आमदार तसंच ठाकरे गटाच्या 14 आमदारांना ही नोटीस बजावण्यात येणार आहे.. अपात्रतेसंदर्भात आपलं म्हणणं मांडण्यासाठी ही नोटीस बजावण्यात येईल.. अपात्रतेविरोधातली कारवाई टाळण्यासाठी या सर्व आमदारांना पुरावे सादर करावे लागणार आहेत. तसंच आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी 7 दिवसांची मुदतही देण्यात येणार आहे.. निवडणूक आयोगाने याआधी विधीमंडळाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवली होती. तेव्हा विधानसभा अध्यक्षही शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करुन यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
बातमी पाहा- शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार? विधानसभा अध्यक्ष बजावणार नोटीस
लोणावळ्यात हुल्लडबाज पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर
Maval Stunt : लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या हुल्लडबाज पर्यटकांवर आता पोलिसांची करडी नजर असणाराय. पर्यटनस्थळी साध्या वेशात पोलीस गस्त घालणार आहेत. त्यामुळे हुल्लडबाजी, स्टटंबाजी करताना कोणी आढळल्यास त्यांना थेट तुरुंगात जावं लागणाराय. भुशी डॅमसह परिसरातील धबधब्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. काही हुल्लडबाजांमुळे इतर पर्यटकांना नाहक त्रास होत असतो. तर स्टंटबाजीमुळे अनेक जण जीव गमावतात. अशा पर्यटकांवर आता पोलीस कारवाई करणार आहे.
येवल्यात छगन भुजबळांच्या बॅनरवरून शरद पवारांचा फोटो गायब
Chhagan Bhujbal Banner : येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या येवल्यातील संपर्क कार्यालयावर शुभेच्छा देणारे बॅनर लागले होते. माझा फोटो लावू नये असे सांगून देखील या बॅनर पवारांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र सकाळी लावलेल्या बॅनरवरील फोटोसंध्याकाळी अचानक काढण्यात आले..
मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री गडचिरोली दौऱ्यावर
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही आज एकत्र गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. 'शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी हे तिघेही गडचिरोली येथे उपस्थित राहणार आहेत. कोटगल एमआयडीसीच्या क्रीडांगणावर हा कार्यक्रम होणार आहे...उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांचा हा पहिला शासकीय दौरा असरणार आहे. अजित पवार यांची शिंदे फडणवीस सरकारमध्ये एन्ट्री केल्यानंतर राज्याच्या सर्वात दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यात हे तिन्ही नेते पोहोचणार आहेत. या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ आणि दाखल्यांचे वितरण केले जाणाराय...
पुण्यात दरोडेखोरांचा पोलिसांवर कोयत्यानं हल्ला
Pune Crime : पुण्यात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्यानं पोलिसांवरच हल्ला केलाय. वारजे परिसरात ही घडना घडलीये. कोंबिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांना 8 ते 10 संशयित फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. दरोडेखोरांच्या कोयता हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय. अखेर या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. दरम्यान या टोळीतील 5 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. तर इतरांचा शोध पोलीस घेत आहेत.
बातमी पाहा- 10 दरोडेखोरांकडून पोलिसांवर कोयत्याने हल्ला! पोलिसांचा गोळीबार; 5 अटकेत
येवल्यात शरद पवारांची आज सभा
Sharad Pawar : भुजबळांचा मतदारसंघ येवल्यात आज शरद पवारांची जाहिर सभा होणार आहे. त्यासाठी शरद पवार सकाळी रवाना होतील. जाताना विविध ठिकाणी कार्यकर्ते त्यांचं स्वागत करणारेत. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेडमध्ये या सभेची तयारी करण्यात आलीये.. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. या सर्व आरोपांना पवार आजच्या सभेत काय उत्तर देणार? भुजबळ आणि अजित पवारांबाबत काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. दरम्यान पवारांच्या आजच्या सभेत महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते सहभागी होणार आहे.
बातमी पाहा- Chhagan Bhujbal यांच्या बालेकिल्ल्यात Sharad Pawar यांची एंट्री; पवार थोपटणार दंड
नाशिकमध्ये छगन भुजबळ आज शक्तिप्रदर्शन करणार
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये छगन भुजबळ आज शक्तिप्रदर्शन करणार आहेत.. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच नाशिकमध्ये पोहचणार आहेत. यावेळी मुंबई ते नाशिकदरम्यान ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे.. नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयात भाषण करतील आणि त्यानंतर पत्रकार परिषदही घेतील.. यावेळी ते काय बोलणार याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.
बातमी पाहा- एकीकडे शरद पवार तर दुसरीकडे छगन भुजबळ; ऐन पावसात नाशिक तापणार