Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Oct 08, 2023, 22:35 PM IST
Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

8 Oct 2023, 22:31 वाजता

शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी लांबणीवर

 

Uddhav Thackeray vs Eknath Shinde :  शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर. आता सुप्रीम कोर्टात 11 ऑक्टोबरला  सुनावणी होणार. 10 ऑक्टोबरची सुनावणी एका दिवसानं पुढं ढकलली. याआधी 18 सप्टेंबरला झाली होती शेवटची सुनावणी. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात दाखल केलीय याचिका...

8 Oct 2023, 22:07 वाजता

वर्ल्ड कपमध्ये भारताचा दणदणीत विजय

 

IND vs AUS : वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी सलामी. पहिल्याच मॅचमध्ये कांगारूंना चारली पराभवाची धूळ. 6 विकेट राखून भारत विजयी. विराट कोहली, के. एल. राहुल ठरले विजयाचे शिल्पकार. चौथ्या विकेटसाठी कोहली-राहुल यांची १६५ रन्सची पार्टनरशीप.  के. एल. राहुल ९७ रन्सवर नाबाद, तर विराटनं केल्या ८५ रन्स. ३ बाद २ रन्स अशा सुरूवातीच्या पडझडीनंतर भारताचा रोमहर्षक विजय. ऑस्ट्रेलियाचा डाव 199 रन्सवर आटोपला. भारतानं 41.2 ओव्हर्समध्ये गाठलं २०० रन्सचं विजयाचं लक्ष्य. 

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

 

8 Oct 2023, 20:26 वाजता

पिंपरीत अजित पवारांना धक्का?

 

Ajit Pawar : पिंपरी चिंचवड म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला... मात्र याच बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी सिनिअर पवारांनी मोठा डाव टाकलाय... पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आझम पानसरे यांनी रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

8 Oct 2023, 19:36 वाजता

फडणवीसांवर अदृश्य शक्तींनी अन्याय केला- सुप्रिया सुळे

 

Supriya Sule on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्यावर अदृश्य शक्तींनी अन्याय केलाय...साधं पालकमंत्री कोण करायचा यासाठी यांना दिल्लीला जावं लागतं...असा खोचक टोला सुप्रिया सुळेंना फडणवीसांना लगावलाय...तर राज्यात विरोधी पक्षांमधील नेत्यांवरही अन्याय होत असन, 90 ते 95 टक्के केसेस विरोधी पक्षातील नेत्यांवर आहेत...भाजपच्या वॉशिंग मशीनमधून स्वच्छ झाल्यानंतर केसेस विरघळून जातात असा टोलाही त्यांनी लगावला..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

8 Oct 2023, 19:11 वाजता

मनसे पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक

 

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या मनसे पदाधिका-यांची बैठक बोलावली आहे. सकाळी 9 वाजता शिवतीर्थवर ही बैठक होणार आहे. लोकसभा निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होतेय. यात राज ठाकरे लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या लोकसभानिहाय बैठका सुरू आहेत. तर मनसे नेत्यांना राज यांनी लोकसभानिहाय जबाबदा-या सोपवल्या आहेत. 

8 Oct 2023, 18:30 वाजता

आरोग्य खात्याची श्वेतपत्रिका काढा- बाळासाहेब थोरात

 

Balasaheb Thorat :  काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ गट नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांना पत्र पाठवलंय.'राज्यात आरोग्य व्यवस्था कोलमंडली आहे याबाबत लक्ष द्यावे,' 'आरोग्य खात्याची श्वेतपत्रिका काढा',काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी.

8 Oct 2023, 18:12 वाजता

राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कुणाचं यावर उद्या सुनावणी

 

Sharad Pawar vs Ajit Pawar : पवार विरुद्ध पवार हा संघर्ष उद्या पुन्हा निवडणूक आयोगात रंगणार आहे. राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाचं यावर ६ ऑक्टोबरपासून निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू झालीय. गेल्या शुक्रवारी अजित पवार गटाचा युक्तिवाद झाला. या दरम्यान दोन्ही गटांनी पक्ष आपलाच असल्याचे दावे केले. तर अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलं जाऊ नये, अशी मागणी शरद पवारांनी केलीय. शुक्रवारच्या सुनावणीला स्वतः शरद पवार उपस्थित होते. तर वकिलांनी अजित पवार गटाची बाजू मांडली. आता उद्या दुपारी ४ वाजता सुरू होणा-या सुनावणीत शरद पवार गट युक्तिवाद करणार आहे. 

8 Oct 2023, 17:34 वाजता

ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर?

 

Uddhav Thackeray on Dasara Melava  : दस-याला शिवतीर्थावर भेटायचंय, असं उद्दव ठाकरेंनी शिवसैनिकांना सांगितलंय. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा ठाकरेंचा होणार की शिंदेंचा यावर अजून निर्णय झालेला नाही, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय. उत्तर मध्य मुंबईचे भाजप सचिव अॅडव्होकेट सुधीर खातू यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश झाला. प्रवाहाविरोधात खातूंनी ठाकरे गटात प्रवेश केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन आणि स्वागत केलं. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

8 Oct 2023, 17:03 वाजता

अजित पवार गट सुप्रीम कोर्टात 

 

Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादी कुणाची? हा वाद शिगेला पोहचलेला असतानाच आता शरद पवार गटानंतर अजित पवार गटानेही सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये अशी विनंती अजित पवार गटाने केलीय. अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल दाखल करण्यात आलंय. अजित पवारांच्या गटातील आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत.. अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आलीय. या प्रकरणाची सुनावणी उद्या म्हणजे 9 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्यामुळेच अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल करण्यात आलंय. 

8 Oct 2023, 16:38 वाजता

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव

 

Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा मार्ग मोकळा झालाय. विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलाय अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिलीय. नुकताच विमानतळ कृती समितीची बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकी आधी केंद्र सरकारकडून प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली जाईल अशी माहितीही कपिल पाटील यांनी दिलीय.