10 Oct 2023, 20:10 वाजता
महाबळेश्वरमध्ये सेल्फी काढताना दरीत कोसळून महिलेचा मृत्यू
Mahabaleshwar Accident : महाबळेश्वर येथे सेल्फी काढताना दरीत कोसळून महिलेचा मृत्यू झालाय... महाबळेश्वरच्या केट्स पॉइंट वर ही दुर्घटना घडली... सेल्फी काढताना तोल जाऊन दरीत कोसळल्याने या महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. अंकिता गुरव असं या मृत महिला पर्यटकाचे नाव असून धाराशिव येथून ती पती सोबत महाबळेश्वरला फिरायला आली होती. या महिलेचा मृतदेह महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स, यांनी बाहेर काढला.. मृतदेह शव विच्छेदनसाठी पाठवून देण्यात आलाय...
10 Oct 2023, 19:13 वाजता
ड्रग्ज तस्कर भूषण पाटीलला वाराणसीतून बेड्या
Drug Smuggler Bhushan Patil Arrested : ड्रग तस्कर भूषण पाटीलला वाराणसीतून बेड्या ठोकण्यात आल्यायत. पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केलीय. भूषण पाटील हा ड्रग्ज तस्कर ललित पाटीलचा भाऊ आहे. भूषण पाटील याचा ड्रग्स बनवण्याचा कारखाना होता. मुंबई, पुणे पोलीस, नाशिक पोलीस त्याच्या मागावर होते. नाशिकमधून ३०० कोटीचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. ललित पाटील आणि भूषण पाटील हे एम डी ड्रग्स बनवत होते
10 Oct 2023, 18:10 वाजता
अजित पवारांचा पुणे जिल्हा बँक संचालकपदाचा राजीनामा
Ajit Pawar : अजित पवारांनी राजीनामा दिलाय. अजित पवारांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिलाय. उपमुख्यमंत्रिपदाचा वाढता व्याप लक्षात घेता अजितदादांनी राजीनामा दिलाय. दहा दिवसांपूर्वीच अजित पवार या जबाबदारीतून पदमुक्त झालेत. उपमुख्यमंत्रीपद आणि पक्ष संघटनेची जबाबदारी सांभाळताना बँकेसाठी वेळ देणं शक्य नसल्याचं कारण
अजित पवारांनी राजीनामा दिलाय. आता अजित दादांऐवजी त्यांचा मुलगा पार्थ पवार संचालकपद सांभाळणार असल्याची चर्चा आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
10 Oct 2023, 17:20 वाजता
ड्रग्जमाफिया ललित पाटीलसाठी दादा भुसेंचा ससून रुग्णालयाला फोन- सुषमा अंधारे
Sushma Andhare : ड्रग्जमाफिया ललित पाटीलसाठी दादा भुसेंनी ससून रुग्णालयाला फोन केला होता, असा मोठा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. ड्रग्जमाफिया ललितला ससूनमध्ये अॅडमिट करण्यासाठी भुसेंनी फोन केला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा, असं अंधारेंनी म्हटलंय. ललित पाटील ससूनमध्ये अॅडमिट असताना तिथूनच तो ड्रग्ज रॅकेट चालवायचा... ससून हॉस्पिटलच्या बाहेर ड्रग्ज सापडलं होतं. तसंच ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील वरिष्ठांना रोज ७० हजारांची लाच देत होता
10 Oct 2023, 17:09 वाजता
ड्रग्ज माफिया ललित पाटीलमागे शिंदे गटाचा मंत्री- रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar ON Pune Drug Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार झाल्याच्या वादाला आता राजकीय वळण लागलंय.. ललित पाटील प्रकरणात शिंदे गटाचा एक मंत्री सामील असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय.. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी धंगेकरांनी केलीय... ससून रुग्णालयातून आरोपी पळून जाण्याच्या प्रकाराबाबत आमदार रवींद्र धंगेकर यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतलं. धंगेकर यांनी दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
10 Oct 2023, 16:10 वाजता
निफाडमध्ये दुधाचा भेसळयुक्त साठा जप्त
Adulterated Stock of Milk Seized in Niphad : नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये दुधाचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला... गायीचं सुमारे 420 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं... अन्न आणि औषध प्रशासनानं अतुल कातकाडे याच्या घरात ही कारवाई केली... यावेळी तब्बल 48 हजार रुपयांचं भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आलं.. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय..
10 Oct 2023, 14:59 वाजता
Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today : 'राज्यात लेक लाडकी लखपती योजना','राज्यात महिला सक्षमीकरण धोरण राबवणार', 'मुलींच्या शिक्षणाची चिंता मिटणार','घृष्णेश्वर सप्तश्रृंगी मंदिराचा विकास होणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती.
10 Oct 2023, 13:39 वाजता
मराठी मुद्दा पुन्हा पेटला
Ghatkopar MNS Agitation : मुलुंड पाठोपाठ आता घाटकोपरमध्येही मराठी मुद्दा चांगलाच जोर धरतोय. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरमध्ये एका उद्यानाचा मारो घाटकोपर हा गुजराती बोर्ड तोडल्यानंतर आता मनसे कार्यकर्त्यांनी घाटकोपरच्या विविध ठिकाणी असलेले गुजराती बोर्ड तोडण्यास सुरुवात केलीय. काल रात्री घाटकोपर पूर्वेकडील आर बी मेहता मार्गावरच्या चौकाला देण्यात आलेल्या गुजराती नावाचा फलक मनसे कार्यकर्त्यांकडून तोडण्यात आला.त्यामुळे घाटकोपरमध्ये काहीसं तणावाचे वातावरण निर्माण झालंय. या मराठी-गुजराती वादात सुरू असलेल्या तोडफोडीचा भाजपकडून निषेध करण्यात आलाय. हे फलक पुन्हा लावण्यात यावेत अशी मागणी भाजप नेत्यांनी केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Oct 2023, 12:35 वाजता
अमरावतीत पुन्हा यशोमती विरुद्ध अनिल बोंडे
Anil Bonde Vs Yashomati Thakur : काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना भाजप खासदार अनिल बोंडेंची जीभ घसरली.. इंग्रजांची चाकरी केल्यानं ठाकूरांना ठाकूर पदवी मिळाल्याचं वादग्रस्त विधान बोंडेंनी केलंय. काँग्रेसचा डीएनएचा महात्मा गांधीचा नाही तर तो फिरोज जहांगीर गांधींचा आहे असंही विधान बोंडेंनी केलंय. यावरच आता यशोमती ठाकूर यांनी जोरदार पलटवार केलाय.. अनिल बोंडे नैराश्येत गेल्याची टीकाही ठाकूर यांनी केलीय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Oct 2023, 11:46 वाजता
हल्ले थांबवा, नाहीतर ओलिसांना ठार करू, हमासचा इस्रायलला इशारा
Hamas Warnning Israel : गाझातले हल्ले थांबवा नाहीतर आमच्या ताब्यातल्या ओलिसांना ठार करु असा इशारा हमासने इस्रायलला दिलाय.. इस्रायलमध्ये घुसल्यानंतर हमासने 130 पेक्षा जास्त नागरिकांचं अपहरण केलं होतं.. यात तरुण-तरुणी तसंच वृद्ध नागरिकांचाही समावेश आहे.. या नागरिकांना हमासने गाझापट्टीतल्या बोगद्यांमध्ये ठेवलंय. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या हल्ल्यानंतर आता या ओलिसांचा वापर हमास ढाल म्हणून करतंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा - हमासचा इस्रायालला इशारा