10 Oct 2023, 11:46 वाजता
हल्ले थांबवा, नाहीतर ओलिसांना ठार करू, हमासचा इस्रायलला इशारा
Hamas Warnning Israel : गाझातले हल्ले थांबवा नाहीतर आमच्या ताब्यातल्या ओलिसांना ठार करु असा इशारा हमासने इस्रायलला दिलाय.. इस्रायलमध्ये घुसल्यानंतर हमासने 130 पेक्षा जास्त नागरिकांचं अपहरण केलं होतं.. यात तरुण-तरुणी तसंच वृद्ध नागरिकांचाही समावेश आहे.. या नागरिकांना हमासने गाझापट्टीतल्या बोगद्यांमध्ये ठेवलंय. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या हल्ल्यानंतर आता या ओलिसांचा वापर हमास ढाल म्हणून करतंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा - हमासचा इस्रायालला इशारा
10 Oct 2023, 11:22 वाजता
दीपक केसरकर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक?
Deepak Kesarkar : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे संकेत दीपक केसरकर यांनी दिलेत. आपल्याला उमेदवारी मिळाल्यास धनुष्यबाण चिन्हावरच मिळेलच असं केसरकर म्हणाले.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Oct 2023, 11:20 वाजता
डीएसकेंच्या आणखी 19 मालमत्ता होणार जप्त
Pune DSK Property Seized : 'डीएसके'च्या आणखी 19 मालमत्ता जप्त होणार आहेत. तपासात आढळून आलेल्या मालमत्तेबाबत आता नव्याने कारवाई करण्यात येतेय. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डीएसकेंच्या आत्तापर्यंत 335 स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केल्यात. डीएसकेंच्या विविध कंपन्या आणि खासगी वापराची 46 वाहनंही पोलिसांनी जप्त केलीयत. त्यातल्या 13 वाहनांचा लिलावही झालाय.. आत्तापर्यंत 12 कोटी 9 लाख 74 हजारांची रक्कम न्यायालयात जमा करण्यात आलीय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Oct 2023, 11:10 वाजता
पिंपरी-चिंचवड मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस
Pimpri-Chinchwad Municipal Corporation : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या साडेसहा हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस मिळणार आहे. दिवाळीसाठी 40 हजार ते अडीच लाखांपर्यंत कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी ही घोषणा केली. जवळपास ५५ कोटींच्या बोनसची घोषणा करण्यात आलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Oct 2023, 10:06 वाजता
इस्रायलशी चर्चेसाठी हमास तयार
Hamas : इस्रायलशी युद्धबंदीसाठी तयार असल्याचं हमासने म्हटलंय. राजकीय चर्चेद्वारे तोडगा काढू असा प्रस्ताव हमासने दिलाय. उद्दीष्ट साध्य झाल्याचं हमास म्हणत असलं तरी इस्रायलने आता हिंसक प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केल्यावर हमास गुडघ्यावर आल्याचं दिसतंय. गाझा पट्टीची इस्रायलने कोंडी केलीय. अत्यावश्यक सुविधा तोडल्या आहेत, रसद बंद झालीय. त्यातच इस्रायली दिवसरात्र हवाई हल्ले, रॉकेट हल्ले करत गाझा पट्टी बेचिराख करत आहेत. त्यामुळे हमास गुडघ्यावर आल्याचं दिसतंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Oct 2023, 09:51 वाजता
मुंबईकरांना टोलपासून मुक्ती मिळणारच नाही
Mumbai Toll Naka : मुंबईकरांना टोलमुक्ती मिळणारच नाहीए... सप्टेंबर 2027 पर्यंत मुंबईकरांना टोल भरावाच लागणार आहे.. मुंबईच्या वेशींवर दहिसर, मुलूंड, ऐरोली, वाशी तसंच लाल बहादूर शास्त्री मार्गावर टोल आकारला जातो.. या पाचही टोलनाक्यांचं कंत्राट न करता येण्याजोगे एकत्रित पद्धतीचे करण्यात आलेलं आहे.. कायदेशीररित्या कंत्राटदाराची करारात ठरलेली रक्कम मिळाल्याशिवाय टोल रद्द होऊ शकणार नाही अशी माहिती MSRDC च्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Oct 2023, 09:49 वाजता
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात साप
Navi Mumbai Gautami Patil : नवी मुंबईतील कामोठे मानसरोवर परिसरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं... मात्र या कार्याक्रमात अचानक सापानं एंट्री घेतली आणि एकच गोंधळ उडाला.. तरुणांनी खुर्च्यांची मोडतोड करत एकच गोंधळ घातला.. या तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.. एका सर्पमित्रानं अखेर हा साप पकडला... कामोठे मानसरोवर परिसरात राष्ट्रवादीचे संघटक राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Oct 2023, 08:42 वाजता
नागपुरात गरबावरुन नवा वाद?
Nagpur Viswa Hindu Parishad : नागपुरात गरबावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.. कारण गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या. गरबा कार्यक्रमासाठी प्रवेश देताना सर्वांचे आधार कार्ड तपासा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केलीय. तेव्हा या मागणीने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.. गरबा कार्यक्रमात अनेक इतर धर्मीय तिथे प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Oct 2023, 08:38 वाजता
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वाची बैठक
Maratha Reservation : मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्वाची बैठक होणाराय... चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील कार्यालयात दुपारी तीन वाजता ही बैठक पार पडणाराय... मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर न्या. संदीप शिंदे आयोगानं मराठवाड्यात मराठा समाजाचे पुरावे गोळा करण्यासाठी नेमकं काय केलं, याचा आढावा यावेळी घेतला जाऊ शकतो. त्याशिवाय मराठा समाजासाठी राबवण्यात येणा-या सुविधा किती जणांपर्यंत पोहोचल्या, आणखी नवीन काही सुविधा मराठा समाजासाठी सुरू करता येतील का, याबाबतही आज चर्चा होण्याची शक्यता आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Oct 2023, 08:19 वाजता
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेववर दरवर्षी 1200 कोटींची वसुली?
Mumai-Pune Express Way Toll : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर दरवर्षी 1 हजार 200 कोटींची टोलवसुली होत असल्याचं आकडेवारीवरून जाहीर होतंय. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे 1999 साली बांधण्यास सुरूवात झाली. त्याच्या बांधकामाला 5000 कोटी खर्च झाले मात्र 2002 ते 2023 या काळात तब्बल 22 हजार कोटींचा टोल वसूल झाला असण्याची शक्यता आहे. रस्त्याचं बांधकाम, देखभाल, दुरूस्तीचा खर्च, टोल वसुलीचा खर्च आणि व्याज नेमकं किती याची माहिती रस्ते विकास महामंडळाने जाहीर केलेली नाही. त्यामुळे हा टोल आणखी किती वर्षे वसूल करण्यात येणार हे अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे सरकारने ही माहिती जाहीर करावी अशी मागणी केली जातेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -