Sharad Pawar Visits Kalani House : शरद पवारांनी कलानी यांच्या घरी भेट दिली

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Sharad Pawar Visits Kalani House : शरद पवारांनी कलानी यांच्या घरी भेट दिली

12 Feb 2024, 23:45 वाजता

शरद पवारांनी कलानी यांच्या घरी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा

 

Sharad Pawar Visits Kalani House : उल्हासनगर शहरात पप्पू कलानी यांच्या मुलाने खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केलाय.. असं असताना शरद पवारांनी कलानी यांच्या घरी भेट दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. माजी आमदार पप्पू कलानी हे शरद पवारांचे एकेकाळचे निष्ठावंत आणि जवळचे सहकारी आहेत. 

 

 

12 Feb 2024, 23:32 वाजता

राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी पूर्ण, निकाल 15 फेब्रुवारीआधी

 

Disqualification of Nationalist MLA : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 15 फेब्रुवारीपूर्वी दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच ही माहिती दिलीय. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण झालीय. 

 

 

12 Feb 2024, 21:21 वाजता

राणा दाम्पत्य दलबदलू- यशोमती ठाकूरांची टीका तर यशोमती ठाकूरांचा भाजपला आतून पाठिंबा असल्याचा राणांचा गौप्यस्फोट

 

Rana Vs Yashomati Thakur : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूरांमध्ये चांगलीच जुंपलीय. राणा दाम्पत्य वायफळ बडबड करतंय. ते स्वत: दलबदलू आहेत. अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली केलीय. यशोमती ठाकूरांचा भाजपला आतून पाठिंबा असून लवकरच तिवसा मतदारसंघात चमत्कार पाहायला मिळेल असा गौप्यस्फोट रवी राणांनी केला होता. त्याला यशोमती ठाकूरांनी प्रत्युत्तर दिलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

12 Feb 2024, 19:43 वाजता

अशोक चव्हाणांनी रिपब्लिकन पक्षात यावं, रामदास आठवलेंचं आवाहन

 

Ramdas Athawale on Ashok Chavan : अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडून चांगला निर्णय घेतलाय असं सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी अशोक चव्हाणांचं अभिनंदन केलंय. चव्हाणांनी आपल्या पक्षात यावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय. याआधी रामदास आठवलेंनी छगन भुजबळ आणि नारायण राणेंनाही पक्षात येण्याचीही ऑफर दिली होती. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

12 Feb 2024, 18:43 वाजता

महाराष्ट्रातल्या एका नेत्याच्या कार्यशैलीमुळेच अशोक चव्हाण त्रासले होते, संजय निरूपम यांचं ट्विट

 

Sanjay Nirupam Tweet : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामागे ईडी कारवाईला जबाबदार धरता येणार नाही. महाराष्ट्रातल्या एका नेत्याच्या कार्यशैलीमुळेच अशोक चव्हाण त्रासले होते असं ट्विट काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केलंय. चव्हाणांनी वरिष्ठ नेतृत्वाला याबाबत वारंवार माहितीही दिली होती. त्यांची तक्रार गांभीर्यानं घेतली असती तर ही वेळच आली नसती असही संजय निरूपम यांनी म्हंटलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

12 Feb 2024, 17:57 वाजता

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये काँग्रेसची बैठक सुरू

 

Congress Meeting : अशोक चव्हाणांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडची बैठक सुरू झालीय. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी महत्त्वाची बैठक सुरू झालीय. या बैठकीला सोनिया गांधी, के. सी. वेणूगोपाल, मुकूल वासनिक उपस्थित आहेत. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. चव्हाणांच्या राजीनाम्यासह महाराष्ट्रातल्या घडामोडींवर चर्चा सुरू आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

12 Feb 2024, 17:27 वाजता

भाजप 40 पारही पोहोचणार नाही म्हणून फोडाफोडी - उद्धव ठाकरे

 

Uddhav Thackeray on Ashok Chavan : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. एकीकडे मोदी अब की बार 400 पार म्हणतायेत, मात्र राज्यात चाळिशीही पार होत नसल्यानं फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. काँग्रेसमुक्त भारत नव्हे काँग्रेसव्याप्त भाजप अशी स्थिती आहे असा टोलाही त्यांनी लगावलाय. तर अशोक चव्हाण कालपर्यंत जागावाटपात हिरीरीनं भाग घेत होते, मग अचानक काय झालं, चव्हाणांना राज्यसभा उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू असल्याचंही ठाकरेंनी म्हंटलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

12 Feb 2024, 14:00 वाजता

जनाधार असलेल्या नेत्यांची काँग्रेसमध्ये घुसमट - फडणवीस

 

Devendra Fadanvis On Congress : काँग्रेसमध्ये जनाधार असलेल्या नेत्यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत आहे. त्यामुळे हे नेते भाजपात येण्याच्या तयारीत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मात्र अशोक चव्हाणांबाबत बोलताना हे मीडियातूनच कळलं असल्याचा मिश्कील टोलाही त्यांनी दिला.  आगे आगे देखो होता है क्या असं सांगत राज्याच्या राजकारणातली उत्सुकता आणखीनच वाढवलीय. 

12 Feb 2024, 13:53 वाजता

अशोक चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामा

 

Ashok Chavan : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप आलाय.. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिलाय. अशोक चव्हाणांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे जाऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारलाय.. चव्हाण भाजपत प्रवेश करणार हे आता जवळपास निश्चित झालंय. चव्हाण दिल्लीत जाऊन भाजप प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात आलीय.. 

बातमी पाहा - महाराष्ट्रात राजकीय भूकंप! अशोक चव्हाणांचा काँग्रेसमधून राजीनामा

12 Feb 2024, 12:25 वाजता

शिर्डीवरुन मविआत रस्सीखेच

 

Shirdi : शिर्डीच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच पहायला मिळतेय. उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौ-यानंतर 13 आणि 14 फेब्रुवारीला आहमदनगरच्या दौ-यावर आहेत. यावेळी ते शिर्डी लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणारेत. तर सोनई, नेवासा, श्रीरामपूर, राहुरीमधल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत...तर बुधवारी कोपरगाव, अकोले, संगमनेर येथे त्यांच्या सभा होणारेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा -