Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

12 Jun 2024, 21:09 वाजता

'4 महिन्यात सरकार बदलायचंय', शरद पवारांनी फुंकलं निवडणुकीचं रणशिंग

 

Sharad Pawar : 4 महिन्यात सरकार बदलायचंय... तुमची साथ हवी... अशी साद शेतक-यांना घालत शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे... शरद पवार आज इंदापूरमधल्या निरवांगी इथे दुष्काळ पाहणी दौ-यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी इथल्या ग्रामस्थांचे प्रश्न जाणून घेतले.. तेव्हाच ग्रामस्थांसोबत संवाद साधताना पवारांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.. त्यासोबतच दुधाला अनुदान न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्याचा निर्धारही पवारांनी बोलून दाखवलाय..

 

12 Jun 2024, 20:38 वाजता

बच्चू कडू विधानसभा स्वबळावर लढणार

 

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा विधानसभेला एकला चलो चा नारा...बच्चू कडू विधानसभेसाठी 20 जागा लढवणारेत...महायुतीतून बच्चू कडू निवडणूक लढवणार नाहीयेत...नागपूरमध्ये ते बोलत होते...बैठकीमध्ये विधानसभेबाबत निर्णय होणार असल्याचं बच्चू कडू म्हणालेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

12 Jun 2024, 20:17 वाजता

 पुरुषोत्तम पुट्टेवार हिट अँड रन हत्या प्रकरण, पुट्टेवार जादूटोणा करत असल्याचा सूनेचा आरोप

 

Nagpur Hit and Run Case : पुरुषोत्तम पुट्टेवार हिट अँड रन हत्या प्रकरण अर्चना पुट्टेवार यांनी मोठा आरोप केलाय... सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार खूप धार्मिक वृत्तीचे होते, ते अति जास्त पूजा पाठ करायचे, ते जादूटोणाचाही वापर करायचे असा संशय अर्चना यांनी व्यक्त केलाय...अर्चना पुट्टेवार यांचा एक भाऊ आणि बहीण या दोघांचे काही वर्षांपूर्वी अकाली मृत्यू झाला असे ही अर्चना यांनी पोलीस चौकशीत सांगितल्याची माहिती आहे..

12 Jun 2024, 19:16 वाजता

'आमदार संदीप धुर्वेंनी मिशी काढावी', खासदार  प्रतिभा धानोरकरांकडून धुर्वेंचा समाचार

 

Prathibha Dhanorkar on Sandeep Dhurve : आमदार संदीप धुर्वे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मिशा काढावी, असा चिमटा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काढला. काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकरांचं आर्णी विधानसभेतील विकासकामं दाखवली तर मिशी काढू, असं विधान भाजप आमदार डॉक्टर संदीप धुर्वेंनी केलं होतं. या विधानाची आज खासदार धानोरकरांनी आठवण करून दिलीय

12 Jun 2024, 18:07 वाजता

'मुख्यमंत्र्यांचे ओएसडी षडयंत्र रचतायत', मनोज जरांगेंचा आरोप

 

Manoj Jarange on CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी षडयंत्र रचत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय... थोड्याच दिवसात त्यांचं षडयंत्र उघडं पाडण्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मराठा आरक्षण मिळाल्यावरच उपोषण स्थगित करणार.. जर सरकार असंच खेळवत राहिल तर मात्र विधानसभा लढणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

12 Jun 2024, 17:39 वाजता

द. कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग, 41 जणांचा मृत्यू

 

Kuwait Fire: Kuwait Fire : दक्षिण कुवेतमध्ये एका इमारतीला भीषण आग लागलीय.. यात 41 लोकांचा दुर्देवी मृत्यू झालाय.. मृतांमध्ये बहुतांश भारतीयांचाही समावेश आहे.. ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत भारतीय मजूर राहत असल्याची माहिती मिळतेय. मंजफ शहरात ही घटना घडलीय. आगीत इमारत पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती आहे... या आगीत 50 पेक्षा जास्त जण जखमी झालेत..

12 Jun 2024, 16:31 वाजता

'मिटकरी अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का?', बजरंग सोनावणेंचा अमोल मिटकरींना टोला

 

Bajrang Sonwane on Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता. त्यासंदर्भात त्यांनी ट्विटही केलं होतं.त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. यानंतर आता अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावर खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देत आपण कुठेही जाणार नसल्याचं सांगत राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच बजरंग सोनवणे यांनी ‘अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का?’, असा सणसणीत टोला लगावला आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

12 Jun 2024, 16:15 वाजता

ठाकरे गट विधानसभा स्वबळावर लढणार?

 

Thackeray Group : आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या वतीनं लढवली जाणार असली तरी 288 जागांच्या तयारीला लागा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केल्यात. शिवसेना भवनात आज राज्यभरातील 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. महाविकास आघाडीमध्ये ज्या विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे त्या जागा शिवसेना ठाकरे गट लढवेल, असं ठाकरेंनी स्पष्ट केलं. विधानसभा संपर्कप्रमुखांनी आठवडाभरात आपापल्या विधानसभेतील अहवाल सादर करण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिल्या. विधानसभानिहाय पक्षाची ताकद, संघटनात्मक बांधणी, लोकसभेच्या निकालात विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेलं मताधिक्य याबाबतचा अहवाल सादर करायचा आहे.

 

12 Jun 2024, 13:54 वाजता

सत्ता डोक्यात गेली की जनता निर्णय घेते - शरद पवार

 

Sharad Pawar : सत्ता डोक्यात गेली तर देशातील लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेतात, असा टोला शरद पवारांनी भाजपला लगावलाय. लोकसभेत भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यानं शरद पवारांनी भाजपवर सडकून टीका केलीय. तर आज आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू आणि बिहारचे नितीश कुमार नसते तर भाजप सत्तेत आली नसती, असा टोला पवारांनी भाजपला लगावलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

12 Jun 2024, 13:33 वाजता

मनसेनं महायुतीकडे 20 जागा मागितल्या?

 

MNS : महायुतीला लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेनं विधानसभेसाठी 20 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या जागा जास्तीत जास्त मुंबई आणि एमएमआर परिसरातील आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -