Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप

Sun, 12 Mar 2023-11:16 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • महाविकास आघाडीच्या राज्यभरातील 7 सभांच्या तारखा जाहीर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mahavikas Aghadi Sabha : महाविकास आघाडीच्या विभागवार जाहीर सभांच्या तारखा जाहीर झाल्यात... त्यानुसार येत्या 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरला पहिला सभा होणाराय. तर येत्या 11 जूनला अमरावतीत शेवटची सभा होणाराय. प्रत्येक विभागात एक या प्रमाणं नागपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नाशिकमध्येही महाविकास आघाडीची एकत्रित सभा होणाराय.. या सभांची जबाबदारी विशिष्ट नेत्यांवर सोपवण्यात आलीय.

    बातमी पाहा- मविआचं ठरलं, निवडणुकांसाठी मविआ लागली तयारीला, सभाचा धडाका लावणार, पाहा सभेचं वेळापत्रक

  • आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Aditya Thackeray on Eknath Shinde : 'सीएम म्हणजे करप्ट माणूस' अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला... मुंबईतील रस्त्यांच्या कामात 600 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी गोरेगावमधील शिवगर्जना अभियानात बोलताना दिला.

    बातमी- "CM म्हणजे करप्ट माणूस, सत्ता आल्यानंतर घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार ", आदित्य ठाकरेंचा CMवर निशाणा

  • मंत्री गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

     

    Gulabrao Patil : मंत्रिपद सोडण्याचा निर्णय म्हणजे सट्टा लावण्यासारखाच होता असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात केलंय.. उद्धव ठाकरे अडीच वर्षांच्या काळात लॉकडाऊन होते.. तेव्हा त्या सरकारमध्ये जलद गतीने काम करु न शकल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली.. उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असताना हातपाय जोडून त्यांना विनंती केली.. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यानं सोडून गेला असा पुनरुच्चारही गुलाबराव पाटील यांनी केलाय

  • Aditya Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'भाजप आणि गद्दारांमध्ये वाद सुरू', 'राज्यातले प्रकल्प गुजरातमध्ये हलवलं', 'मुख्यमंत्री कार्यालय दिल्लीतून चालतं', 'माझ्या समोर जी बसलीय ती शिवसेना', 'आपल्या पाठीत खंजीर खुपसला', 'आपल्या सुवर्णकाळाला दृष्ट लागली', आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटाला टोला. 

     

  • उद्धव ठाकरे लवकरच पोहरादेवी दौरा करणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा पोहरादेवीचा दौरा लवकरच ठरणार आहे. उद्या दुपारी साडे बारा वाजता मातोश्रीवर पोहरादेवीचे महंत सुनील महाराज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत उद्धव ठाकरे यांच्या पोहरा देवी दौऱ्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. महंत सुनील महाराज यांनी ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला होता. यावेळी पोहरादेवीच्या दर्शनाला येण्याचा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला होता. डिसेंबरच्या 3 तारखेला उद्धव ठाकरे यांचा दौरा निश्चित झाला होता. परंतु काही कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आला होता. मालेगावच्या सभेनंतर उद्धव ठाकरे पोहरादेवीच्या दर्शनाला जाण्याची शक्यता आहे.

    बातमी पाहा- उद्धव ठाकरे लवकरच पोहरादेवी दौरा करणार, पोहरादेवीचे महंत उद्धव ठाकरेंची भेट घेणार

  • Sheetal Mhatre Live | Marathi News LIVE Today :  'स्त्रीचं चारित्र्यहनन सोपं', 'शिंदेंसोबत काम केल्यानंतर ट्रोलिंग', 'मातोश्री पेजवरून व्हिडिओ व्हायरल', 'सगळ्यात पहिला फोन शिंदेंचा', 'घाबरू नकोस, एकनाथ शिंदेंचा फोन','भाऊ तुझ्या पाठिशी, शिंदेंचा फोन', 'महिलेची बदनामी करून पक्ष मोठा होतो का?', शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंचा ठाकरे गटाला सवाल.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमी पाहा- मॉर्फ व्हिडिओवरून शीतल म्हात्रे संतापल्या, कोणावर केला व्हिडिओ व्हायरल? 

     

  • प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रेंचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sheetal Mhatre Viral Video : शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. त्यावरुन शीतल म्हात्रे चांगल्याच संतापल्या आहे.  ठाकरे गटाने हा व्हिडिओ अश्लील मजकुरावर व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केलाय. याप्रकरणी दहिसर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दहिसरमध्ये श्रीकृष्ण नगर पुलाच्या उद्गाटनासाठी आले होते. त्यावेळच्या रॅलीमधला एक व्हिडिओ मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा आरोप आहे.

    बातमी पाहा- व्हायरल व्हिडिओवरुन शितल म्हात्रे संतापल्या, ठाकरे गटावर केला मोठा आरोप

     

  • पुण्यात महाविकास आघाडीची विराट सभा होणार

     

    Mahavikas Aghadi Sabha : पुण्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची विराट सभा होणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर 14 मे ला महाविकास आघाडीची पुण्यात सभा होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत.14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे आणि याच निमित्ताने पुण्यात महाविकास आघाडीची विराट सभा आयोजित करण्यात आली आहे

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमी पाहा- पुण्यात मविआ करणार धमाका, कसब्याच्या विजयानंतर 14 मे रोजी मविआची विराट सभा, उद्धव ठाकरेंची उपस्थिती

     

  • कृषिमंत्र्यांच्या तालुक्याला पीक नुकसानीच्या अहवालातून वगळलं

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Abdul Sattar : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच सोयगाव तालुक्याला अवकाळी पावसाच्या नुकसानीतून वगळण्यात आलंय... स्थानिक प्रशासनाने अर्थात तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पीक नुकसानीच्या अहवालात सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शून्य टक्के नुकसान झाल्याचा अहवाल दिलाय....त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप उसळण्याची शक्यताय....प्रत्यक्षात सोयगाव तालुक्यात देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय...त्यामुळे प्रशासनाने बांधावर जाऊन पंचनामे न करता एसीमध्ये बसूनच पंचनामे केले की काय असा प्रश्न या अहवालावरून उपस्थित झालाय...

    बातमी पाहा - अजब कारभार! मोठं नुकसान झालेल्या तालुक्यालाच पीक नुकसानीच्या अहवालातून वगळले

  • गुजरातमध्ये पुन्हा पैशांचा पाऊस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Gujarat Valsad Money Rain : गुजरातच्या वलसाडमध्ये एका कार्यक्रमात पैशांचा पाऊस पडताना दिसला.. प्रसिद्ध गायक कीर्तिदान गढवी यांच्यावर नोटांची उधळण करण्यात आली.. लोकांनी 10, 20 आणि 100 रुपयांच्या नोटांचा वर्षाव केला.. वलसाडमधला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.. कीर्तिदान गढवी यांच्या पैशांचा पाऊस पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.. याआधीसुद्धा अनेक कार्यक्रमात गढवींवर पैशांचा वर्षाव करण्यात आलाय.. 

    बातमी पाहा - अरे बापरे! गुजरातमध्ये पैशांचा पाऊस; गायकावर उधळल्या नोटा

  • राणेंचं 2 महिन्यांत मंत्रिपद जाणार, वैभव नाईकांचा गौप्यस्फोट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vaibhav Naik On Narayan Rane : भाजपाला राणेंची (Narayan Rane) गरज राहिली नाही.. पुढच्या दोन महिन्यांत राणेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibahav Naik) यांनी केलाय.

    बातमी पाहा - नारायण राणेंचे मंत्रिपद जाणार? वैभव नाईकांचे मोठे विधान 

  • किसानसभेचा सरकारविरोधात एल्गार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kisan Sabha Morcha : किसान सभेचा पुन्हा एकदा आजपासून लॉन्ग मार्च सुरू झालाय... त्यामुळे भाजपा शिंदे सरकारच्या अडचणी वाढणार आहेत. किसानसभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लाँग मार्च काढण्याची पुन्हा एकदा हाक दिलीये. हजारो कष्टकरी, कामगार नाशिक येथून पायी चालण्यास सुरुवात केतील...येत्या 23 मार्च रोजी मुंबई येथे विधान भवनावर चालून जातील...राज्य सरकारच्या श्रमिक विरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांमुळे शेतीमालाचे भाव कोसळून अक्षरशः कवडीमोल झाल्यानं किसानसभेने आंदोलनाची घोषणा केलीये...

    बातमी पाहा - शेतकरी आणि श्रमिक वर्ग उतरला रस्त्यावर, सरकाविरोधात पुकारला एल्गार

     

  • मुंबई एअरपोर्टवर 3 किलो सोनं जप्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Airport Gold Seized : मुंबई कस्टम्स विभागानं विमानतळावर मोठी कारवाई केलीय. तीन परदेशी नागरिकांकडून तीन किलो सोनं जप्त करण्यात आलंय. 1 कोटी 40 लाख रुपये इतकी या सोन्याची किंमत आहे. हे तिन्हीही परदेशी नागरिक आदिस अबाबाहून मुंबईत आले होते. त्यांची कसून चौकशी केली असता हे सोनं आढळून आलंय. त्यांनी अंडरगारमेंट्स आणि फुटवेअरच्या इनसोलमध्ये सोनं लपवलं होतं.

    बातमी पाहा - तीन किलो सोने बुटात लपवले; तब्बल एक कोटीचा मुद्देमाल कस्टम विभागाने केले जप्त

  • किड्यांच्या पावसाचं गूढ काय?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chaina Worm Rain : चीनमध्ये चक्क किड्यांचा पाऊस पडतोय. राजधानी बीजिंगसह इतर शहरांमध्ये किड्यांचा पाऊस पडलाय. घराचे छत, रस्ते आणि गाड्यांवर किड्यांचा खच पडलाय. आकाशातून पडणाऱ्या या रहस्यमय किड्यांच्या पावसामुळे चिनी नागरिक मात्र हैराण झाले आहेत. बीजिंगमधील नागरिकांना घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलंय. मात्र, आवश्यक कामासाठी छत्री सोबत घेऊन घराबाहेर पडा असा सल्लाही देण्यात आलाय. या रहस्यमय पावसाचं चीनमध्ये संशोधन केलं जातं आहे. संशोधक वेगवेगळे दावे करतायेत. मात्र, या पावसामुळे चिनी नागरिकांची मोठी फजिती होतेय. 

    बातमी पाहा - ऐकावे ते नवलच! चीनमध्ये चक्क किड्यांचा पाऊस, नागरिक झाले हैराण

     

  • अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Beed Unseasonal Rain : बीड जिल्ह्यात अवकाळी पावसासह वादळी वा-यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय.. वादळी वा-याचा फळबागांना मोठा फटका बसलाय. आष्टी तालुक्यातील संत्राबागा वादळी वा-यामुळे भुईसपाट झाल्यात.. शेतीचं मोठं नुकसान झालं असतानाही अद्याप पंचनामे सुरु झालेले नाहीते.. त्यामुळे प्रशासनाने तातडीनं नुकसानीचे पंचनामे करुन मदत द्यावी अशी मगणी या शेतक-यांनी केलीये.

    बातमी पाहा - वादळी वाऱ्याने संत्र्यांच्या बागाचे मोठे नुकसान; पंचनामे मात्र अद्याप बाकीच

  • समृद्धी महामार्गावर अपघात, 5 जण ठार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय...या अपघातात 5 जण जागीच ठार झालेयत...अपघातात 2 मुलं आणि 3 महिला ठार झालेयत...7 गंभीर जखमी झालेयत...सिंदखेड राजा ते मेहकर दरम्यान जवळ अर्टिका गाडीचा अपघात झाला...या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेयत...जखमींवर उपचार सुरू आहेत...

    बातमी पाहा - मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 5 जण जागीच ठार

  • मॉर्फ व्हिडिओवर शीतल म्हात्रेंचा संताप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sheetal Mhatre Viral Video : शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. त्यावरुन शीतल म्हात्रे चांगल्याच संतापल्या आहे.. ठाकरे गटाने (Thackeray Camp) हा व्हिडिओ अश्लील मजकुरावर व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केलाय. याप्रकरणी दहिसर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून आतापर्यंत दोघांना अटक (2 Arrest) करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) काल दहिसरमध्ये श्रीकृष्ण नगर पुलाच्या उद्गाटनासाठी आले होते. त्यावेळच्या रॅलीमधला एक व्हिडिओ मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा आरोप आहे...

    बातमी पाहा -  व्हायरल व्हिडिओवरुन शितल म्हात्रे संतापल्या, ठाकरे गटावर केला आरोप

  • धुळे आणि नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाचा इशारा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dhule & Nandurbar Rain Alert : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे. 14 ते 17 मार्चदरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.  या दोन्ही जिल्ह्यात 5 आणि 6 मार्चला अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. यात धुळे जिल्ह्यात 10 हजार शेतकऱ्यांना फटका बसला होता. तर नंदुरबार जिल्ह्यात 1 हजार 700 हेक्टर पिकं उद्ध्वस्त झाली होती. आता पुन्हा पाऊस पडणार असल्यानं शेतक-यांच्या नुकसानीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे....

    बातमी पाहा - धुळे आणि नंदुरबारमध्ये पुन्हा अवकाळीचा इशारा, शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ

     

  • सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं कनेक्शन दाऊदपर्यंत?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Satish Kaushik Death Update : अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूबाबत एका महिलेनं खळबळजनक दावा केलाय.. माझ्या पतीने 15 कोटींसाठी सतिश कौशिक यांची हत्या केली असा दावा या महिलेनं केलाय.. सतीश कौशिक यांचा जवळचा मित्र विकास मालू यांच्या दुस-या पत्नीनं हा दावा केलाय.. सतीश कौशीक यांनी तीन वर्षांआधी विकास मालूला 15 कोटी रुपये गुंतवणुकीसाठी दिले होते... ते पैसे परत देण्याची मागणी सतीश कौशिक यांनी केली होती.. दुबईत एका पार्टीत दोघांमध्ये भांडण झाल्याचा दावाही या महिलेनं केलाय.. तसंच या पार्टीता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगाही हजर होता असा खुलासाही या महिलेनं केलाय..

    बातमी पाहा - 15 कोटींसाठी अभिनेते सतिश कौशिक यांची हत्या? महिलेकडून धक्कादायक माहिती आली समोर

  • 'जुन्या पेन्शनवर' फैसला होणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Old Pension Scheme : राज्य सरकारी कर्मचा-यांच्या जुन्या पेन्शन योजनेवर (Old Pension Scheme) तोडगा काढण्यासाठी सरकारनं उद्या बैठक बोलावलीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) याबाबत उद्या मुख्य सचिवांसोबत चर्चा करणार आहेत.. या चर्चेसाठी विरोधी पक्षनेत्यांनाही (Opposition Leader) निमंत्रण देण्यात आलंय.. जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकार सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...त्यामुळे या बैठकीत जुन्या पेन्शन योजनेबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.. 

    बातमी पाहा - जुन्या पेन्शन योजनेवर तोडगा निघण्याची शक्यता; शिंदे सरकारने बोलावली बैठक

  • बावधनची आज बगाड यात्रा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Satara Bagad Yatra : साता-यातील प्रसिद्ध बावधनची आज बगाड यात्रा आहे...रंगपंचमीच्या दिवशी ही यात्रा भरते...50 फुटी उंच लाकडी बगाडाला नवस बोललेल्या बगाड्याला बांधून बैल जोडीच्या सहाय्याने शेतातून पळवत नेण्याची अनोखी प्रथा आहे....सातारा जिल्ह्यातील बावधन हे गाव गुलाबी रंगानी न्हाहून निघते...बावधनचे बगाड राज्य भरात प्रसिद्ध आहे...हजारो भाविक हे अनोखी बागड यात्रा पाहण्यासाठी वाई गावापासून जवळच असणाऱ्या बावधन गावाला येत असतात....साडे तीनशे वर्षापासून या गावात ही यात्रा साजरी केली जाते..

    बातमी पाहा - बगाड यात्रेसाठी हजारो भाविक बावधनमध्ये दाखल, नागरिकांचा उत्साह शिगेला

  • मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Railway Megablock : सिग्नलयंत्रणा आणि रुळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आज मुंबईत मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप-डाऊन फास्ट मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.35 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार आहे.

    बातमी पाहा - आज घराबाहेर पडण्याचा विचार करत आहात? मग मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

  • राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    State Government Employees : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत.. या संपात आता आरोग्य कर्मचारीही सहभागी होणार आहेत.. मंगळवारपासून हा संप पुकारण्यात आलाय.. संपात  राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतील परिचारिका, कक्षसेवक, सफाई कामगार सहभागी होणार आहेत. त्यामुळे आरोग्यसेवा ठप्प होऊन रुग्णांचे हाल होण्याची भीती आहे. राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना तात्काळ लागू करावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत कायम करावे, सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरावी, यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघाने हा संप पुकारलाय.. दरम्यान कर्मचारी संघटनांची उद्या राज्य सरकारबरोबर बैठक होणार असून संप मागे घेऊन यशस्वी तोडगा काढण्यासाठी सरकारकडे दोन दिवसांचा अवधी आहे... 

    बातमी पाहा - राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम, रुग्णसेवा कोलमडणार

  • मुंबईतही आजची उष्णतेची लाट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Heat Wave : उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही केलीय... मुंबईत शनिवारी रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद करण्यात आलीय.. शहर आणि उपनगरातला पारा तब्बल 38 अंशावर पोहोचला होता.. शनिवारी आलेली उष्णतेची लाट आजही मुंबईकरांना जाणवणार आहे.. तेव्हा दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडू नका.. तसंच उन्हापासून काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलंय. 

    बातमी पाहा - मुंबई तापली, रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद, उन्हाळ्यात कशी घ्याल काळजी

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link