Loksabha Security Breached : संसद घुसखोरी प्रकरणात 6 जणांचा समावेश

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Dec 13, 2023, 23:24 PM IST
Loksabha Security Breached : संसद घुसखोरी प्रकरणात 6 जणांचा समावेश

13 Dec 2023, 23:20 वाजता

संसद घुसखोरीत 6 जणांचा समावेश, चौघांना अटक, 2 आरोपी अद्याप फरार

 

Loksabha Security Breached : संसद घुसखोरी प्रकरणात 6 जणांचा समावेश असल्याचं समोर आलंय. यातील 4 जणांना अटक करण्यात आलीय तर 2 जण फरार आहे. त्यांचा तपास यंत्रणांकडून शोध घेतला जातोय. विशेष म्हणजे यातील एक आरोपी मनोरंजन हा गेल्या 6 महिन्यांपासून संसदभवन परिसरात पासेस मिळवण्यासाठी फेऱ्या मारत होता. आता या सगळ्या आरोपींचा घुसखोरीमागचा नेमका उद्देश काय होता, याचा शोध पोलीस घेतायेत. अटक करण्यात आलेले चारही आरोपी गुरूग्रामच्या सेक्टर 7 मधील हाऊसिंग बोर्डात थांबले होते. या प्रकरणात हिस्सारमधील विक्की शर्मा आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आलीय. चौघेही विक्की शर्माच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येतीय. 

बातमीचा  व्हिडीओ पाहा -

 

13 Dec 2023, 20:22 वाजता

भाजप खासदार प्रताप सिन्हांच्या पासेसवर तरुणांचा प्रवेश

 

Investigation of MP Pratap Sinha : संसदेत घुसखोरी करणारे तरुण ज्या खासदाराच्या पासेसवर प्रेक्षक गॅलरीत बसले होते त्या प्रताप सिन्हांची चौकशी करण्यात आली.. प्रताप सिन्हा हे कर्नाटकाल्या म्हैसूरचे भाजप खासदार आहेत. आरोपींना पासेस देण्यासाठी कुणी शिफारस केली याचीही चौकशी करण्यात आलीय. विशेष म्हणजे ज्या आरोपींना अटक करण्यात आलीय त्यांनी आपल्यासोबत कोणतेही फोन किंवा ओळखपत्र ठेवले नव्हती अशी माहितीही समोर येतीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

13 Dec 2023, 17:48 वाजता

पुणे लोकसभा पोटनिवडणूक तत्काळ घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश

 

HC on Pune Loksabha : पुणे लोकसभा पोटनिवडणूक तत्काळ घ्या असे आदेश मुंबई हायकोर्टानं निवडणुक आयोगाला दिलेत. याप्रकरणी सुबोध जोशी यांनी PIL दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला हे आदेश दिले. खरतरं निवडणूक कायद्यानुसार सहा महिन्यात पोटनिवडणूक घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची घोषणा होते का याकडे लक्ष लागलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

13 Dec 2023, 17:05 वाजता

लोकसभेतील तरुणांच्या घुसखोरीनंतर नागपूर अधिवेशनात गॅलरी पास देणं बंद

 

Nagpur Session Restriction : लोकसभेतील तरुणांच्या घुसखोरीनंतर नागपूर अधिवेशनात आता प्रत्येक आमदाराला दोनच पास दिले जाणार आहेत. तर विधानपरिषदेत प्रेक्षक गॅलरीचे पास पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. लोकसभेतल्या प्रकारानंतर राज्य विधीमंडळानं हा निर्णय घेतलाय. अधिवेशन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहात याविषयीची माहिती दिली.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

13 Dec 2023, 16:22 वाजता

लोकसभेत घुसखोरीप्रकरणी अटक करण्यात आलेला अमोल धनराज शिंदे महाराष्ट्रातला

 

Loksabha Security Breached : संसदेची सुरक्षा भेदत दोन अज्ञात व्यक्तींनी आज लोकसभेत प्रवेश केला. याप्रकरणी अटक करण्यात आलेला अमोल धनराज शिंदे हा तरुण महाराष्ट्रातला आहे.. अमोल मूळचा लातूरच्या चाकूर तालुक्यातील नवकुंडझरी गावचा राहणारा आहे.
संसदेत दोघा तरुणांनी प्रेक्षक गॅलरीत उडी मारली. तर दोघांनी संसदेच्या आवारात निदर्शनं केली. स्मोक कँडलमधून त्यांनी धूर सोडला... त्यामध्ये अमोलचा समावेश होता... या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी अमोल शिंदेला तत्काळ अटक केली... अमोल धनराज शिंदे हा 25 वर्षाचा तरुण आहे. घरची परिस्थिति बेताची आहे , आई वडील मजूरी करतात , अमोल शिंदे हा मिल्ट्री आणी पोलीस भरतीची तैयारी करत होता.तो 9 तारखेला भरतीसाठी जात असल्याचे सांगून तो गेला होता. चाकुर येथील पोलिस त्याच्या घरी दाखल झाले आहेत आणि त्यांच्या आई वडीलांची चौकशी करत आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

13 Dec 2023, 14:13 वाजता

लोकसभेची सुरक्षा भेदली

 

Loksabha Security Breached : देशाला हादरवणारी आजची सर्वात मोठी बातमी.... संसदेची सुरक्षा भेदत दोन अज्ञात व्यक्तींनी आज लोकसभेत प्रवेश केला... प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी कामकाज सुरु असताना उडी मारली.. त्यामुळे लोकसभेच्या कामकाजावेळी एकच गोंधळ उडाला... कामकाज सुरु असताना हे दोन्ही अज्ञात अचानक घुसले... आरोपींच्या बुटात गॅस पाईपसारखी वस्तू होती.. मात्र खासदारांनी दोन्ही तरुणांना घेरलं आणि  सुरक्षा रक्षकांनी ताबडतोब या दोघांना ताब्यात घेतलं.. हे  दोघेही खासदारांच्या नावाने लोकसभा व्हिजिटर पासवर आले होते. मात्र या सर्व प्रकारामुळे संसदेच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय... विशेष म्हणजे आजच संसदेवर झालेल्या हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झाली... त्याच दिवशी लोकसभेची सुरक्षा भेदली जाणं ही घटना धक्कादायक मानली जातेय... खासदारांनीही या घटनेनंतर सुरक्षेवर चिंता व्यक्त केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13 Dec 2023, 13:10 वाजता

विधानसभा अध्यक्ष राजीनामा देतील - रोहित पवार

 

Rohit Pawar On Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राजीनामा देतील अशी भविष्यवाणी रोहित पवार यांनी केलीये...आमदार अपात्रता सुनावणीसंदर्भात ते बोलत होते...नवीन अध्यक्षाच्या नेमणुकीला वेळ घेतला जाईल असंही ते म्हणाले...आणि निर्णय अध्यक्ष घेणार नसतील तर कोर्ट घेईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13 Dec 2023, 11:54 वाजता

नाना पटोले आणि अंबादास दानवेंची भरत गोगावलेंवर टीका

 

Nana Patole & Ambadas Danve On Bharat Gogavale : शिवाजी महाराजा सूरतला गेले होते म्हणून आपणही गेलो या भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं वाद पेटलाय. सरकारमधील नेत्यांकडून पदोपदी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असल्याची टीका नाना पटोलेंनी केली तर महाराजांशी तुलना योग्य नाही असा खोचक टोला अंबादास दानवेंनी लगावलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13 Dec 2023, 11:49 वाजता

कांदा दर कोसळले, शेतकरी संतप्त

 

Manmad Onion : कांद्याच्या दरात सलग तिस-या दिवशीही घसरण झालीय. कांदा दर घसरल्याने शेतकरी चांगलेच संतापले आहेत.. मनमाड बाजार समितीसमोर शेतक-यांनी रास्ता रोको सुरु केलाय.. मनमाड-नाशिक मार्गावर शेतक-यांनी ठिय्या मांडलाय.. कांद्याला सरासरी प्रति क्विंटल सोळाशे रुपये भाव मिळालाय.. जो भाव मागच्या आठवड्यात दोन हजार दोनशे रुपये होता. नाफेड खरेदी केंद्र कधी सुरू करणार असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

13 Dec 2023, 11:13 वाजता

नाशिक एमडी ड्रग्ज टोळीचा मास्टरमाईंडला अटक

 

Nashik Drugs : नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट्स समोर येतीये.. नाशिकमधील MDड्रग्ज प्रकरणातील टोळीचा मास्टरमाइंड उमेश वाघ याला पोलिसांनी विरारमधून अटक केलीये.. गेल्या 3 महिन्यांपासून तो फरार होता.. बंगळुरु, केरळ, हैदराबाद, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूत तो लपून बसला होता.. अखेर नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रान्चनं विरारमधून त्याला अटक केलीये... सोलापूरला ड्रग्जचा कारखाना उभारण्यात तसंच नाशिकमध्ये ड्रग्जची वाहतूक करण्यात त्याचा हात होता.. उमेश वाघच्या अटकेनंतर याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या 13वर गेलीये.  उमेश वाघच्या अटकेनं या ड्रग्ज प्रकरणात मोठे खुलासे उघड होण्याची शक्यता आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -