Khadse's allegations against Mahajan : एकनाथ खडसेंचे गिरीश महाजनांवर आरोप

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Oct 13, 2023, 22:57 PM IST
Khadse's allegations against Mahajan : एकनाथ खडसेंचे गिरीश महाजनांवर आरोप

13 Oct 2023, 22:15 वाजता

गिरीश महाजनांचे ड्रग्जमाफियांबरोबर संबंध- एकनाथ खडसे

 

Khadse's allegations against Mahajan : गिरीश महाजन यांचे ड्रग्जमाफियांबरोबर संबंध असल्याचा खळबळजनक आरोप एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर केलाय.. महाजन पालकमंत्री असताना आरोपी ललित पाटीलचा ड्रग्ज कारखाना असल्याचं म्हणत एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांनी राजीनामा देण्याची मागणी केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

13 Oct 2023, 20:49 वाजता

तुळजाभवानी मंदिराचा दर्शन मंडप महाद्वार परिसरातच होणार

 

Tuljabhavani Darshan Mandap : तुळजाभवानी दर्शन मंडपाचा वादावर अखेर पडदा पडलाय. दर्शन मंडप महाद्वार परीसरातच होणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलीय. तुळजाभवानीच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये दर्शन मंडप हा घाटशिळ परीसरात होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे पुजारी आणि व्यापाऱ्यांनी विरोध करत एक दिवसीय तुळजापूर बंदची हाक दिली होती. तुळजाभवानी विकास आराखड्यासंदर्भात जनमत चाचणी घेण्यात आली होती.  चाचणीच्या अभिप्रायाचे वाचन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या कार्यालयाबाहेर केले. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

13 Oct 2023, 19:55 वाजता

2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश

 

Inclusion of cricket in Olympics : तब्बल 128 वर्षांचा ऑलिम्पिकचा इतिहास बदलला असून पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आलायं..आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी क्रिकेटला मान्यता दिली. लक्षणीय बाब म्हणजे शेवटच्या वेळी 1900 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. त्यावेळी थेट सुवर्णपदकासाठी सामना खेळवला गेला. फ्रान्स आणि इंग्लंड संघात झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं बाजी मारली होती.इंग्लंडने 158 धावांनी विजय मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केलं होतं. त्यानंतर ऑलेम्पिकमध्ये क्रिकेट खेळवण्यात आलेलं नाही. मुळात आयओसीकडून क्रिकेटला फारसा विरोध झाला नाही. त्याउलट काही देशांच्या क्रिकेट मंडळांनी याबाबत आक्षेप घेतला होता. ऑलिम्पिकमध्ये दोन आठवडे क्रिकेट खेळवलं जाईल. त्यामुळे स्थानिक क्रिकेटचं वेळापत्रक बदलेलं आणि त्याचा आर्थिक फटकाही सहन करावा लागेल अशी भूमिका मांडण्यात आली होती.. याच कारणास्तव इतका दीर्घकाळ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेले नाही. मात्र पुढच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार असून भारतीय खेळाडू नक्कीच सुवर्ण कामगिरी करतील यात शंका नाही.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

13 Oct 2023, 18:51 वाजता

मनोज जरांगे पुन्हा स्टेजवर, सरकार गॅसवर?

 

Manoj Jarange's Meeting : कितीही गर्दी झाली तरी मराठ्यांनो, आता घरी थांबू नका, कार्यक्रमाला या आणि एकजूट दाखवून द्या, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलंय. उद्या जालन्यातल्या आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांनी आयोजित केलेली भव्य मराठा सभा होतेय. या सभेची जोरदार तयारी झालीय.  5 हजार स्वयंसेवक त्यासाठी तैनात करण्यात आलेत. गैरसोय होऊ नये म्हणून दवाखाना,पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आलीय. याचसंदर्भात पोलिसांनीही सुरक्षेसंदर्भात आढावा बैठकही घेतली. शांततेत सभेला येण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय. या सभेसाठी धुळे-सोलापूर महामार्गावरची वाहतूक 3 वेगळ्या मार्गांनी वळवण्यात आलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

13 Oct 2023, 15:13 वाजता

Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today :  'पंतप्रधान मोदी ओबीसींच्या पाठीशी', 'जो ओबीसी की बात करेगा, वो ही देश पे राज', 'ओबीसी नेत्याला संपवायला 25 पक्ष एकत्र आले','जातीपातींत भांडणं आम्ही लावणार नाही ','मंत्रिमंडळात 60 टक्के मंत्री एससी, ओबीसी', 'ओबीसी जनगणना करायला नकार नव्हता','राहुल गांधींना आका ओबीसींची काळजी','ओबीसी पंतप्रधान करणार हे काँग्रेसनं घोषित करावं','मोदींच्या विरोधात काँग्रेसच्या कागाळ्या',';भाजपचा डीएनए ओबीसी, भटक्या विमुक्तांचा', देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

13 Oct 2023, 14:45 वाजता

Aditya Thackeray Live | Marathi News LIVE Today :  'काल सत्याचा विजय झाला', 'कांजूरमार्गचा डेपो सरकारनं आरेला नेला', 'कांजूरमार्गलाच आम्ही कारशेड करणार','कांजूरमार्गच्या जागेवरच आम्ही कारशेड करणार होतो', 'निर्णय बदलला नसता तर 10 हजार कोटी वाचले असते', 'महाराष्ट्राबद्दल एवढा द्वेष का?', '4 मेट्रो डेपोसाठी 4 कंत्राटदारांना काम','मेट्रो शेडविषयी वैयक्तिक निर्णय नव्हता', आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य.

13 Oct 2023, 14:31 वाजता

ड्रग्जच्या आहारी गेलेल्या 100 तरुणांची आत्महत्या- संजय राऊत

 

Sanjay Raut : नाशिकमध्ये गेल्या 6 महिन्यांत ड्रग्जच्या आहारी जाऊन 100 तरुणांनी आत्महत्या केल्याचा दावा राऊतांनी केलाय...नाशिकमध्ये शाळा, कॉलेजात ड्रग्ज पुरवलं जातंय...या ड्रग्ज माफियांना राजकीय आश्रय असून, तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करतायत...असा आरोप संजय राऊतांनी केलाय...

13 Oct 2023, 13:54 वाजता

 टोलमुक्त महाराष्ट्र कधी करणार?- नाना पटोले

 

Nana Patole : टोलमुक्त महाराष्ट्र कधी करणार? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारला केलाय. संपूर्ण महाराष्ट्रात टोल माफी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केलीय. ते नागपुरात बोलत होते. 

13 Oct 2023, 13:02 वाजता

आमदार अपात्रतेबाबत निर्णय कधी देणार हे सोमवारपर्यंत सांगा- सुप्रीम कोर्ट

 

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेबाबत निर्णय कधी देणार हे सोमवारपर्यंत सांगा अशा सूचना सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिल्यायत...हे प्रकरण गांभीर्याने घेतलं जातंय याची नोंद घ्यावी...सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना करू नका असं कोर्टानं म्हटलंय...

13 Oct 2023, 12:44 वाजता

Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'सरकारी हॉस्पिटलमध्ये अनेक जागा रिक्त', 'कंत्राटीमुळे काम कसं होईल माहिती नाही','रिक्त जागांसाठी कायमस्वरुपी भरती करावी', 'होमगार्ड, नागरी संरक्षण दल सक्षम करायला हवं',  कंत्राटी भरतीवरून शरद पवार  यांचं वक्तव्य.