Khadse's allegations against Mahajan : एकनाथ खडसेंचे गिरीश महाजनांवर आरोप

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Oct 13, 2023, 22:57 PM IST
Khadse's allegations against Mahajan : एकनाथ खडसेंचे गिरीश महाजनांवर आरोप

13 Oct 2023, 09:41 वाजता

कीर्तनकार इंदोरीकरांच्या अडचणीत वाढ 

 

Indurikar Maharaj : कीर्तनकार इंदोरीकरांच्या अडचणीत वाढ झालीय...इंदोरीकरावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाची सुनावणी आज संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे...अपत्य प्राप्ती संदर्भात फेब्रुवारी 2020 मध्ये इंदोरीकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं....या वक्तव्यावर आक्षेप घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी इंदोरीकरांवर कारवाईची मागणी केली...प्रकरण कोर्टात गेल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी इंदोरीकरांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली...मात्र, सुप्रीम कोर्टाने गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला...आजच्या सुनावणीला इंदोरीकर उपस्थित राहणार का...? या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

13 Oct 2023, 09:05 वाजता

ललित पाटीलच्या घरातून 3 किलो सोनं जप्त

 

Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्या घरातून पुणे पोलिसांनी ३ किलो सोनं जप्त केलंय. पाटील याने ड्रग्जच्या विक्रीतून सोनं खरेदी  केलं होतं. भूषण आणी अभिषेक उर्फ जर्मन या दोघांच पोलीस तपासात आरोपीन सोन खरेदी केलं असल्याची माहिती  मिळतेय. 

13 Oct 2023, 08:37 वाजता

कोकण पदवीधर निवडणुकीचा रणसंग्राम

 

Maharashtra Politics : कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी भाजपपाठोपाठ आता शिंदे गट तसंच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी तयारी सुरू केलीय. तिन्ही पक्षांनी मतदार नोंदणी मोहीम हाती घेतलीय. दोन्ही मित्र पक्षांनी निवडणुकीची तयारी केल्यानं भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. सध्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे आमदार आहेत. ठाणे लोकसभेसाठी भाजप आग्रही आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटानं एक बैठक घेतलीय. भाजप जर ठाणे लोकसभेवर दावा करत असेल तर आफण कोकण पदवीधर मतदारसंघावर दावा का करू शकत नाही असा सूर लावण्यात आलाय. तर अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेले माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी मतदार नोंदणीला सुरुवात झालीय. त्यांनी राष्ट्रवादीकडून मागील निवडणूक लढवली होती. पुढच्या काळात या निवडणुकीवरून चांगलंच घमासान होण्याची चिन्ह आहेत. 

 

 

13 Oct 2023, 08:01 वाजता

टोलबाबत राज ठाकरेंची आज महत्त्वाची बैठक

 

Raj Thackeray : टोलबाबत चर्चा करण्यासाठी थोड्याच वेळात राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठक होणार आहे...मुंबईतील टोल दरवाढीविरोधात मनसेनं आंदोलन केलं होतं...यानंतर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली...टोलमुक्तीबद्दल मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, असं मोठं विधान राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केलंय. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे आणि MSRDCचे अधिकारी राधेश्याम मोपलवार उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर सकाळी 9.30 वाजता राज ठाकरे टोलसंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत. MH 04 च्या गाड्यांना अर्थात ठाण्याच्या गाड्यांना टोल माफ करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ, असं मोठं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना दिल्याचं समजतंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

13 Oct 2023, 07:30 वाजता

शिवाजी महाराजांची जगदंबा तलवारही भारतात येणार?

 

Shivaji Maharaj Jagdamba Talwar : शिवाजी महाराजांची जगदंबा तलवारही आता भारतात परत येण्याची शक्यता आहे... वाघनखांपाठोपाठ शिवाजी महाराजांची ऐतिहासिक तलवार लंडनमधून परत आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.. केंद्र सरकार तसंच महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांनाही वेग आलाय.. मोदी सरकारने हा विषय ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडे उपस्थित करण्याचीही मागणी होतेय.. छत्रपती शिवाजी महाराजांची ही तलवार सध्या लंडनमध्ये सेंट जेम्स पॅलेसमधल्या रॉयल कलेक्शनमध्ये आहे.. शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याआधी म्हणजे 2024 पर्यंत ही तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

13 Oct 2023, 07:17 वाजता

आमदार अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी 

 

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणाराय... आमदारांच्या अपात्रतेबाबबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना तातडीनं निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलीय... त्यावर आज सकाळी सुनावणी होणाराय... विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा मुद्दा पवार आणि ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टासमोर मांडला.. या दोन्ही याचिकांवर आज एकाचवेळी सुनावणी होणाराय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-