India Vs Pakistan Match : क्रिकेटच्या महायुद्धात भारतापुढं पाकिस्तानची दाणादाण

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Oct 14, 2023, 18:06 PM IST
India Vs Pakistan Match : क्रिकेटच्या महायुद्धात भारतापुढं पाकिस्तानची दाणादाण

14 Oct 2023, 18:03 वाजता

पाकिस्तानची टीम 191 रन्सवर गारद, भारतापुढे 192 रन्सचं टार्गेट

 

India Vs Pakistan Match : क्रिकेटच्या महायुद्धात भारतानं पाकिस्तानची पुरती दाणादाण उडवून दिलीय... पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तानचा अख्खा संघ 191 रन्समध्ये गारद झाला... आता विजयासाठी भारताला 192 रन्सची गरज आहे...
भारतातर्फे मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जाडेजा या पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या... एकट्या कॅप्टन बाबर आझमनं हाफ सेन्चुरी करून पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला... मोहम्मद रिझवाननंही 49 रन्स करून त्याला चांगली साथ दिली... मात्र भारतीय बॉलर्सपुढं बाकीच्या पाकिस्तानी बॅट्समननी पुरती शरणागती पत्करली.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

14 Oct 2023, 13:06 वाजता

मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये वार-प्रहार

 

Manoj Jarange Patil On Chagan Bhujbal : मनोज जरांगेंनी भुजबळांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय...सभेसाठी 7 कोटी खर्च जमा केल्याचा आरोप भुजबळांनी केला होता...त्यावर जरांगेंनी उत्तर दिलंय...आम्ही 100 एकर जमीन विकत घेतलेली नाही, भाड्याने घेतली...भुजबळांनी गरीबांचे रक्त पिऊन पैसे कमावले असा आरोप जरांगेनी केला...तर जरांगेचं काय खाल्लं ते त्यांनी सांगावं असा पलटवार भुजबळांनी केलाय... 

14 Oct 2023, 13:05 वाजता

10 दिवसांत मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा - मनोज जरांगे

 

Jalna Manoj Jarange Patil : राज्य सरकारने 10 दिवसांमध्ये मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं... अशी मागणी करत मनोज जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय.. पाच हजार पानांचा पुरावा मराठा आरक्षण समितीला मिळाला असल्याची माहितीही जरांगेंनी दिली. पुढच्या 10 दिवसांत आरक्षण न दिल्यास 22 ऑक्टोबरला पुढची दिशा स्पष्ट करण्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांनी सभा घेतली.. या सभेला मराठा बांधवांनी विराट गर्दी केली होती.. याच भव्य सभेत मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या मागण्या सरकारसमोर ठेवल्यात... पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंनी आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेण्याची मागणी जरांगेंनी केली... मराठ्यांचं आग्या मोहोळ शांत आहे. मात्र हे मोहोळ जर एकदा उठलं तर काही खरं नाही असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला...

14 Oct 2023, 08:44 वाजता

अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये महायुद्ध

 

India Vs Pakistan Match : भारत आणि पाकिस्तानमध्ये आज क्रिकेटचं महायुद्ध रंगणार आहे... अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही टीम्स आमनेसामने उभ्या ठाकतील.. भारत-पाकिस्तानमधली ही हायव्होल्टेड मॅच दुपारी दोन वाजता सुरु होईल.. तर दीड वाजता टॉस होईल.. भारत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध नेहमीच अजिंक्य राहिलाय.. भारत आणि पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये एकूण सात वेळा समोरासमोर आलेत.. त्यापैकी सर्वच सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवलाय.. तेव्हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया हाच रेकॉर्ड कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल... 

IND vs PAK Live Score : आज रंगणार भारत-पाकिस्तानमध्ये हायव्होल्टेज सामना; विजयाची हॅट्रिक करण्यासाठी रोहित सेना तयार

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

14 Oct 2023, 07:53 वाजता

जालन्यात मराठ्यांचा एल्गार

 

Jalna Manoj Jarange Patil : अंतरवाली सराटीमध्ये राज्याच्या कानाकोप-यातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.. छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंना पाच किमी पर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत...मोठ्या प्रमाणात गाड्या दाखल झाल्याने 80 एकरमधली एक नंबरची पार्किंग फुल झालीय.. तर मराठा बांधवांचे जत्थेच्या जत्थे सभास्थळी दाखल होऊ लागले आहेत.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

14 Oct 2023, 07:50 वाजता

जालन्यात मनोज जरांगेंची आज विराट सभा

 

Jalna Manoj Jarange Patil : आज जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक जरांगे पाटलांच्या नेतृत्त्वात सभेचं आयोजन करण्यात आलंय... मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन टिकणारे मराठा आरक्षण द्या अशी जरांगेंची मागणी आहे...हे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी आज सभेचं आयोजन केलंय...कितीही गर्दी झाली तरी मराठ्यांनो, आता घरी थांबू नका, कार्यक्रमाला या आणि एकजूट दाखवून द्या, असं आवाहन जरांगेंनी केलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -