16 Dec 2023, 22:57 वाजता
गुन्हे मागे घेण्याबाबत दगाफटका झाला- मनोज जरांगे
Government Delegation Visits Jarange : गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारनं मराठ्यांसोबत दगाफटका केला असा आरोप मनोज जरांगेंनी मंत्र्यांच्या शिष्टमंडळासमोर केला. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि संदिपान भुमनरे मनोज जरांगेंशी चर्चा केली. यावेळी जरांगेंनी सरकारनं केसेस मागे घेण्याबाबत शब्द पाळला नसल्याचा आरोप केला. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमधली नाराजी टोकाला गेल्याचं आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं. जरांगेंची समजूत काढण्यासाठी आलेले मंत्री गिरीश महाजन आणि सांदिपान भुमरे यांच्याकडे जरांगेंनी भुजबळांनी तक्रार केली... भुजबळ मराठ्यांबद्दल विषारी का बोलतात, असा सवाल जरांगेंनी केला. तर वाद थांबवण्याची विनंती भुजबळांना करणार असल्याचं महाजनांनी स्पष्ट केलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
16 Dec 2023, 22:16 वाजता
बीड पेपरफुटी प्रकरण, 4 महाविद्यालयातील 79 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार
Beed Paper Leak : बीड पेपरफुटी प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आलीय. बीडमधील नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आलंय. बीई सिव्हिलचा पेपरही रद्द करण्यात आलाय. त्यामुळे 4 महाविद्यालयातील 79 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार आहे. अभियांत्रिकी परीक्षेत मोबाईलवर पेपर लिक झाल्यानंतर मोबाईल समोर ठेवून परीक्षार्थिंनी कॉपी केल्याचा प्रकार समोर आला होता. तसंच मायक्रो झेरॉक्स पेपर्सही मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्रावर आढळून आले त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
16 Dec 2023, 20:42 वाजता
मोर्चात धारावीबाहेरुन माणसं मागवली होती- मुख्यमंत्री शिंदे
CM Shinde on Dharavi Morcha : ठाकरेंच्या या मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हल्लाबोल केलाय. मोर्चात धारावीबाहेरुन माणसं मागवली होती..विकासविरोधी लोकांनी मोर्चा काढला होता असा टोला शिंदेंनी लगावलाय. यांना जनता जशास तसे उत्तर देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
16 Dec 2023, 18:24 वाजता
मविआ सरकार पाडायला 50 खोके कुणी दिले, हे उघड- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Accuses BJP, Adani Group : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी गद्दारांना 50 खोके कुणी दिले, हे उघड झालंय.. अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आज भाजप आणि अदानी समुहावर जोरदार हल्लाबोल केला... धारावीचा विकास अदानीकडे देऊ नये, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्यावतीनं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात प्रचंड मोर्चा काढण्यात आला... सगळी मुंबईच अदानीच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव आहे. मात्र मुंबई भाजपच्या जावयाला आंदण देणार नाही, धारावीतल्या मोर्चात उद्धव ठाकरेंनी यावेळी बजावलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
16 Dec 2023, 16:17 वाजता
धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना दिल्याविरोधात ठाकरे गट आक्रमक
Dharavi Thackeray Camp Morcha : शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मविआनं धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात मोर्चा काढलाय. धारावी टी जंक्शनपासून बीकेसीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आलाय. अदानींच्या बीकेसीमधल्या कार्यालयावर मोर्चा धडक देणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना दिल्याविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा. या मोर्चात मोठ्या संख्येनं मविआचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
16 Dec 2023, 13:46 वाजता
350 कोटी माझे नव्हे तर माझ्या कुटुंबाचे - धीरज साहू
Dhiraj Sahu : काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरात आतापर्यंत 350 कोटींचं घबाड आढळून आलंय. मात्रा हा पैसा माझा नसून मझ्या कुटुंबियाचा असल्याचं स्पष्टीकरण साहू यांनी दिलंय...गेल्या शंभर वर्षापासून आमच्या कुटुंबियांचा मद्यविक्रीचा पैसा आहे. सहा भावंडं एकत्र असून सगळं कुटुंब व्यवसाय करत आहे. त्यामुळे पैसा कुटुंब आणि कंपनीचा आहे, असा दावा साहू यांनी केलाय. या पैशांशी काँग्रेस पक्षाचा संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. व्यवसाय पारदर्शक असून व्यवहार रोखीत होतो. त्यामुळे इतकी रोख रक्कम असल्याचं साहू म्हणाले...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
16 Dec 2023, 13:08 वाजता
राहुल गांधी ईश्वराचे वरदान - फडणवीस
Devendra Fadanvis On Rahul Gandhi : राहुल गांधी हे ईश्वरानं दिलेलं वरदान असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. असा विरोधी पक्षाचा नेता मिळण्यासाठी भाग्य लागतं असाही मिश्कील टोला त्यांनी लगावला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
16 Dec 2023, 12:59 वाजता
मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध पवारांचाच - फडणवीस
Nagpur Devendra Fadanvis : मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तर ओबीसी आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या मंडल आयोगाला ठाकरेंनी विरोध केल्यामुळेच छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडल्याचा दावा फडणवीसांनी केलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
16 Dec 2023, 12:45 वाजता
नागपुरात भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू
Nagpur Accident : नागपूर जिल्ह्यातील काटोल मध्ये क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालाय...काल मध्यरात्रीनंतर काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही घटना घडली...नागपुरात एका लग्नाचा कार्यक्रम आटपून हे सर्वजण काटोलच्या दिशेने जात होते..
बातमी पाहा - नागपुरात क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू
16 Dec 2023, 11:32 वाजता
तृतीयपंथीयांच्या दोन गटात तुफान हाणामारी
Yavatmal Transgender Rada : यवतमाळ शहरातील भररस्त्यात तृतीयपंथीयांच्या दोन गटात तुफान हाणामारी झालीय. कोण खरा... कोण खोटा... यावरून दोन गटात राडा झाला. जांब चौफुलीवरील एका हॉटेलमध्ये असलेल्या लग्नसमारंभात तृतीयपंथीयांचा एक गट पैसे गोळा करत होता. मात्र पैसे गोळा करणारा गट हा खोटा असल्याचा आरोप करत दुसऱ्या गटानं त्यांना मारहाण केली. यावेळी दोन्ही गटानं भर रस्त्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हा गोंधळ पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी वाढली. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झालीय. या सर्व प्रकाराचा सर्वसामान्य अमरावतीकरांना त्रास सहन करावा लागला.
बातमी पाहा - कोण खरं? कोण खोटं? भररस्त्यात तृतीयपंथीयांच्या दोन गटात तुफान राडा