16 Oct 2023, 20:21 वाजता
समलिंगी विवाहाबाबत उद्या ऐतिहासिक निकाल
Same Sex Marriage Verdict : समलिंगी विवाहाबाबत उद्या सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक निकाल सुनावणार आहे.. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालीय. त्यावर उद्या सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासह 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ अंतिम फैसला सुनावणाराय... समलिंगी संबंध हा गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल आधीच सुप्रीम कोर्टानं दिलाय. आता समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळणार का, याकडं लक्ष लागलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
16 Oct 2023, 19:35 वाजता
पुण्यात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू
Pune Accident : पुण्यातील विश्रांतवाडी इथं ट्रक आणि दुचाकी अपघातात 2 जण ठार झालेत.. अपघातात महिला आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला... या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज झी 24 तासकडे आलंय.. ही दृश्यं तुम्हाला विचलित करू शकतात... पुण्यात विश्रांतवाडी मुकुंदराव आंबेडकर चौकात ही दुर्घटना घडली... हा ट्रक आळंदीला निघाला होता. याप्रकरणी ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
16 Oct 2023, 19:16 वाजता
सोलापुरात 116 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त
Solapur Drugs Seizure : नाशिकनंतर सोलापुरात मुंबई पोलिसांनी ड्रग्जबाबात मोठी कारवाई केलीय. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोलापुरात एका एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश केलाय. मुंबई पोलीस गुन्हे शाखेनं जवळपास 116 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्जस जप्त केलंय. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आलीय. आरोपींनी सोलापुरातल्या चिंचोली एमआयडीसीत एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी फॅक्ट्रीच उघडली होती. क्राईम ब्रांचनं टाकलेल्या धाडीत एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा 100 कोटी रूपयांचा कच्चा माल आणि 3 किलो तयार एमडी अएसं 116 कोटींचं एमडी ड्रग्ज ताब्यात घेतलंय. मुंबई पोलिसांनी अलिकडेच नाशिकमध्ये छापा टाकून कोट्यवधींचा ड्रग्सचा साठा जप्त केला होता. त्यानंतर सोलापुरातही मोठा साठा सापडलाय. यामागे आंतरराष्ट्रीय टोळी आहे का? या ड्रग्समाफियांना नेमका कुणाचा वरदस्त आहे असे अनेक सवाल यानिमित्तानं उपस्थित होतायेत.
16 Oct 2023, 18:16 वाजता
पुण्यातील भिडेवाड्यात सावित्रीबाई फुलेंचं स्मारकच होणार
Pune Savitribai Phule Smarak at Bhidewada : पुण्यातील भिडेवाड्यात आता सावित्रीबाई फुलेंचं स्मारकच होणार आहे. सुप्रीम कोर्टात जागेच्या वादासंदर्भात सुरु असलेला खटला महापालिका आणि सरकारनं जिंकलाय. सुप्रीम कोर्टानं स्मारकाच्या कामावरील स्थगिती उठवलीय. उच्च न्यायालयानं ही स्थगिती दिली होती. आता स्थगिती उठल्यानं तातडीनं स्मारकाच्या कामाला सुरुवाक करणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. तर फुलेंना मानणाऱ्यांसाठी आणि या स्मारकासाठी आंदोलन करणाऱ्यांसाठी हा मोठा आनंदाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
16 Oct 2023, 17:54 वाजता
शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार
Shinde Group : शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार. क्रॉस मैदानाऐवजी आझाद मैदानात होणार दसरा मेळावा. शिंदे गटाच्या दस-या मेळाव्याचं मैदान ठरलं. आझाद मैदानात होणार शिंदे गटाचा दसरा मेळावा.
16 Oct 2023, 17:14 वाजता
Meera Borwankar Live | Marathi News LIVE Today : 'दिलीप बंड यांचा जमीन विक्रीचा निर्णय','दिलीप बंड तत्कालीन विभागीय आयुक्त', 'पोलिसांची जमीन बिल्डरांच्या घशात नको', 'जागा दिली असती तर कोर्टात गेले असते''दादांनी पोलिसांची जागा बिल्डरांला देण्यास सांगितली, मीरा बोरवणकर यांचा अजित पवारांवर आरोप.
16 Oct 2023, 17:04 वाजता
Meera Borwankar Live | Marathi News LIVE Today : 'कायदेशीर नोटीस पाठवू शकतात, त्यांची इच्छा','पुस्तक न वाचताच टीका','शासकीय जागांवर बिल्डरांची नजर असतेच','पोलिसांची जागा वाचवणं ही आमची जबाबदारी', 'पोलिसांची जागा हस्तांतर करायला विरोध केला', 'आर. आर. पाटलांनी जमीन विकण्यास विरोध केला', ,'बिल्डर, राजकारणी, पोलिसांची युती आहे','अजित पवारांनीच जमीन हस्तांतरीत करायला सांगितली', 'मॅडम यात पडू नका, आंबाचा सल्ला', मीरा बोरवणकर यांची माहिती.
16 Oct 2023, 16:40 वाजता
Meera Borwankar Live | Marathi News LIVE Today : 'केवळ पुण्यातील जमिनीच्या वादावर पुस्तक नाही', 'पोलीस स्टेशनची जागा बिल्डरनं मागितली', 'पुस्तकात अनेक गोष्टींचा खुलासा','पोलिसांची जागा कुणाला देऊ नका', 'आधीच्या पोलीस आयुक्तांनी जागा का दिली नाही', 'अजित दादांचं नाव कुठंही घेतलं नाही', माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांची माहिती.
16 Oct 2023, 16:02 वाजता
अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग
Fire on Ahmednagar-Ashti Railway : अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग लागलीये. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट.
16 Oct 2023, 15:24 वाजता
Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'बोरवणकरांच्या आरोपांबाबत कल्पना नाही','आमच्या ओबीसी बैठका नेहमी सुरू असतात','मी बोरवणकरांचं पुस्तक वाचलेलं नाही','ड्रग्जमाफियांना शोधून काढू', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.