17 Oct 2023, 20:22 वाजता
चाळकवाडी टोलनाक्यावर तुफान राडा
Pune Nashik Toll Naka Rada : पुणे नाशिक महामार्गावर चाळकवाडी टोलनाक्यावर जबरदस्त राडा झाला... तुफान हाणामारी झाली... पुण्यातील सिंहगड स्प्रिंग डेन्स स्कुलचे विद्यार्थी कबड्डी खेळण्यासाठी गेले होते. परतीचा प्रवास करत असताना टोल आकारल्यानं वाद झाला... वाद एवढा विकोपाला गेला की विद्यार्थी आणि टोल कर्मचा-यांमध्ये थेट हाणामारीच सुरू झाली. या राड्यामुळे महामार्गावरुन प्रवास करणा-या प्रवाशांचेही हाल झाले.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
17 Oct 2023, 19:51 वाजता
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज सादर करण्याच्या वेळेत वाढ
Grampanchayat Election Update : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज सादर करण्याच्या वेळेत वाढ करण्यात आलीय. दुपारी 3 ऐवजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वेळ वाढविण्यात आली असल्याचं राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आलं आहे. राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहे. त्यानुसार नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. ती मुदत आता वाढवण्यात आलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
17 Oct 2023, 19:04 वाजता
कल्याणमध्ये कॅबमधून प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग
Kalyan Crime : महिलांनो, खासगी कॅबमधून प्रवास करत असाल तर सावधान..... कारण कल्याणमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. कॅब चालकानं एका तरुणीचा विनयभंग केलाय. ही तरुणी नवी मुंबईमधल्या ऑफिसमधून रात्री निघाली. ती कल्याणला प्रवास करत होती. यावेळी कॅबचालकानं तिचा विनयभंग केला. पीडितेने आरडा ओरडा करताच कॅब चालकाने तरुणीला खाली उतरवलं आणि पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी राकेश जयस्वालला बेड्या ठोकल्यायत. या घटनेमुळे रात्री प्रवास करणा-या महिला सुरक्षित आहेत का, असा प्रश्न निर्माण झालाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
17 Oct 2023, 18:31 वाजता
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तयारी
Sharad Pawar Group : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार आणि त्यांचा पक्ष कामाला लागलाय... शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्यापासून दोन दिवस लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणाराय... १८ आणि १९ ऑक्टोबरला होणा-या या बैठकांना मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, अध्यक्ष, विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांनाही निमंत्रित करण्यात आलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
17 Oct 2023, 17:45 वाजता
संभाजीनगरात मराठवाडा विद्यापीठात 2 विद्यार्थी संघटनांमध्ये तुफान राडा
Sambhaji Nagar Rada : संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 2 विद्यार्थी संघटनांमध्ये जोरदार राडा झालाय. बोर्डावर नाव लिहिण्यावरून दोन विद्यार्थी संघटना आमने सामने आल्या. विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि ABVP कार्यकर्ते एकमेकांना भिडले. विद्यापाठातील राड्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. परास्परांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी याठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी झालीय. पोलिसांनी दोन्ही गटातला वाद शमवलाय मात्र इथं तणाव कायम आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा- संभाजीनगरात मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी संघटनांमध्ये जोरदार राडा
17 Oct 2023, 17:08 वाजता
भीमाशंकरमध्ये पूजेवरून पुजारी, गुरव एकमेकांत भिडले
Bhimashankar Rada : ज्योतिर्लिंग भीमाशंकर इथे पूजेवरून पूजारी आणि गुरव एकमेकांना भिडले. पूजेच्या संधीवरुन त्यांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने जबर हल्ला केला. हा सर्व प्रकार भीमाशंकर मंदिर परिसरात घडला. शंकर कौदरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 जणांविरोधात तर गोरक्ष कौदरे यांच्या तक्रारीवरुन विरोधी गटातले 15 जण, अशा दोन्ही बाजूच्या 36 गुरवांवर राजगुरुनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
17 Oct 2023, 16:25 वाजता
मराठा आरक्षणासाठी मंत्रालयात मराठा उपसमितीची बैठक
Manoj Jarange Patil Ultimatum : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिल्यावर सरकारची धावपळ सुरू झालीय. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटिमला फक्त सात दिवस राहिलेत. मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण देता येईल, यासाठी मंत्रालयात मराठा उपसमितीची बैठक झाली. या बैठकीला चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रविण दरेकर, नरेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी आणि कायदेतज्ञही बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर मराठा उपसमितीचे सदस्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
17 Oct 2023, 16:03 वाजता
छत्रपती शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर पदवी
Pune University : महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर आता पदव्युत्तर पदवी प्राप्त करता येणार आहे.. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुढच्या वर्षापासून विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. शिवाजी महाराजांची शासन व्यवस्था, राजकीय डावपेच, जमीन तसंच सागरी संरक्षणाचा विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करता येणार आहे. देशातला अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम ठरलाय.. भविष्यात यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांसह स्वराज्यासंदर्भातल्या संशोधनाला अधिक चालना मिळणार असल्याचा विश्वास इतिहास तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.
17 Oct 2023, 15:23 वाजता
Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'कुठलीही जागा थेट हस्तांतरित होत नाही','मंत्रिमंडळ आणि महसूल विभागाला अधिकार','प्रसिद्धीसाठी खळबळजनक लिखाण','कुठल्याही चौकशीला तयार''मी बोरवणकरांना म्हटलं जमीन द्यायची नाही तर नका देऊ','मी कधीही आर. आर. पाटलांना सूचना केल्या नाहीत','स्वभाव कडक असला तरी अधिकाऱ्यांशी नीट बोलतो', 'बदल्यांचा अधिकारही आयुक्तांकडे असतो', अजित पवार यांचं वक्तव्य.
17 Oct 2023, 15:13 वाजता
Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'आढावा घेतला म्हणजे हस्तक्षेप केला नाही','मी त्या बातम्यांना महत्त्व देत नाही','बोरवणकरांच्या आरोपांवर बंड यांनी स्पष्टीकरण दिलं','त्या भूखंडांशी माझा संबंध नाही',काम रखडू नये म्हणून आढावा घेतला','आजही ती जागा पोलिसांच्याच ताब्यात', अजित पवार यांची माहिती.