Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर  

Oct 18, 2023, 20:30 PM IST
twitter
Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

18 Oct 2023, 20:25 वाजता

झी मीडियाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये शेअर बाजारात फर्जी बुल रन पर्दाफाश 

 

Special Report on Furzi Bullrun : शेअर बाजारातल्या तेजीमुळे अनेक गुंतवणूकदारांचं उखळ पांढरं झालंय. मात्र या घोडदौडीमागे मोठं गौडबंगाल सुरू असल्याचा झी मीडियाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पर्दाफाश झालाय. त्यामुळे तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर सावध व्हा आणि काय काळंबेरं सुरू आहे ते पाहा...विशेष म्हणजे ज्या कंपन्यांच्या शेअर्सच्या माध्यमातून ही लूट सुरू आहे त्या कंपन्या सरकारी आहेत....कशी सुरू आहे ही लूट पाहूयात झी मीडियाचा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

18 Oct 2023, 19:42 वाजता

विजय वडेट्टीवारांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

 

Vijay Wadettiwar met CM Shinde : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय...मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली..या भेटीत ललित पाटील प्रकरण आणि मराठा ओबीसी कंत्राटी भरती याविषयावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती

18 Oct 2023, 19:17 वाजता

नागपूरच्या हसनबाग भागात एटीएसचा छापा

 

ATS Raid in Nagpur : नागपूरच्या हसनबाग परिसरात ATS चा छापा. पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलंय. परवेझ उर्फ पप्पू पटेल यांच्या घरी ATS चे अधिकारी सकाळी 8.30 पासून करताय तपास. परवेझ पटेल यांचा गाडी खरेदी -विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती. बनावट नोटाप्रकरणी सर्चिंग ऑपरेशन राबवित असल्याची सूत्रांची माहिती. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

18 Oct 2023, 18:38 वाजता

शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार

 

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर आता शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत.22 ऑक्टोबरला शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत .दौंड तालुक्यातील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कुलच्या नव्या वास्तूच्या उद्घाटन होणार आहे या उदघाटन कार्यक्रमाला अजित आणि शरद पवार दोघे एकाच मंचावर असणार आहेत. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या दौंड मधील स्वामी चिंचोली शाळेचा हा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवारांसह सुप्रिया सुळे आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

18 Oct 2023, 18:10 वाजता

आदित्य ठाकरेंकडून मुंबई हायकोर्टात कॅव्हेट दाखल

 

Aditya Thackeray : शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबई हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलीय... दिशा सालियन आणि सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी ही कॅव्हेट दाखल करण्यात आलीय... याप्रकरणी येत्या 20 ऑक्टोबरला मुंबई हायकोर्टात सुनावणी होणाराय.. दिशा सालियन आणि सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नितेश राणे आणि नारायण राणेंनी केला होता. त्यामुळं या खटल्यात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कोर्टानं आपलं म्हणणं आधी ऐकून घ्यावं, यासाठी आदित्य ठाकरेंनी कॅव्हेट दाखल केलीय.

18 Oct 2023, 17:46 वाजता

300 कोटींचं 150 किलो ड्रग्ज जप्त, आतापर्यंत 15 जण अटकेत

 

Lalit Patil : ड्रग्जमाफिया ललित पाटीलला बंगळुरुतून अटक करण्यात आलीये...मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केलीय...या प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आलीय...गेल्या 5 महिन्यांपासून ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरू होता...आतापर्यंत 300 कोटींचं 150 किलो एमडी जप्त करण्यात आलंय...ड्रग्जमाफिया ललिलतला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय...आता याला पळवून लावण्यात कुणाचा हात होता...? तो पळाला की पळवून लावला याचा तपास पोलीस करणार आहेत...कोणत्या राजकाण्यांचा त्याला वरदहस्त आहे? राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतंय का? असे अनेक गंभीर प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत.....
 

18 Oct 2023, 17:05 वाजता

'ललितला सुधारण्याची एक संधी द्यावी', ललितच्या आईची राज्य सरकारकडे विनंती

 

Lalit Patil : पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील याला सुधारण्याची एक संधी द्यावी अशी विनंती त्याच्या आईनं केलीये... त्याच्या राजकीय संबंधांबाबत काहीच कल्पना नव्हती असंही त्या म्हणाल्यात.. ललित पाटीलला अटक झाल्यानंतर त्याच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याचा दावा करण्यात येतोय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

18 Oct 2023, 15:59 वाजता

ड्रग्जमाफियांच्या नेक्ससचा लवकरच पर्दाफाश करणार- देवेंद्र फडणवीस

 

Devendra Fadnavis : ड्रग्जमाफियांच्या नेक्ससचा लवकरच पर्दाफाश करणार, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्यावर आता सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि अनेकांची तोंडं बंद होतील, असं फडणवीसांनी म्हटलंय. 

18 Oct 2023, 15:09 वाजता

विधानसभाअध्यक्ष नार्वेकर-शिंदेंची गुप्त बैठक- सूत्र

 

Rahul Narvekar Met CM Eknath Shinde : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्ये एक गुप्त बैठक झाली - सूत्रांची माहिती..... आमदार अपात्र प्रकरणी चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.. दरम्यान माझ्या विधानसभा मतदार संघातील काम निमित्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिलंय. 

18 Oct 2023, 14:17 वाजता

मुंबईत खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे छापे

 

ED Raids in Mumbai :  मुंबईत ईडीची छापेमारी सुरु. खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीचे मुंबईत छापे. मुंबईत जवळपास ८ ठिकाणी छापेमारी सुरु असल्याची माहिती. पालिकेने खिचडीचे कंत्राट दिलेल्या कंपन्यांवर ईडीचे छापे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-