Maharashtra Breaking News Today LIVE: इस्रायल आणि इराणमध्ये पेटलेल्या युद्धाच्या ठिणगीनं आता वणव्याचं रुप धारण केलं असून अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये सध्या तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातूनही अनेक नागरिक या देशांमध्ये असल्यानं तेथील परिस्थितीवर देश आणि राज्यातील यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, राज्यात स्थानिक स्तरावरील राजकीय घडामोडींनासुद्धा वेग आला आहे. सणवारांमध्ये राज्यात होळीचा उक्साह शिगेला असून प्रामुख्यानं कोकणात शिमगोत्सवाची रंगत आली आहे. ज्यामुळं विविध स्तरांवर काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून, जागतिक स्तरावरील घडामोडींचे देशावर आणि राज्यावर कसे परिणाम होतात, स्थानिक घडामोडींमध्ये नेमक्या कोणत्या घटना सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
2 Mar 2026, 19:42 वाजता
तिसरे महायुद्ध सुरु? 24 तासात जगातील 15 देशांत हल्ले? हिजबुल्लाची एन्ट्री, जगातील सर्वात पावरफुल देश कोणत्या देशांना पाठिंबा देणार?
24 तासात 15 देशांत हल्ले झाले आहेत. ज्याची भिती होती तेच घडतयं? जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. तिसऱ्या महायुद्धाच जगातील सर्वात पावरफुल देश कोणत्या देशांना पाठिंबा देणार? जाणून घेऊया सध्याची संपूर्ण परिस्थिती काय आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा....
2 Mar 2026, 19:11 वाजता
Gold Bracelet Cost: 2 तोळ्याचं सोन्याचं ब्रेसलेट बनवायला किती खर्च येईल?
भारतात सध्या सोन्याच्या किंमती खूप जास्त आहेत. तरीही, जर तुम्ही दोन तोळे सोन्याचे कडे बनवण्याचा विचार करत असाल आणि १४ कॅरेट किंवा १८ कॅरेट सोन्याच्या पर्यायांची तुलना करत असाल, तर हे पूर्ण गणित समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
2 Mar 2026, 18:57 वाजता
कोल्हापूरमध्ये धामण सापांचे दुर्मिळ मिलन; नागरिकांनी गर्दी केली
कोल्हापूर शहरातील जयंती नाला परिसरात धामण जातीच्या दोन सापांचे मिलन पाहायला मिळाले. साधारण एक तास ही मिलन प्रक्रिया चालली. हा दुर्मिळ प्रसंग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पावसाळा किंवा उष्णतेनंतरचा काळ सापांच्या प्रजननासाठी अनुकूल असल्यामुळे अशा प्रकारचे दृश्य क्वचितच पाहायला मिळते. सर्पमित्रांनी नागरिकांना सल्ला दिला की, या काळात सापांना त्रास न देता त्यांच्या संरक्षणाकडे लक्ष द्यावे.
2 Mar 2026, 18:08 वाजता
छत्रपती संभाजीनगर: अतिक्रमण हटाव मोहिमेवरून रणकंदन; MIMसह विरोधी पक्ष नेत्यांवर गुन्हे
छत्रपती संभाजीनगर येथे अतिक्रमण हटाव मोहिमेवरून रणकंदन सुरू आहे. महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्यांसह MIMच्या 14 नगरसेवकांवर अतिक्रमण विरोधी कारवाईला विरोध केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरात राजकीय तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
2 Mar 2026, 17:12 वाजता
‘पश्चिम आशियातील स्थिती चिंतेचा विषय’; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, पश्चिम आशियातील स्थिती चिंतेचा विषय आहे. भारतीयांच्या सुरक्षेसाठी सर्व संबंधित देशांसोबत मिळून काम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताने कायमच शांततेचे आवाहन केले आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
2 Mar 2026, 17:02 वाजता
अमेरिका-इराण युद्धामुळे तेलाचा भडका; पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता
अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. कच्चे तेल सुमारे ६ टक्क्यांनी महागले असून, याचा परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2 Mar 2026, 16:52 वाजता
बीएमसीत महायुतीचा निर्णय: मुंबईतील घरांसाठी मालमत्ताकर सवलतीची मर्यादा वाढवली
बीएमसीने महायुतीचा मोठा निर्णय घेतला असून, मुंबईतील घरांसाठी मालमत्ताकर सवलतीची मर्यादा ५०० चौरस फुटांवरून ७०० चौरस फुटांपर्यंत वाढवली आहे. या सवलतीमुळे पालिकेला सुमारे ७०० कोटी रुपयांचा महसूल तोटा होणार आहे. यापूर्वी ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी घरांना मालमत्ताकरातून सूट दिली जात होती. मालमत्ताकर सवलतीची मर्यादा वाढवण्याची ठराव सूचना शिवसेना (ठाकरे पक्ष)च्या यशोधर फणसे यांनी केली होती.
2 Mar 2026, 16:51 वाजता
इराणचे दोन गुप्तचर प्रमुख ठार, आयडीएफचा हमलाच ठरला ठराविक
इस्रायलच्या आयडीएफने ताज्या ऑपरेशनमध्ये इराणचे दोन महत्त्वाचे गुप्तचर अधिकारी ठार केले. सय्यद याह्या हमीदी, जो इस्रायल व्यवहार विभागाचा गुप्तचर उपमंत्री होता, आणि जलाल पौर हुसेन, हेरगिरी विभागाचे प्रमुख, यांचा मृत्यू झाला आहे. आयडीएफने तेहरानमधील मंत्रालयाच्या मुख्यालयावरही हल्ला केला आहे.
2 Mar 2026, 16:50 वाजता
'उद्धव ठाकरेच निर्णय घेणार,' संजय राऊतांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'शरद पवारांचंही ठरलंय'
Sanjay Raut on Rajya Sabha Election: राज्यसभेवरुन सध्या महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेला राज्यसभेत आपला सदस्य असावं असं जास्त वाटत आहे असं म्हटलं आहे. मविआचा हा तीनतिघाडा आहे. पण कामबिघाडा नाही. काँग्रेसचा निर्णय दिल्लीत होईल. तीन पक्ष बोलत आहेत. तिकडे तीन चाकी रिक्षा आहे. एकाच जागेवरून चर्चा सुरु आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.
बातमीसाठी लिंकवर क्लिक करा
2 Mar 2026, 16:49 वाजता
'इस्त्रायलकडून 100 कोवळ्या मुली ठार, मोदी मूकबधीर होऊन का बसलेत?', राऊतांची विचारणा, मदतीची करुन दिली आठवण
Sanjay Raut on Iran Israel War: इराणच्या सुप्रीम लीडरचं निधन झाल्यानंतर शोक व्यक्त करणं भारताचं कर्तव्य आहे. नरेंद्र मोदी शोक व्यक्त करण्यास का घाबरत आहेत? अशी विचारणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संकटकाळात भारताला अनेकदा इराणने मदत केली आहे, पाठीशी राहिला आहे. पाकिस्तान-भारताचा संघर्ष झाला तेव्हा इराणने भारताला पाठिंबा दिला होता अशी आठवणही संजय राऊतांनी करुन दिली आहे. ते मूकबधीर होऊ का बसले आहेत? असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे.