20 Oct 2023, 23:34 वाजता
याचिका मार्गी लावा म्हणता आणि रोज नवे अर्ज करता- नार्वेकर
Hearing on MLA Disqualification : आमदार अपात्रता सुनावणीवेळी विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटावर नाराजी व्यक्त केलीय. तुम्हाला लवकर याचिका मार्गी लावायची असेल तर नेहमी नवे नवे अर्ज का सादर करता, तुम्ही एकमतानं ठरवा, असं नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या वकिलांना सांगितलंय. तसंच सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेली कागदपत्रं माझ्यापुढे सादर करा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना दिलेत. तर शिंदे गटाला म्हणणं सादर करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आलाय. ठाकरे गट इकडे एक भूमिका घेतो आणि सर्वोच्य न्यायालयात वेगळी भूमिका घेतो, यावरुन नार्वेकरांनी नाराजी व्यक्त केलीय. आमचं प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरण्यात यावं, अशी मागणी शिंदे गटाच्या आमदारांनी केलीय. ती मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केलीय. एकुण 34 सर्व याचिका आता 6 याचिकांमध्ये एकत्र केल्या जाणार आहेत. आमदार अपात्रता प्रकरणाची पुढची सुनावणी 26 ऑक्टोबरला होणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
20 Oct 2023, 18:19 वाजता
ड्रग्जमाफिया ललित पाटीलवरुन फडणवीसांचे थेट उद्धव ठाकरेंवर आरोप
Fadanvis Accused Uddhav Thackeray : ड्रग्जमाफिया ललित पाटीलवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरेंवरच आरोप केले आहेत.. ललित पाटीलला 10 डिसेंबर 2020 रोजी अटक झाली.. तेव्हा ललित पाटील उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा नाशिक शहरप्रमुख होता, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय़. त्यावर संजय राऊतांनी बात निकलेगी तो दूर तक जाएगी म्हणत प्रत्युत्तर दिलंय. तर या सरकारच्या काळात ललित 9 महिने ससूनमध्ये का अॅडमिट होता, असा सवाल तत्कालीन गृहमंत्र्यांनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
20 Oct 2023, 14:16 वाजता
Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : '5 हजार पानांचा पुरवा आढळलाय','घराघरात आरक्षण माहिती होणं गरजेचं','पुरावे सापडले आता 4 दिवसांत कायदा पारित करू शकता','कायदा पारित कारायला आधार लागतो तोही दिला','हैदराबादला उर्दू भाषेतील कागदपत्रं सापडली', मनोज जरांगे यांची माहिती.
20 Oct 2023, 14:02 वाजता
Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'सरकारनं आरक्षण वेळेत दिलं असतं तर आत्महत्या झाल्याच नसत्या','आमच्यासोबत सौदा करण्याचा प्रयत्न झाला','आरक्षणसाठी सरकारला आम्ही 40 दिवस वेळ दिले','सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या', मनोज जरांगे यांची राज्य सरकारकडे मागणी.'टिकणारं आरक्षण देतो सांगून 1 महिना वेळ घेतला','मराठ्यांना आरक्षण द्याचं म्हटलं की पुरावे लागतात','कुणबी म्हणजे शेती, शेती हा सुधारित शब्द','मग कुणबी प्रमाणपत्र मागितलं तर हरकत काय?','मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का?','कागदपत्र मिळवण्यासाठी सरकार हैदराबादला गेलं', मनोज जरांगे यांची माहिती.
20 Oct 2023, 13:53 वाजता
Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'शांततेचं युद्ध रोखण्यासाठी ताकद देशात, राज्यात नाही','शांततेच्या मार्गानेच आरक्षण मिळवणार हा माझा शब्द','समाजाशी गद्दारी करणार नाही','आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही','लेकरांच्या वाट्याला आता कष्ट नको','आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही','आरक्षणशिवाय एक इंचही माघार नाही', मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा.
20 Oct 2023, 13:41 वाजता
Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'आपल्या कुटुंबातील एक सदस्य गेला','आत्महत्या करणाऱ्या सुनील कावळेंना श्रद्धांजली','कावळेंच्या कुटुंबाला एकटं सो़डणार नाही','सरकारच्या भूमिकेमुळे बळी जातायत','आत्महत्येला सरकार जबाबदार','मराठ्यांचं नशीबच खूप बळकट आहे','मराठ्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही','मराठ्यांचं दु:ख, वेदना सहन होत नाहीत','मराठ्यांच्या नादी लागू नका','मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा.
20 Oct 2023, 12:58 वाजता
Sanjay Raut Live | Marathi News LIVE Today : 'गृहमंत्र्यांनी ड्रग्जप्रश्नावर बोलावं','गुजरातमधून ड्रग्जची तस्करी केली जातेय','शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा','शिक्षणाधिकाऱ्यांनाही ड्रग्जचे हप्ते मिळाले का?''विद्यार्थी तरुणांना वाचवण्यासाठी मोर्चा','मोर्चात विद्यार्थ्यांना यायला बंदी घातली','नशेमुळे मुलं आत्महत्या करतायत', खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य
20 Oct 2023, 12:37 वाजता
Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'कंत्राटी भरतीसाठी 9 कंपन्या नियुक्ती मविआची','ते पाप आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न','ललित प्रकरणातील गोष्ट नंतर समोर आणणार','ठाकरे सरकारच्या काळात ललित पाटीलला अटक', '14 दिवसांच्या रिमांडमध्येच ललित ससूनमध्ये','ललित पाटील नाशिक शिवसेनेचे अध्यक्ष होते','ललित पाटीलला 10 डिसेंबर 2020ला अटक','आता तुम्ही ठरवा कुणाची नार्को करायची?','ललित पाटील चौकशी का केली नाही?','या प्रकरणी आधीचे मुख्यमंत्री, गृहमंत्री जबाबदार', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य.
20 Oct 2023, 12:27 वाजता
Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करणार','मविआ सरकारमध्ये मुंबईत पोलीस भरती नाही','आम्ही पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला','आरोप करणार असतील बुरखा फाडावा लागेल', 'आमच्या काळात कंत्राटी भरती झालेली नाही', 'तरुणांची दिशाभूल केल्यामुळे माफी मागा' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी.
20 Oct 2023, 12:21 वाजता
Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'पहिली कंत्राटी भरती शिक्षण विभागात','कंत्राटी भरतीला उद्धव ठाकरेंनीही मान्यता दिली','शरद पवारांच्या आशीर्वादाने कंत्राटी भरतीला मान्यता','आता सर्वांचे घोटाळे उघड करणार','2010 साली काँग्रेसनं जीआर काढला','कंत्राटी भरतीचं पाप काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेचं','कंत्राटी भरतीवर बोलणाऱ्यांना लाज का वाटत नाही?','कंत्राटी भरती निर्णय रद्द करणार', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा.