21 Oct 2023, 14:45 वाजता
प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांची भेट
Prakash Ambedkar & Sharad Pawar Meet : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत.. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा सुरु आहे.. यशवंतराव चव्हाण सेंटरवर एका कार्यक्रमानिमित्त प्रकाश आंबेडकर आले होते.. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेही स्टेजवर होत्या.. सुळे यांनीच विनंती केल्याने प्रकाश आंबेडकर शरद पवारांच्या भेटीला गेलेत.. पवार आणि आंबेडकर यांच्यातला राजकीय वाद कायम चर्चेत असतो.. त्यातच आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आलंय.. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार मविआत सहभागी होण्याची इच्छा बोलून दाखवलीय. तेव्हा या भेटीनंतर आंबेडकरांचा मविआत जाण्याचा मार्ग मोकळा होतो का हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Oct 2023, 13:29 वाजता
ललित पाटीलला कुणाचा आशीर्वाद?
Dada Bhuse Vs Sanjay Raut : ड्रग्जमाफिया ललित पाटीलवरुन संजय राऊत आणि दादा भुसे आमनेसामने आलेत... संजय राऊतांमुळेच ललित पाटील शिवसेनेत आल्याचा आरोप दादा भुसेंनी केलाय. ड्रग्स प्रकरणी खोलात जाऊन चौकशी झालीच पाहिजे अशी प्रतिक्रियाही भुसेंनी दिलीय. तर दुसरीकडे ललित पाटीलला दादा भुसेंनीच पोसल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Oct 2023, 13:20 वाजता
ललित पाटील प्रकरणातील आणखी एकाला अटक
Drugs Mafia Lalit Patil : ललित पाटील प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आलीय...ललितचा सहकारी रेहान शेखला पुणे पोलिसांनी अटक केलीय...ललितच्या तपासातून धक्कादायक बाबी समोर आल्यायत...हा रेहान ललितला मदत करत असल्याचं समोर आलंय...याआधी ललित पाटील ची मैत्रीण प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम यांनाही अटक केलीय....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Oct 2023, 12:05 वाजता
मनोज जरांगेंच्या अल्टिमेटमला उरले 3 दिवस
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 ऑक्टोबरची डेडलाईन दिलीय.. मात्र मराठा आरक्षणासाठी दिलेली ही डेडलाईन हुकण्याची शक्यता आहे.. कारण राज्य सरकारने दिलेल्या समितीचा अहवाल तयार होण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत वेळ लागू शकतो... सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलीय.. त्यासाठी शिंदे समिती कुणबी पुरावे जमा करतंय.. मात्र मराठवाड्यात कोट्यवधी कागदपत्रं चाळूनही समितीच्या हाती कुणबी जातीच्या फक्त 5 हजार नोंदी आढळल्या आहेत.. यामुळे राज्य सरकारसमोरची अडचण मात्र वाढलीय.. नोंदीच सापडत नसल्याने सरकार 24 ऑक्टोबरपर्यंत कुणबी जात प्रमाणपत्रांचा निर्णय घेऊ शकेल का, हा प्रश्न कायम आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Oct 2023, 11:23 वाजता
गगनयान क्रू मॉड्यूलची यशस्वी चाचणी
Mission Gaganyan : तांत्रिक अडचणीवर मात करत अखेर इस्रोनं मिशन गगनयानच्या क्रू एस्केप सिस्टमची चाचणी यशस्वी केली. सकाळी 10 च्या सुमारास इस्रोच्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन गगनयानचं क्रू मॉडेल लाँच करण्यात आलं. तांत्रिक अडचणीमुळे चाचणी थांबवण्यात आली होती. अखेर अडचणीवर मात करून मॉड्युल अवकाशात सोडण्यात आलं. त्यानंतर ठाराविक ठिकाणावरून पॅराशूटद्वारे क्रू मॉडल पुन्हा जमिनीकडे पाठवण्यात आले. त्यानंतर हे मॉड्युल समुद्रात स्थिरावलं. अंतराळवीरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आजची मानवरहीत चाचणी यशस्वी झाल्यानंतर इस्रोच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Oct 2023, 10:43 वाजता
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता
Aaditya Thackeray : दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.. आदित्य ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीय.. आदित्य ठाकरे यांनी खोटं शपथपत्र दाखल करून हायकोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप मूळ याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांनी केलाय.. हायकोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंवर कारवाईची मागणी पठाण यांनी केलीय. दिशाचा मृत्यू झाला तेव्हा आदित्य ठाकरेंचा मोबाईल त्याच परिसरात कसा होता असा सवालही त्यांनी केलाय. आजोबा वारल्याचा आदित्य ठाकरेंचा दावाही खोटा असल्याचाही आरोप राशिद खान पठाण यांनी केलाय. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करण्याची मागणी करणारी मूळ याचिका राशिद खान पठाण यांनीच केलीय. तर याप्रकरणी आदित्य ठाकरेंनी हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Oct 2023, 10:41 वाजता
वर्षा गायकवाड यांचा शिंदे सरकारवर निशाणा
Varsha Gaikwad : आझाद मैदानात होत असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळाव्याची झळ थेट रावणदहनाला बसण्याची चिन्हे आहेत. या मैदानावर सध्या दोन संस्थांतर्फे रामलीला कार्यक्रम होत असून, विजयादशमीला त्यात रावणवधाचा प्रसंग साकारण्याचे नियोजन होते. मात्र,शिवसेनेच्या मेळाव्यापूर्वी हे मैदान रिकामे व्हावे, यासाठी ‘नवव्या दिवशीच रावणवध आटोपून घ्या’ अशा सूचना दिल्याची माहिती आहे...यावरून काँग्रेसने शिंदे सरकारवर निशाणा साधलाय...रामाचं नाव फक्त राजकारणासाठी वापरलं जात असून, हेच का खरं हिंदुत्व असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Oct 2023, 10:36 वाजता
राज्यात 32 हजार शिक्षक भरती
Teacher Recruitment : राज्यात लवकरच 32 हजार शिक्षकांची भरती होणार आहे...या भरतीचं वेळापत्रक फायनल करण्यात आलंय...तीन टप्प्यात राज्यात शिक्षकांची भरती केली जाणाराय...24 जिल्ह्यांची बिंदुनामावलीही अंतिम झालीय...आणखी दहा जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून पडताळली जातेय...16 ऑक्टोबरपासून संस्थांसह ज्या जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम झाली, त्यांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्याचे आदेश देण्यात आलेयत...तीन आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Oct 2023, 09:06 वाजता
आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक
Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय.. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी कऱण्यात आलीय.. राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये तसंच गावागावांमध्ये नेत्यांना गावबंदी करणारे फलक लागलेले आहेत.. चुलीत गेले नेते आणि पक्ष, मराठा आरक्षण एकच लक्ष असा मजकूर या फलकांवर लिहिण्यात आलाय.. त्यावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो लावण्यात आलाय. मराठा आरक्षणाची मागणी करत या फलकांवर राजकीय नेत्यांचा निषेधही करण्यात आलाय. मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
21 Oct 2023, 08:34 वाजता
अजित पवारांकडून पुण्यातील विकासकामांचा आढावा
Pune Ajit Pawar : पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार कामाला लागलेयत... आज सकाळीच साडे सहा वाजताच अजित पवारांनी पुण्यातील विकासकामांचा आढावा घेतलाय...वडगाव शेरी मतदारसंघात महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या कामांची अजितदादांनी पाहणी केली...तसंच येरवड्यात नदीसुधार योजना, खराडीतील ऑक्सिजन पार्क आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे...या कामांची पाहणी करून आढावा घेतलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -