24 Mar 2024, 23:02 वाजता
मुंबई रणजी क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ
Mumbai Ranji Team : मुंबईच्या रणजी क्रिकेटपटूंना पुढील हंगामापासून दुप्पट मानधन मिळणाराय...BCCI प्रमाणेच खेळाडूंना मानधन देण्याचा निर्णय MCAने घेतलाय. या निर्णयामुळे मुंबईच्या रणजी खेळाडूंचे मानधन थेट दुप्पट होणार आहे. रणजी करंडक स्पर्धेचे महत्त्व वाढवणे आणि ‘एमसीए’ कार्यक्षेत्रात लाल चेंडूने होणाऱ्या सामन्यांना चालना देणे हा यामागचा उद्देश असल्याचं MCA ने सांगितलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
24 Mar 2024, 22:35 वाजता
चंद्रपुरातून काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर लढणार
Pratibha Dhanorkar : चंद्रपुरातून काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळालीय. काँग्रेसनं प्रतिभा धानोरकरांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार, शिवानी वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा होती. मुलीला तिकीट मिळावं यासाठी विजय वडेट्टीवारांनी लॉबिंग केलं होतं. मात्र त्याला यश मिळालं नाही. आता धानोरकर यांना तिकीट मिळालंय. धानोरकरांची लढत भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याशी होणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
24 Mar 2024, 22:10 वाजता
अभिनेत्री कंगना रनौत हिमाचलच्या मंडीमधून निवडणूक लढणार
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौतला भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केलीय.. हिमाचल प्रदेशमधल्या मंडी या लोकसभा मतदारसंघातून कंगना रनौत लोकसभेची निवडणूक लढवेल.. कंगनाला भाजपकडून तिकीट मिळणार याची आधीपासूनच चर्चा होती. अखेर भाजपने आज यादी जाहीर केल्यावर यावर शिक्कामोर्तब झालं.. तसंच अभिनेते अरुण गोविल यांनाही मेरठमधून लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय.. रामायण या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल त्यामुळे आता लोकसभेच्या लढाईत उतरले आहेत.. आता जनता या दोघांना काय कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
24 Mar 2024, 21:08 वाजता
भाजपची लोकसभेची पाचवी यादी जाहीर
BJP 5th list announced : भाजपने लोकसभेची पाचवी यादी जाहीर केलीय.. त्यात महाराष्ट्रातल्या तीन जागांचा समावेश आहे.. आजच्या यादीत सोलापूर, गडचिरोली-चिमूर आणि भंडारा गोंदियाचे भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत.. सोलापूरमधून विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याऐवजी राम सातपुतेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे.. तसंच प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आक्रमक आणि युवा चेहरा म्हणून राम सातपुते यांना संधी देण्यात आली आहे. तर भंडारा गोंदियामधून विद्यमान खासदार सुनील मेंढेंची उमेदवारी कायम ठेवण्यात आलीय.. गडचिरोली-चिमूरमध्येही विद्यमान खासदार अशोक नेतेंनाच तिकीट मिळालंय..धर्मराव बाबा आत्राम यांचा पत्ता कट झालाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
24 Mar 2024, 19:04 वाजता
उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदे गटात प्रवेश
Raju Parwe : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय... उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवेंनी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षावर हा पक्षप्रवेश झालाय.. राजू पारवेंना महायुतीतून लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
24 Mar 2024, 18:36 वाजता
'पराभव दिसत असल्यानं खाती गोठवली', विजय वडेट्टीवारांचा भाजपला टोला
Vijay Wadettiwar on BJP : भाजपला पराभवाची भीती वाटते म्हणूनच काँग्रेसची खाती गोठवण्यात आली असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. याचवेळी त्यांनी भाजपला जोरदार टोलाही लगावलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
24 Mar 2024, 18:08 वाजता
'महादेव जानकर महायुतीत राहणार', सुनील तटकरेंची घोषणा
Sunil Tatkare : शरद पवारांना मोठा धक्का बसलाय.. कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर महायुतीमधून लढणार आहेत. महादेव जानकरे हे माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते.. पवारांनीही माढ्याची जागा महादेव जानकरांना सोडण्याची तयारी दाखवली होती.. महादेव जानकर आणि शरद पवारांची भेटही झाली होती. मात्र महादेव जानकरांनी यू टर्न मारत महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय.. महादेव जानकरांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.. वर्षावर झालेल्या या बैठकीत जानकरांनी महायुती सोबतच राहण्याचा निर्णय घेतला..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
24 Mar 2024, 17:41 वाजता
'शिवरायांच्या गादीचा भाजपकडून अपमान',संजय राऊतांची टीका
Sanjay Raut on BJP : दिल्लीतील उदयनराजे, अमित शाह भेटीवरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केलीय...उदयनराजेंना उमेदवारीसाठी दिल्लीत पाच पाच दिवस वेटिंगला ठेवलं...हा शिवरायांच्या गादीचा अपमान आहे...याचा उदयनराजेंनी विचार करायला हवा असं म्हणत राऊतांनी टीका केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
24 Mar 2024, 16:15 वाजता
आमदार बच्चू कडू वाढवणार महायुतीचं टेन्शन
Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू वाढवणार महायुतीचे टेन्शन...भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात देणार उमेदवार..खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांचा विरोध...येत्या 6 तारखेला बच्चू कडू यांचा उमेदवारी अर्ज भरणार ....भाजपचा एक मोठा नेता प्रहार मध्ये येणार असल्याची माहिती...
24 Mar 2024, 15:18 वाजता
महायुतीचं जागावाटप होळीनंतरच होणार?
Mahayuti Seat Sharing : महायुतीचं जागावाटप होळीनंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीत जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. राष्ट्रवादीला सहा ते सात जागा हव्या आहेत. साता-याच्या जागेवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तिढा आहे. तसंच नाशिकमध्येही तिढा कायम आहे. शाहांबरोबर झालेल्या बैठकीची माहिती अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिली. त्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आता राज्यात पुन्हा खलबतं होणार आहेत.