Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

24 May 2024, 11:24 वाजता

सांगलीत उष्माघातानं कोंबड्या दगावल्या

 

Sangli Heatwave : उष्माघातामुळे तब्बल बाराशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या पलूस तालुक्यातील आंधळी गावात घडली. सीताराम जाधव यांच्या पोल्ट्रीमधल्या 1200 कोंबड्यांचा उष्माघातामुळे एकाच दिवसात मृत्यू झाला. वाढतं तापमान त्यातच मंगळवारी भर दुपारी अचानकपणे लोडशेडिंग झालं त्यामुळे उष्माघाताने या कोंबड्या दगावल्या. यामुळे पोल्ट्री व्यावसायिकाचं लाखों रुपयाचं नुकसान झालं. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 May 2024, 11:03 वाजता

नागपुरातील पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

 

Nagpur : पुण्यातील कल्याणीनगर अपघातानंतर नागपुरातील पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आलंय... पोलिसांनी नियमांची मायमल्ली करणाऱ्या 8 बार रेस्टॉरंट, 3 रूफ टॉपवर कारवाईचा बडगा उगारलाय. पुण्यातील घटनेनंतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी बार, पबवर कारवाई करण्यात येत आहे. तर पोलिसांनी बार, रेस्टॉरंट आणि पब मालकांना नियमांचं काटेकोर पालन करण्यास सांगितंय. 

बातमी पाहा - पुणे अपघातानंतर नागपूरमध्ये बेकायदेशीर बार, पबवर कारवाईचा बडगा

24 May 2024, 10:44 वाजता

नोकरांच्या धाडसामुळे दरोडोखोर जेरबंद

 

Pune : पुण्यात नोकरांच्या धाडसामुळे 3 दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश आलंय...धाडसी नोकरांनी मालकाच्या घरात दरोडा टाकणा-या दरोडेखोरांना घरात डांबून ठेवलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलंय...प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील चांदणी चौक परिसरात पाण्याच्या टाकीजवळ कलासागर नावाची सोसायटी आहे...याच सोसायटी पुरोहीत नावाच्या रहिवाश्याचा फ्लॅट आहे...त्यांचा केटरींगचा व्यवसाय असून त्यांच्या घरी नोकर असतात...मात्र काही कामानिमित्त पुरोहीत कुटुंबिय गावी गेले असताना तिघेजण एका दुचाकीवर आले. घरात दोघेच जण असल्याचे पाहून तिघेजण अचानक घरात शिरले. नोकरांना धाक दाखवून घरातील तिजोरी कुठे ठेवलीय याची विचारणा केली...तिजोरी कुठे आहे हे न सांगितल्यास आपल्या जीवावर बेतू शकतं हे पाहता त्याने तिजोरी बाबत सांगितले...यावेळी तिघेही जण तिजोरी बाहेर ओढून आणत असताना त्यातील दोन्ही नोकरांनी शक्कल लढवत दरोडेखोरांना घरातच बंद करून बाहेरून कडी लाऊन घेतली...आणि दरोडेखोरांना पोलिसांच्या हवाली दिलं...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 May 2024, 10:26 वाजता

स्फोटाला मालकांसह, सरकार जबाबदार - अंबादास दानवे

 

Ambadas Danve On Dombivli Blast : डोंबिवली दुर्घटनेला उद्योग विभाग आणि सरकार जबाबदार आहे असा आरोप विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय. डोंबिवली MIDC त जिथे स्फोट झाला तिथली पाहणी दानवेंनी केली.. यावेळी दानवेंनी हल्लाबोल केला.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 May 2024, 10:10 वाजता

वाशिममध्ये भीषण पाणीटंचाई

 

Washim Water : वाशिम जिल्ह्यातील खैरखेडावासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. वाढलेल्या तापमानामुळे वाशिम जिल्ह्यातील जलपातळी झपाट्याने खालावली असून काही गावांत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. मध्यम प्रकल्पात 19 टक्के तर लघू प्रकल्पात फक्त 16टक्के जलसाठा उपलब्ध आहे.जिल्ह्यातील 13 गावाना पाणी टंचाईची समस्या जाणवतेय. सर्वाधिक पाण्याची कमतरता ही खैरखेडा गावात जावणतेय. महिला, पुरुषांसह लहानग्यांपासून वयोवृद्धांनाही पाण्यासाठी भर उन्हात दोन किलोमीटर अंतराचा घाट रस्ता चढून पाण्याची गरज भागवावी लागतेय..तसंच पाण्याअभावी  युवकांचं लग्न जमत नसल्याचंही सांगण्यात येतंय.  त्यामुळे प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू करण्याची मागणी खैरखेडा ग्रामस्थ करतायत. दरम्यान, जिल्ह्यात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून पाणी टंचाईबाबत उपाययोजना सुरू असल्याचं जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी सांगितलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 May 2024, 09:58 वाजता

मुळशी धरणात 17.98 टक्के पाणीसाठा 

 

Mulshi Dam Water : मावळच्या मुळशी धरणात केवळ 17.98 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिन्याअखेर पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागलंय... मावळचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यँत पोहोचलाय... याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर होऊ लागलाय.... त्यामुळे 40 गावांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागणारे...यासाठी पुणे पाटबंधारे खात्यानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

24 May 2024, 09:57 वाजता

अपघातातील पोर्श कारची फॉरेन्सिक तपासणी

 

Pune Car Accident Update : पुणे कल्याणीनगर अपघातातील आलिशान पोर्श कारची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आलीय. पुणे पोलिसांनी अपघातातील कार जप्त केली होती. गाडीची वेग मर्यादा, कॅमेरे, चित्रीकरण, अपघातानंतर झालेली कारची अवस्था याचा पथकानं आढावा घेतलाय. यासंबंधीचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.. 

24 May 2024, 08:58 वाजता

डोंबिवलीतील स्फोट प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

 

Dombivli Blast Update : डोंबिवलीतील स्फोट प्रकरणी आणखी एकाचा मृत्यू झालाय...त्यामुळे आतापर्यंत एकूण 9 जणांचा मृत्यू झालाय...दुस-या दिवशीही NDRF, TDRF कडून शोधमोहीम सुरू आहे...स्फोटाच्या ठिकाणी सर्व सामान छिन्न विच्छिन्न अवस्थेत आहे...त्यामुळे ढिगाऱ्याखाली कोणी अडकलंय का? याचा शोध घेतला जातोय...स्फोटात संपूर्ण कंपनी उद्धवस्त झाली असून, अजूनही शोध कार्य सुरू आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 May 2024, 08:55 वाजता

डोंबिवलीतील स्फोट प्रकरण, कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल

 

Dombivli Blast Update : डोंबिवली एमआयडीसी कंपनी रिअ‍ॅक्टर ब्लास्ट प्रकरणी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता या कंपनीच्या मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. याप्रकरणी आता कारवाईला वेग आलाय...

24 May 2024, 08:21 वाजता

कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात कारवाईला वेग

 

Pune Car Accident Update : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी पोलिसांची 10 पथकं स्थापन करण्यात आलीयेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडून पथकातील पोलीस अधिका-यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. तपासाबाबत सर्व पथकांना सूचना देण्यात आल्यात. प्रत्येक पथकाला जबाबदारी आणि काम ठरवून देण्यात आलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - Pune Car Accident Action Update पॉर्श अपघात प्रकरणी कारवाईला वेग, तपासासाठी पोलिसांची 10 पथकं स्थापन