Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय, 437 नवे रुग्ण, 2 रुग्णांचा मृत्यू

Maharashtra BreakinNews Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय, 437 नवे रुग्ण, 2 रुग्णांचा मृत्यू

25 Mar 2023, 22:35 वाजता

सीएसएमटीवर अनोखा ड्रामा

 

CSMT Drama : मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रात्री साडे नऊच्या सुमाराला अनोखा ड्रामा पाहायला मिळाला. प्लॅटफॉर्म क्रमांक 9च्या छतावर एक माथेफिरु चढला. तिथून खाली उडी मारायची तो धमकी देत होता. त्याच्या या ड्रामामुळे लातूर एक्स्प्रेसचा खोळंबा झाला. आणि त्याचा नाहक मनस्ताप प्रवाश्यांना सहन करावा लागला. सुमारे अर्ध्या तासानंतर या माथेफिरूला खाली उतरवण्यात यश आलं.  

बातमी पाहा - CSMTस्टेशनवर अनोखा ड्रामा, माथेफिरू चढला छतावर, वरून खाली उडी मारायची दिली धमकी, रेल्वे वाहतूक रखडली

25 Mar 2023, 21:11 वाजता

इंदुरीकर महाराजांची गौतमी पाटीलवर टीका

 

Indurikar Maharaj On Gautami Patil : तीन गाणे वाजवून तिला तीन लाख आणि आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला म्हणून आरोप...अशा शब्दात प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलचं नाव न घेता समाचार घेतलाय. गाण्यांच्या कार्यक्रमात हाणामारी होते, काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिलं जात नाही असं म्हणत इंदुरीकरांनी गौतमीवर टीकेची तोफ डागलीय. 

बातमी पाहा - गौतमी पाटील इंदुरीकर महाराजांच्या निशाण्यावर; असं काही म्हणाले की...

25 Mar 2023, 20:08 वाजता

गौतमीचा ठसका, पोलिसांना ताप

 

Gautami Patil : नगरमधल्या कोपरगावात पुन्हा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमात राडा झालाय. कोपरगावच्या (Kopargav) कोळपेवाडीत महेश्वर यात्रेच्या निमित्ताने गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मंचासमोर एका तरुणाने गौतमी सारखा डान्स करण्याचा प्रयत्न केला. तर अनेक तरुण सेल्फीसाठी स्टेजजवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी आणि गोंधळ झालाच. शेवटी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. प्रत्येकवेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पोलीस प्रशासनाची मोठी दमछाक होताना बघायला मिळते..

बातमी पाहा - गौतमी पाटीलचा कार्यक्रम रंगात आला, स्टेजवर चढून तरूणाने केली तिची कॉपी, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

25 Mar 2023, 19:41 वाजता

चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा

 

Chandrapur Rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं. सकाळपासूनच चंद्रपुरात ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर अचानक अंधारून येत पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय. असं असलं तरी शेतक-यांची मात्र चिंता वाढलीय. पावसामुळे रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

बातमी पाहा - चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा तडाखा, पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

25 Mar 2023, 19:30 वाजता

राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय

 

Maharashtra Corona Update : राज्याची चिंता वाढवणारी बातमी.. राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय.. आज एका दिवसात 437 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर आज राज्यात दोन मृत्यूंची नोंद झालीय.. 

बातमी पाहा - धक्कादायक! महाराष्ट्रात कोरोनामुळे आज दोघांचा मृत्यू, सावधान, कोरोना पुन्हा पसरतोय हात-पाय

 

25 Mar 2023, 18:20 वाजता

भोंदूबाबांपासून सावधान!

 

Amravati Bhondu Baba : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी येथील एका भोंदूबाबा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय...यामध्ये हा बाबा चक्क गरम तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद देत असल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसतंय...या व्हिडिओमध्ये संत सच्चिदानंद गुरुदास महाराज म्हणून स्वत:ला महाराज समजणारा भोंदूबाबा तव्यावर बसून भक्तांना आशीर्वादच देत नाहीये...तर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुद्धा करताना दिसत आहे...दैवी शक्ती प्राप्त होत असल्याचा दावा या बाबाने केलाय...दैवी शक्ती दरम्यान मला भान राहत नसून मी अंधश्रद्धा पसरवत नसल्याचे या भोंदूबाबाचा दावा आहे...त्यामुळे अंनिसने या बाबाला चॅलेंज दिलंय...महाराजांचा हा चमत्कार खरा असेल तर त्यांनी तो आमच्यासमोर सिद्ध करावा...आम्ही तीस लाखांचं बक्षीस देऊ नाहीतर महाराजाला अटक करावी अशी मागणी अंनिसने केलीय...

बातमी पाहा - काय आहे चुलीवरच्या बाबाच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?, सावध राहण्याचं अंनिसचं आवाहन

25 Mar 2023, 17:34 वाजता

दहिसर मारहाणप्रकरणी एसआयटी चौकशी करा - अनिल परब

 

Dahisar Rada : मुंबईत दहिसरमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आपआपासात भिडले होते, त्याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी केलीय. दहिसरमध्ये शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंचे बॅनर काढल्यावरुन भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाली होती. याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी परबांनी केलीय. महाशक्ती छोट्या शक्तीकडून मार खातेय असा टोला त्यांनी लगावला.. 

बातमी पाहा - दहिसर मारहाणप्रकरणी SIT चौकशी करा - ठाकरे गटाचे नेते अनिल परबांची विधानसभेत मागणी

25 Mar 2023, 17:04 वाजता

सदा सरवणकरांचा पिस्तूल परवाना रद्द होणार

 

Devendra Fadanvis On Sada Sarvankar : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्या पिस्तुलीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु झालीय, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (DCM Devendra Fadanvis) दिलीय.. दादरमध्ये शिंदे-ठाकरे गटात राडा (Thackeray & Shinde Camp Rada) झाला होता त्यावेळी सरवणकरांनी पिस्तुलाचा धाक दाखवल्याची तक्रार दाखल झाली होती.. त्यावर आता कारवाई सुरु झालीय.

बातमी पाहा - शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा पिस्तुलीचा परवाना रद्द होणार; गणेशोत्सवातील वाद अंगाशी

25 Mar 2023, 16:58 वाजता

राहुल गांधींकडून सावरकरांचा वारंवार अपमान - मुख्यमंत्री

 

Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींनी (Rahul Gandhi) एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून यावं, अर्धा तास घाण्याला जुंपलं तर सावकरांना झालेल्या वेदना त्यांना कळतील.. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) राहुल गांधींना टोला लगावलाय. सावरकर (Savarkar) फक्त महाराष्ट्राचं नाही तर देशाचं दैवत आहेत, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला.. 

बातमी पाहा - राहुल गांधींना अर्धा तास घाण्याला जुंपलं तर...; 'मी सावरकर नाही' विधानावरुन एकनाथ शिंदे संतापले

 

25 Mar 2023, 15:36 वाजता

संजय राऊत हक्कभंग प्रकरण राज्यसभेकडे

 

Sanjay Raut Hakkabhang : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगासंदर्भात आता केंद्राच्या कोर्टात चेंडू ढकलण्यात आलाय. विधानसभेकडून हक्कभंग प्रकरण राज्यसभेत पाठवण्यात आलंय. खासदार राऊत यांनी केलेला खुलासा विचारात घेऊन संसदीय कार्यपद्धती तपासण्यात आली. राऊत यांनी हक्कभंग समितीवर आक्षेप घेणं चुकीचं असल्याचं उपसभापती गो-हे यांनी म्हटलंय. त्यांचा खुलासा योग्य वाटत नसल्याचं नमूद करत हे प्रकरण राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलंय. 

बातमी पाहा - संजय राऊत यांचीसुद्धा खासदारकी जाणार? हक्कभंग प्रकरणाची सुनावणी आता राज्यसभेत