Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra BreakinNews Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

25 May 2023, 21:22 वाजता

केमिस्टकडून पूर्ण टॅबलेट स्ट्रीप घेणं बंधनकारक नाही

 

New Medicine Policy : आता आरोग्य क्षेत्रातून एक मोठी बातमी...येत्या काळात मेडिकलमधून तुम्हाला टॅबलेट खरेदी करताना पूर्ण स्ट्रीप खरेदी करण्याचं बंधन असणार नाही. यासंदर्भात केंद्र सरकार लवकरच एक नवीन धोरण आणणारंय. तुम्ही केमिस्टकडे गेल्यानंतर तुम्हाला जितक्या टॅबलेट्स हव्या आहेत तेव्हढ्याच खरेदी करू शकता. विशेष म्हणजे प्रत्येक टॅबलेटमागे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्स्पायरी डेट असेल. टॅबलेटच्या दोन्ही बाजुला क्युआर कोड छापण्याबाबतची सूचनाही केली जाणारंय. अनेकदा रूग्णाला गरज नसतानाही केमिस्टकडून गोळ्यांची पूर्ण स्ट्रीप खरेदी करावी लागते. यात आर्थिक नुकसानाही होतं आणि रूग्ण बरा झाल्यानंतर त्यातील उरलेल्या गोळ्या फेकून द्याव्या लागतात. त्यामुळेच केंद्र सरकार नवीन धोरण आणण्याच्या तयारीत आहे. 

बातमी पाहा - मेडिकल स्टोअरमधून गोळ्या घेण्याबाबत येणार 'हे' नवं धोरण, पाहा महत्त्वाची बातमी

25 May 2023, 20:28 वाजता

...तर आरएसएसवर बंदी - प्रियांक खरगे

 

Priyank Kharge ON RSS : कर्नाटक सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचे सुपुत्र प्रियांक खरगे यांनी RSSबाबत मोठं विधान केलंय. कर्नाटकातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर RSSवर बंदी आणू असा इशारा प्रियांक खरगे यांनी दिलाय. प्रियांक खरगे यांच्या विधानाचे RSSमध्ये  तीव्र पडसाद उमटले आहेत. RSS बंदीचे अनेक प्रयत्न झाले मात्र ते कधीही यशस्वी झाले नाहीत. केवळ प्रसिद्धीसाठीच प्रियांक खरगेंनी हे विधान केलंय अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून उमटलीय. 

बातमी पाहा - "...तर RSS वर बंदी आणू", खरगेंचा इशारा, RSS ची प्रतिक्रिया पाहा

25 May 2023, 19:39 वाजता

मिग 29 केचं यशस्वी नाईट लँडिंग

 

MIG 29 K Night Landing : भारतीय नौदलानं एक मैलाचा दगड गाठलाय. रात्रीच्या वेळी आयएनएस विक्रांतवर मिग 29 केचं यशस्वी लँडिंग करण्यात आलं. हे पहिलं नाईट लँडिंग आहे. आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं भारतीय नौदलासाठी महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. संरक्षणमंत्री राजनाथ सिंगांनी सर्व क्रुचं कौतुक करत अभिनंदन केलंय. 

बातमी पाहा - इंडियन नेव्हीचा भीमपराक्रम! ऐतिहासिक कामगिरी करत असं उतरवलं MIG 29K विमान; पाहा Video

25 May 2023, 19:14 वाजता

केंद्राच्या अध्यादेशाविरोधात पवार केजरीवालांसोबत

 

Arvind Kejriwal Meet Sharad Pawar : प्रशासकीय अधिका-यांच्या बदल्यासंदर्भात केंद्र सरकारनं आणलेल्या अध्यादेशाविरोधात पवारांनी केजरीवालांना पाठिंबा दिलाय. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी शरद पवारांची भेट घेतली. बाय बी चव्हाण सेंटरमध्ये दोघांची भेट झाली. केंद्रानं आणलेल्या अध्यादेशाविरोधात केजरीवाल सध्या सर्व पक्षांची भेट घेतायत आणि या अध्यादेशाविरोधात पाठिंबा देण्याची विनंती करतायत. 

बातमी पाहा - भाजपविरोधात विरोधकांची एकजूट? केंद्राच्या अध्यादेशाविरोधात Arvind Kejriwal आणि Sharad Pawar एकत्र

25 May 2023, 18:57 वाजता

वाळू माफियांवर कारवाईदरम्यान तलाठी बुडाला

 

Parbhani Talathi Drown : वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय.. परभणीच्या जिंतुर तालुक्यातील दिग्रस इथली ही घटना आहे. सुभाष होळ असं मृत तलाठ्याचं नाव आहे.. परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरु आहे, इथेवाळू माफियांची दादागिरी चालते.. हिंगोलीच्या हुडी लिंबाळा शिवारात वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी तलाठी होळ दाखल झाले. वाळू माफियांना पकडण्यासठी पाण्यातून पलीकडे पोहत जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला.. तेव्हा त्यांना दम लागला आणि ते बुडाले असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं..

बातमी पाहा - परभणीः वाळू माफियांना पकडण्यासाठी नदीत उतरले, पोहताना दम लागला, तलाठी बुडाला

25 May 2023, 18:37 वाजता

पक्षानं आदेश दिल्यास लोकसभा लढवणार - केसरकर

 

Deepak Kesarkar On Vinayak Raut : पक्षाने लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिले तर विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पराभवाची चव चाखावी लागेल असं वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय. पाहूयात दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले आहेत. 

25 May 2023, 17:11 वाजता

मुंबईत झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर

 

Mumbai Slum Home News : मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. झोपडीच्या बदल्यात झोपडीधारकांना आता घरं मिळणार आहेत. अतिशय नाममात्र किमतीत ही घरं मिळणार आहेत. गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतलाय. १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या काळातील झोपडीधारकांसाठी हा निर्णय लागू असेल. झोपडीच्या बदल्यात अवघ्या २ लाख ५० हजार रुपयांत झोपडीधारकांना घर मिळणार आहे. सविस्तर बातमीसाठी इथं क्लिक करा

बातमी पाहा - मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांना फक्त अडीच लाखात घर, सरकारने घेतला मोठा निर्णय

25 May 2023, 14:53 वाजता

राष्ट्रवादी राजकीयदृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष- प्रकाश आंबेडकर

 

Prakash Ambedkar on NCP : राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष असल्याचं मोठं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलंय. तर उद्योगमंत्री उदय सामंतांनीही आंबेडकरांच्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

बातमी पाहा- तर राष्ट्रवादी भाजप युती होईल! Prakash Ambedkar यांचे सर्वात मोठं विधान

25 May 2023, 14:33 वाजता

नवीन संसद उदघाटनाचा वाद सुप्रीम कोर्टात

 

New Parliament House : नवीन संसद उदघाटनाचा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचलाय. राष्ट्रपतींनीच संसदेचं उदघाटन करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलीय. वकील सी.आर.जयासुकीन यांनी याचिका केली असून, राष्ट्रपतींनी उदघाटन करण्याचे निर्देश लोकसभा सचिवालयाने द्यावेत अशी मागणी केलीय...राष्ट्रपतींना संसद बोलवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे उदघाटनाचा अधिकारही राष्ट्रपतींचाच असल्याचं याचिकेत म्हटलंय.

25 May 2023, 14:00 वाजता

Eknath Shinde Live | Marathi News LIVE : '75 हजार लोकांना नोकऱ्या दिल्या', 'सर्टिफिकेट दिल्यानंतर लगेच काम दिलं', 'मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड रस्ता बनवणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.