Marathi News LIVE Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा

Marathi News LIVE Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

25 Oct 2023, 20:34 वाजता

कृषी विभागाकडून दुष्काळाचा अहवाल सादर

 

Maharashtra Farmers : राज्यातील शेतकऱ्यांसंदर्भात मोठी बातमी. कृषी विभागाकडून ४२ दुष्काळी तालुक्यांचा अहवाल शासनाला सादर. आज कृषी विभागाची व्हीसी द्वारे झाली बैठकं. 2 दिवसात राज्य सरकार दुष्काळ संदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता. शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत.  31 तारखेपर्यंत राज्य सरकार निर्णय घेणार.

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

25 Oct 2023, 20:07 वाजता

शिंदे-फडणवीस दिल्लीला गेल्याची कल्पना नाही- अजित पवार

 

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली दौ-याबाबत अजब विधान केलंय. शिंदे-फडणवीस दिल्लीला गेल्याची कल्पना नसल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. ते दोघेही त्यांच्या कामासाठी दिल्लीला गेले असतील अशी पुस्तीही अजित पवारांनी जोडलीय. शिंदे-फडणवीस दिल्ली दौ-यावर असताना अजित पवार मात्र मंत्रालयात होते. 

25 Oct 2023, 19:41 वाजता

Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही','अन्न, पाणी आणि उपचारही घेणार नाही','शिंदे-फडणवीसांनी दिल्लीतून आरक्षण आणावं','गोड गोड बोलून किती दिवस फसवणार','मोदींनी निर्णय घेतला तर 2 तासांत आरक्षण','50 टक्क्यांवर आरक्षण द्या ही मागणी नाही','सरकार आरक्षण कसं होत नाही हे बघूच', मनोज जरांगे यांचं वक्तव्य.

25 Oct 2023, 19:31 वाजता

Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'दिल्लीतून आरक्षण घेऊनच या' मनोज जरांगेंचं शिंदे-फडणवीसांना आवाहन.'शासन निर्णय घेऊन ओबीसीतून आरक्षण द्या','आमचा राज्यभर आंदोलन लढा सुरूच राहिल','पंतप्रधानांना गोर-गरिबांच्या वेदनेची जाणीव','मोदींनी निर्णय घेतला तर 2 तासांत आरक्षण','आरक्षणासाठी मराठे एकजूट होऊन लढणार', मनोज जरांगे यांचं वक्तव्य.

25 Oct 2023, 19:13 वाजता

सलमान फाळकेचे आव्हाडांसोबत फोटो- मनिषा कायंदे

 

Manisha Kayande on Jitendra Awhad : ड्रग्जप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदेंनी जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंब्र्यातील ड्रग्जमाफिया सलमान फळकेसोबतचा फोटो दाखवत त्यांनी आव्हाडांवर निशाणा साधलाय. सलमान फळकेसोबत फोटो कसा याचा खुलासा आव्हाडांनी करावा अशी मागणी कायंदेंनी केलीय. ललित पाटील प्रकरणात दादा भुसे आणि शंभूराज देसाईंवर आरोप करणा-यांनी आता उत्तर द्यावं असं मनिषा कायंदेंनी म्हंटलंय. तर आपल्यासोबत फोटो काढणा-यांचं आपण कॅरॅक्टर सर्टिफिकेट तपासत नाहीत असा पलटवार आव्हाडांनी केलाय. 

25 Oct 2023, 18:18 वाजता

राज्यातील 3 हजार गावांमध्ये नेत्यांना बंदी 

 

Maratha Reservation : राज्यातल्या 3 हजार गावांमध्ये नेत्यांना बंदी घातलीये. मराठवाड्यात गावबंदीचं लोण जोमानं पसरलं. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आलाय. काही गावांत ग्रामपंचायतीचं अर्ज न भरण्याचे प्रकार सुरू.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

25 Oct 2023, 17:10 वाजता

संभाजीनगरमध्ये 96 गावांत नेत्यांना बंदी

 

Chhatrapati Sambhaji Nagar Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीची धग आता गावागावात पोहोचलीय... मराठा समाजाने आता राजकीय नेत्यांनी गावबंदी तर केलीच आहे, मात्र मतदानावरही बहिष्कार घातलाय. छत्रपती संभाजीनगरच्या 96 गावांमध्ये बहिष्कार घालण्यात आलाय. फुलंब्री शहरासह गणोरी व आळंद या तीन गावांत साखळी उपोषण केलं जाणार आहे.. उपोषण करुन मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला जाणार आहे.. त्याचसोबत आरक्षणाला विरोध करणा-या तसंच सरकारमधल्या मंत्र्यांचे फोटो असलेले बॅनर्स आणि पुतळे जाळूनही मराठा समाजाने निषेध केलाय. 

25 Oct 2023, 16:19 वाजता

आमदार अपत्राबाबत उद्या पुन्हा सुनावणी 

 

MLA Disqualification Case : आमदार अपत्राबाबत उद्या पुन्हा सुनावणी होणार. उद्या संध्याकाळी 4 वाजता प्रत्यक्ष सुनावणी होणार. 34 याचिका 6 गटात एकत्र केल्यावर उद्या सुनावणी होणार. मूळ याचिकांच्या मुद्द्यावर सुनावणी घेतली जाणार.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

25 Oct 2023, 16:15 वाजता

पंतप्रधान मोदी उद्या शिर्डी दौऱ्यावर

 

PM Modi to visit Shirdi Tomorrow : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शिर्डी दौ-यावर येणार आहेत. साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या समाप्तीच्या दिवशी पंतप्रधान मोदी साईंच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. पंतप्रधान मोदी साई संस्थानच्या दर्शन रांगेच्या प्रकल्पासह विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. 

25 Oct 2023, 15:43 वाजता

मराठा आरक्षणाच्या हालचालींना वेग?

 

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणासंदर्भातल्या घडामोडी वाढलेल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौ-यावर गेलेत. मराठा आरक्षणा बाबत हा महत्वाचा दौरा असल्याची चर्चा सुरू झालीय. मराठा आरक्षणाबाबत दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे, सूत्रांनी ही माहिती दिलीय. अमित शाहांबरोबर चर्चा होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे