Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

26 Oct 2023, 22:42 वाजता

आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी  2 नोव्हेंबरला 

 

MLA  Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणाची पुढील सुनावणी आता येत्या २ नोव्हेंबरला होणाराय... विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढं आज तब्बल साडेतीन तास सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार नव्याने ठोस पुरावे सादर करण्यासाठी 14 दिवसांची मुदत द्या अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केलीय. दरम्यान, उदय सामंत यांच्या परस्परविरोधी भूमिकेवरून यावेळी जोरदार वाद झाला. ठाकरे गटाच्या याचिकेवर आधी सामंतांची सही होती. नंतर सामंत शिंदे गटात आले. स्वतःचीच सही असलेल्या याचिकेवर ते कसा काय आक्षेप घेऊ शकतात, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलानं केला. निर्णय घेताना पार्टी कुणाची आहे हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही, असंही ठाकरे गटाच्या वकिलांनी सांगितलं. तेव्हा मी कुणाचे ऐकायचे आहे …सुप्रीम कोर्टाचे ऐकायचे की स्वतःच्या अधिकारात निर्णय घ्यायचा, असा सवाल विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी केला. तर सुप्रीम कोर्टानं लक्ष्मणरेखा आखून दिलीय. त्यातच तुम्हाला निर्णय द्यायचाय, असं ठाकरे गटाच्या वकिलांनी सांगितलं.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

26 Oct 2023, 19:15 वाजता

पवार-ठाकरे सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात

 

Maharashtra Politics :   शरद  पवार- उद्धव ठाकरे सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात येणार. रायगड जिल्हा बँकेंच्या कार्यक्रमात एकत्र असणार. उद्या रायगडमधील कार्यक्रमात पवार-ठाकरे एकत्र येणार. सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात पवार-ठाकरे. 

26 Oct 2023, 18:28 वाजता

कामगार कल्याण मंडाळातील योजना बंद

 

Zee 24 Taas Impact : आता पाहूयात झी २४ तास इन्व्हेस्टीगेशनला मिळालेल्या मोठ्या यशाची बातमी....इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळात माध्यान्ह भोजनाच्या नावाखाली सुरू असलेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा झी २४ तास इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश झाला होता. बोगस लाभार्थ्यांच्या नावानं दोन वर्षात २५०० कोटी रुपयांची बिल काढून सरकारला चुना लावल्याचं झी २४ तासनं शोधून काढलं होतं. त्यामुळे सरकारनं आता ही माध्यान्ह भोजनाची योजनाच बंद करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. भ्रष्टाचाराचं कुरण ठरलेली ही योजना १ नोव्हेंबर २०२३ पासून बंद करण्यात येणार आहे. 23 ऑक्टोबरला कामगार विभागाने पत्राद्वारे तसे निर्देश दिले आहेत.झी २४ तासनं इन्व्हेस्टीगेशन करून या घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यामुळे बांधकाम कामगारांच्या नावानं कोट्यवधींच्या लुटीला चाप बसलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

26 Oct 2023, 17:53 वाजता

माथाडी कामगारांचा मनोज​ जरांगेंना पाठिंबा

 

Mathadi Kamgar on Manoj Jarange​ : मराठा आरक्षण आंदोलनाला माथाडी कामगारांनी पाठिंबा दिलाय... मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्याचा निर्णय माथाडी कामगारांच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.. त्यासाठी उद्या नवी मुंबई एपीएमसीमध्ये एकदिवसीय लाक्षणिक बंद पाळण्यात येणाराय.. एपीएमसीच्या पाचही बाजारपेठा उद्या बंद असतील... माथाडी नेते शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

26 Oct 2023, 17:15 वाजता

दिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

 

Maharashtra Politics : महायुतीच्या नेत्यांची दिवाळी गोड होणार आहे. कारण दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. तसंच लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी आग्रही आहे. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला 7, शिवसेनेला 5 आणि राष्ट्रवादीला 3 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची अमित शाहा आणि राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा झाली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

26 Oct 2023, 16:54 वाजता

PM Narendra Modi  Live | Marathi News LIVE Today : 'आजपर्यंत शेतकऱ्यांवर केवळ राजकारण',' माजी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?'पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना सवाल

 

26 Oct 2023, 16:41 वाजता

PM Narendra Modi  Live | Marathi News LIVE Today : '2014 आधी भ्रष्टाचाराचे आकडे दिसायचे','महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 12 हजार रुपये सन्मान निधी','आधी शेतकऱ्यांची दखल कुणीही घेत नव्हतं','शेतकऱ्यांचं राजकारण करणाऱ्यांनी पाणीही दिलं नाही','आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात 26 हजार कोटी रुपये दिले',.पाणी हा परमात्म्याचा प्रसाद आहे','नल से जल योजनेसाठी 2 लाख कोटी खर्च','एक थेंबही पाणी वाया घालवू नका', पंतप्रधान मोदी यांचं आवाहन

 

26 Oct 2023, 16:36 वाजता

PM Narendra Modi  Live | Marathi News LIVE Today : 'गरीब कल्याणासाठी सरकारचे बजेट वाढतेय','निळवंडे धरणाचं कामही पूर्ण','गरीबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार','साईंच्या आशीर्वादामुळे 7500 हजार कोटींची कामं','राज्यात 1 कोटी 10 लाख आयुष्यमान कार्ड','पीएम विश्वकर्मा योजना केंद्रानं सुरू केलीय',.'13 हजार कोटी रुपये योजनेसाठी खर्च,'आता विकास कामांवरील खर्चाचे आकडे दिसतात', पंतप्रधान मोदी यांची माहिती.

 

26 Oct 2023, 16:28 वाजता

PM Narendra Modi  Live | Marathi News LIVE Today : 'शिर्डी पावनभूमीला कोटी कोटी नमन','साईंच्या आशीर्वादानं 7500 कोटी रुपयांची कामं','विकासकामांमुळे साईभक्तांना लाभ मिळणार','निळवंडे धरणाचे कामही पूर्ण झालं','सातारकर महाराजांचं काम पिढ्यांसाठी प्रेरणादायी', स्व. बाबामहाराज सातारकरांना पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली.

 

26 Oct 2023, 16:11 वाजता

Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today : 'विकास करण्यासाठी गतीमान सरकारची गरज','मोदींच्या हाती विकासाचा अजेंडा','बंद पडलेल्या प्रकल्पांना कामांना चालना दिली','दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी निधी द्या','मोदींच्या हाताला यशाला परीस आहे','कुणीही गरीब उपचारांवाचून राहणार नाही', 'बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं','सरकारी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सेवा देणार','पोटदुखी असणाऱ्यांसाठी बाळासाहेब दवाखाना', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला.