28 Dec 2023, 19:33 वाजता
वडगाव शेरीत पोलीस कर्मचाऱ्यासमोरच कोयता गँगचा धुडगूस
Pune Koyta Gang : विद्येचं माहेरघर, सुसंस्कृत शहर अशी बिरूदावली मिरवणाऱ्य़ा पुण्यातील पोलीस नेमकं करतात तरी काय? असा सवाल उपस्थित होतोय. यामागचं कारण आहे पुण्यातील कोयता गँग...ओठांवर मिसरूड न फुटलेली पोरं पुण्यात कोयता घेऊन फिरतायेत आणि पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेतायेत असंच चित्र पुण्यात पाहायला मिळतंय. पुण्यातल्या वडगाव शेरीत पुन्हा एकदा या कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली. महत्त्वाचं म्हणजे घटनास्थळी पोलीस कर्मचारी हजर असतानाच कोयता गँगनं धुडगूस घातला. या घटनेनं पुण्यातील पोलिसांची मान शरमेनं खाली झुकलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Dec 2023, 18:31 वाजता
आमचं सरकार आल्यावर जातगणना करणार, राहुल गांधींची घोषणा
Rahul Gandhi Live | Nagpur Congress Rally : आमचं सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करणार, अशी घोषणा राहुल गांधींनी केलीय. महाराष्ट्रातले लोक बब्बर शेर आहेत, आपण मिळून देशात आणि राज्यात आपलं सरकार आणू, असं राहुल गांधींनी म्हटलंय. नागपूरमध्ये काँग्रेसची हैं तय्यार हम सभा झाली. या सभेत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गेंनी मार्गदर्शन केलं. द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडण्यासाठी आपण आल्याचं राहुल गांधींनी म्हटलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Dec 2023, 18:14 वाजता
भाजपात गुलामी सुरू, वरच्यांनी सांगितलेलं निमूट ऐकावं लागतं- राहुल गांधी
Rahul Gandhi Live | Nagpur Congress Rally : नागपूरच्या महारॅलीत राहुल गांधींनी सांगितला भाजप खासदाराचा किस्सा... वरच्यांनी सांगितलं ते निमूट ऐकावं लागतं..भाजप सहन होत नाही,भाजप खासदारानं सांगितलं असल्याचं राहुल गांधींचं विधान.
पटोलेंचा प्रश्न मोदींना आवडला नाही.. प्रश्न विजारला म्हणून पटोलेंना आऊट केलं.. राहुल गांधी यांचं वक्तव्य. स्वातंत्रलढा जितका इंग्रजांविरोधात, तितकाच देशातील राजे महराजांविरोधातही... भाजपात गुलामी सुरू, वरून सांगितलेलं निमूट ऐकावं लागतं.. काँग्रेसमध्ये कार्यकर्त्याला बोलायचा अधिकार.. कार्यकर्ते मलाही प्रश्न विचारतात असं म्हणत राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Dec 2023, 16:17 वाजता
कतारमध्ये 8 भारतीयांची फाशी रद्द, भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीला यश
Diplomatic Success of Indian Govt. : कतारमध्ये 8 भारतीयांना ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आलीय... भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीचं हे यश मानलं जातंय... या 8 भारतीयांना सुनावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा कमी करण्याचा निर्णय कतारमधील कोर्टानं घेतलाय.. परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली... ज्यांना मृत्यूदंडाची सजा झाली होती, ते सगळे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी-कर्मचारी आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Dec 2023, 14:42 वाजता
ST बँक व्यवस्थापकीय संचालकांची हकालपट्टी
ST Bank Director Suspened : एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आलीय...संचालकपदासाठी निकष पूर्ण करू न शकल्याने सहकार खात्याकडून ही कारवाई करण्यात आलीय...सात दिवसात त्यांना पदावरून दूर करून दुसरे व्यवस्थापकीय संचालक निवडण्याची प्रक्रिया करावी असे आदेश देण्यात आलेयत...सौरव पाटील हे गुणरत्न सदावर्ते यांचे मेहुणे आहेत...एसटी बँकमध्ये गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनल निवडून आल्यापासून एसटी बँक वादात सापडलीय...त्यामुळे आता सहकार आयुक्त कार्यालयाने एसटी बँकेत पत्र पाठवून कारवाईचे आदेश दिलेयत...यामुळे सदावर्तेंना आणखी एक धक्का बसलाय...
बातमीचे व्हिडीओ पाहा -
28 Dec 2023, 13:45 वाजता
राममंदिर लोकार्पण भाजपचा इव्हेन्ट - संजय राऊत
Sanjay Raut Vs Nitesh Rane : राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची शक्यता आहे...संजय राऊतांनीच याबाबत संकेत दिलेत..तर प्रभू रामचंद्रांना किडनॅप केल्याचा आरोप राऊतांनी केलाय...त्याला नितेश राणेंनी उत्तर देत आमच्या देवाला कोणी किडनॅप करू शकत नाही की वाकड्या नजरेनं पाहू शकत नाही असं म्हटलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Dec 2023, 13:18 वाजता
राम मंदिर सोहळ्याचं मुंबईत 350 VVIP यांना निमंत्रण
Ram Mandir Inauguration List : 22 जानेवारीला अयोध्येच्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुंबईतील जवळपास साडेतीनशे व्हीव्हीआयपींना निमंत्रण पाठवण्यात आलंय...या सोहळ्यासाठी मुंबईतून निमंत्रित असलेल्या व्हीव्हीआयपीजची यादी तयार झालीय...उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनाही या सोहळ्याचे निमंत्रण पाठवले असून आज किंवा उद्या निमंत्रण मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...यासोबत मुंबईतील संत महंत, राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख अध्यक्ष, खेळाडू, चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार, मोठे उद्योगपती काही महत्त्वाचे सेलिब्रिटीज यांना निमंत्रण दिले जाणार आहे...श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या या नावाने सर्वांना निमंत्रण पाठवले जाणार आहे...यासाठी प्रचारक म्हणून जबाबदाऱ्यांचे वाटप सुद्धा करण्यात आलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Dec 2023, 12:51 वाजता
10 तारखेनंतर राज्यात मुख्यमंत्री बदलणार?
Vijay Wadettiwar : 10 तारखेनंतर नवा नवरदेव राज्यात दिसेल...असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय...अनेक जण बाशिंग बांधून, कपडे शिवून बसलेयत...बच्चू कडूंना काहीतरी पुढं होईल असे वाटत असावं म्हणून ते शिंदे आहेत तो पर्यंत सोबत आहे असं म्हणत असावेत असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय...यामुळे 10 तारखेनंतर मुख्यमंत्री बदलणार का...? या चर्चांना उधाण आलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Dec 2023, 12:39 वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 12 जानेवारीला नाशिक दौरा
Prime Minister Narendra Modi Nashik Tour : अयोद्धेतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौ-यावर येणारेत. 12 जानेवारीला पंतप्रधान नाशिकला येतायत. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करतील. या दौ-यातच पंतप्रधान राज्यात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळही फोडणार असल्याची माहिती मिळतेय. भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडणुका लढवल्या जातायत. त्यासाठी राज्यातही आतापासूनच धार्मिक वातावरण निर्मिती केली जातेय. त्यामुळे राज्यात रामाच्या भूमीतूनच भाजप प्रचाराचा नारळ फोडण्याचं नियोजन करंतय. आणि त्यासाठीच नाशिकची निवड करण्यात आल्याचं समजतंय. पंतप्रधानांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क झालीय. या कार्यक्रमाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांवर देण्यात आलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Dec 2023, 12:35 वाजता
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी अडचणीत
Priyanka Gandhi : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींच्या अडचणीत वाढ होणाराय...प्रियांका गांधी यांचं नाव ईडीच्या आरोपपत्रात दाखल करण्यात आलंय...हरियाणातील फरीदाबादमधील जमीन खरेदी-विक्री प्रकरणी ईडीने आरोपत्रात नाव लिहिलंय...2006 सालातील हे प्रकरण आहे...दिल्लीस्थित रिअल इस्टेट एजंट एचएल पाहवा यांच्याकडून हरियाणातील फरिदाबाद येथे पाच एकर शेतजमीन खरेदी केली होती...आणि तीच जमीन फेब्रुवारी 2010 साली विकली होती...त्याप्रकरणी ईडी तपास सुरू असून, प्रियांका गांधींचं नाव चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -