Ayodhya Nimantran : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Ayodhya Nimantran : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण

29 Dec 2023, 23:27 वाजता

उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवारांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

 

Ayodhya Nimantran : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिर आयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आलंय. सोहळ्यासाठी निमंत्रितांच्या मुंबईतील व्हीव्हीआयपी यादीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यासोबतच विश्व हिंदू परिषदेकडून अनेकांना निवासस्थानी जाऊन तसंच कुरिअरद्वारे निमंत्रण पत्रिका दिली जात आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आरपीआय पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांना कुरिअरद्वारे निमंत्रण पाठवल्याची माहिती आहे.. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या या नावाने निमंत्रण पाठवण्यात आलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

29 Dec 2023, 22:08 वाजता

मुख्यमंत्री शिंदे गावागावांत राम मंदिराचा सोहळा लाईव्ह दाखवणार

 

CM Shinde's Unique Initiative : अयोध्येतला राममंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणाराय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्यावतीनं या निमित्तानं अनोखा उपक्रम हाती घेण्यात आलाय. महाराष्ट्रातल्या गावागावांत राम मंदिराचा सोहळा लाईव्ह दाखवला जाणाराय. गावाच्या मंदिराबाहेर स्क्रीन लावून सोहळा लाईव्ह दाखवला जाणाराय... राममंदिराच्या निमित्तानं महायुतीचा गावागावांत पोहचण्याचा प्रयत्न आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

29 Dec 2023, 17:43 वाजता

वंदे भारत एक्स्प्रेस उद्घाटन पत्रिकेत खासदार जलील यांचं नाव नाही

 

MIM Activists Aggressive : छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे कार्यकर्ते आक्रमक झालेत.. वंदे भारत एक्स्प्रेस उद्घाटन पत्रिकेत खासदार इम्तियाज जलील यांचं नाव नसल्यानं एमआयएम आक्रमक झालीय. उद्य़ा जालना-मुंबई वंदे भारत ट्रेनचं पंतप्रधान मोदी उद्घाटन करणार आहेत. मात्र कार्यक्रम पत्रिकेत जलील यांचं नाव नसल्यानं एमआयएमचे कार्यकर्ते आक्रमक झालेत.. छत्रपती संभाजीनगर स्टेशनवर रेल्वे अधिका-यांना एमआयएम कार्यकर्त्यांनी जाब विचारलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

29 Dec 2023, 16:29 वाजता

दुष्काळग्रस्त भागात पीक कर्ज वसुलीला स्थगिती

 

Big Relief for Farmers : दुष्काळग्रस्त भागातील पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. राज्य सरकारच्यावतीनं दुष्काळग्रस्त भागात पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आलीय. दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांमध्ये तसंच इतर तालुक्यांमधील 1021 महसुली मंडळांमध्ये पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आलीय. राज्य सरकारकडून अधिसूचना जारी.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

29 Dec 2023, 16:08 वाजता

कात्रज बोगद्यात 5 गाड्या एकमेकांना धडकल्या, महिला जखमी 

 

Katraj Accident : कात्रज बोगद्यात पाच गाड्या एकमेकांना धडकल्यानं झालेल्या अपघातात एक महिला जखमी झालीय... बोगद्यातून जाताना एका वाहनचालकानं अचानक ब्रेक दाबल्यानं पाठीमागून भरधाव येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. या सर्व गाड्या साताऱ्याहून मुंबईच्या दिशेनं निघाल्या होत्या... अपघातग्रस्त गाड्या बोगद्यातून बाजूला काढण्याचं काम सुरू आहे. वाहतूक पोलीस अपघातस्थळी दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

29 Dec 2023, 14:43 वाजता

'अयोध्येतील कार्यक्रम म्हणजे भाजपचा इव्हेंट',संजय राऊतांचा टोला 

 

Sanjay Raut on Nitesh Rane : राम मंदिराच्या उदघाटन सोहळ्यावरून ठाकरे विरूद्ध भाजप असा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. अयोध्येतील कार्यक्रम म्हणजे भाजपचा इव्हेंट आहे. त्यात राजकारण करू नका, रामाला पुन्हा वनवासात पाठवू नका असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. तर राऊतांची भूमिका हिंदूद्वेष्टी असल्याचं नितेश राणेंनी म्हंटलंय. 

29 Dec 2023, 14:00 वाजता

शिर्डीच्या साई मंदिरात मास्क सक्ती

 

Shirdi Sai Baba Temple  Mask Compulsory : तुम्ही जर शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी. तुम्हाला साईंच्या मंदिरात मास्क घालून जाणं बंधनकारक असेल. कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान सतर्क झालंय. साईमंदिर परिसरात नो मास्क नो दर्शनचे फलक पाहायला मिळतायेत. भाविकांनी दर्शनाला येताना मास्क घालूनच मंदिरात यावं असं आवाहन करण्यात आलंय. 
 

29 Dec 2023, 13:37 वाजता

'शिंदे गटाला भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल', संजय राऊतांचा दावा

 

Sanjay Raut on Shinde Group : आमदार अपात्र निकालाआधीच राऊतांनी शिंदे गटाचा नौटंकीचा सिनेमा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पडेल असा दावा केलाय...शिंदे गटाला कमळाबाईच्या पदराखाली जावंच लागेल...त्यांना भाजपमध्येच विलीन व्हावं लागेल असं राऊतांनी म्हटलंय...तर भाजपची चाल ही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना लवकरच कळेल असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

29 Dec 2023, 13:02 वाजता

नितीश कुमार जेडीयूचे नवे अध्यक्ष

 

Nitish Kumar : जनता दल युनायटेड या पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह यांनी राजीनामा दिलाय. नितीश कुमार जेडीयूचे नवे अध्यक्ष झाले आहे. 

29 Dec 2023, 12:42 वाजता

इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाचा चेहरा राहुल गांधी?

 

Sanjay Raut on Rahul Gandhi : इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाचा चेहरा राहुल गांधी असण्याची शक्यता आहे...संजय राऊतांनी यासंदर्भात सूचक वक्तव्य केलंय...पंतप्रधान होण्यासाठी राहुल गांधींमध्ये सर्व गुण असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय...त्याचबरोबर राहुल गांधी लोकप्रिय नेते असून त्यांचा संघर्ष सुरू असल्याचंही ते म्हणालेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-