Maratha Reservation Sub-committee Meeting : मराठा आरक्षण उपसमितीची उद्या बैठक

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Oct 29, 2023, 23:23 PM IST
Maratha Reservation Sub-committee Meeting : मराठा आरक्षण उपसमितीची उद्या बैठक

29 Oct 2023, 23:19 वाजता

मराठा आरक्षणासंदर्भात उद्या महत्त्वाची घोषणा?

 

Maratha Reservation Sub-committee Meeting : मराठा आरक्षण उपसमितीची उद्या बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर उद्या सकाळी 10 वा. होणार बैठक. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बैठक... न्या. शिंदे समितीही हजर राहणार... आरक्षणाबद्दल मोठी घोषणा होण्याची शक्यता.

 

29 Oct 2023, 20:22 वाजता

लोकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जरांगेंनी एक घोट पाणी घेतलं

 

Jarange Drank Water : आमरण उपोषणामुळं जरांगे पाटलांची तब्येत खालावली. मात्र आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार. मराठा बांधवांच्या विनंतीवरून जरांगे प्यायले पाणी. लोकांच्या आग्रहाखातर जरांगे पाटलांनी एक घोट पाणी घेतलं.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

29 Oct 2023, 20:01 वाजता

आरक्षणासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन घ्यावं, आमदारांनी सरकारवर दबाव आणावा- जरांगे

 

Jarange on MLA : मराठा आरक्षणासाठी सरकारनं एक दिवसाचं विशेष अधिवेशन घ्यावं, त्यासाठी सगळ्या आमदारांनी सरकारवर दबाव आणावा, असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय. राजीनामा देण्यापेक्षा एकत्र या, असं जरांगेंनी म्हटलंय. 'जिवाची बाजी लावावीच लागेल.. त्याशिवाय न्याय मिळणार नाही' मनोज जरांगे पाटील यांचं विधान. भावनिक होऊन चालणार नाही- जरांगे पाटील.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

29 Oct 2023, 18:00 वाजता

शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटलांचा राजीनामा

 

MP Hemant Patil Resign : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिलाय. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे ते पहिलेच खासदार आहेत. लोकसभा अध्यक्षांच्या नावानं त्यांनी राजीनाम्यांचं पत्र दिलंय. हेमंत पाटील हे हिंगोलीचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला माझा पाठिंबा असून, आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

29 Oct 2023, 15:02 वाजता

Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'समाज कल्याणासाठी मी माघार घेणार नाही',';आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही','मराठ्यांनी आंदोलन सुरूच ठेवावं','मला काही झालं तरी मराठा आंदोलन सुरू ठेवतील','क्षत्रियानं रडायचं नसतं लढायचं असतं','शांततेत युद्ध सुरू ठेवा, उद्रेक नको', मनोज जरांगे यांचा मराठा समजाला आवाहन.

29 Oct 2023, 14:48 वाजता

जालन्यात तहसीलदारांची गाडी फोडली

 

Jalna Maratha Reservation :  जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलीय. रामनगर परीसरात ही दंगडफेक झाली.14 ते 15 मराठा आंदोलकांनी ही दगडफेक केलीय. बाजी उमरद या गावात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक टॉवरवर चढलेले असताना त्यांची समजूत काढण्यासाठी तहसीलदार छाया पवार या त्या गावात जात होत्या. त्यावेळी घोषणाबाजी करून ही दगडफेक करण्यात आली. या दंगडफेकित तहसीलदार पवार यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून काही प्रमाणात नुकसान झालंय. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

29 Oct 2023, 14:07 वाजता

नांदेडमध्ये मराठा समाजाकडून राजकीय पक्षांचे बोर्ड जेसीबीनं काढले

 

Nanded Maratha Reservation :  नांदेडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालाय. नांदेडमधल्या निळामध्ये सकल मराठा समाजाने गावात लावलेल्या सर्व पक्षांच्या पाट्या, फलक जेसीबीने उखडून टाकले. गावात मुख्य रस्त्यावर शिवसेना, भाजपा सह अन्य पक्षांचे लावण्यात आलेले बोर्ड संतप्त मराठा कार्यकर्त्यांनी काढून फेकले. पुढाऱ्यांना गावबंदी, राजकीय कार्यक्रमांवर बंदी केलेली असताना आता कायमस्वरूपी लावण्यात आलेले पक्षाचे बोर्डही काढून टाकले जात आहेत. 
 

29 Oct 2023, 13:34 वाजता

संजय राऊतांची दौंडमधील बाईक रॅली रद्द 

 

Sanjay Raut : मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राऊतांच्या दौ-यात बदल करण्यात आलाय...राऊतांची दौंडमधील बाईक रॅली रद्द करण्यात आलीय...संजय राऊतांविरोधात मराठा समाज आक्रमक झालाय...राऊतांच्या दौंडमधील दौ-याला मराठा समाजाने विरोध केला...यावेळी 'संजय राऊत चले जाव'च्या घोषणा देण्यात आल्या...

29 Oct 2023, 13:11 वाजता

केरळमध्ये 3 साखळी बॉम्ब स्फोट, एकाचा मृत्यू

 

Kerala Bomb Blasts : एर्नाकुलममध्ये एकामागोमाग एक झालेल्या तीन साखळी बॉम्बस्फोटांनी केरळ हादरलंय.. कलामासेरी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ज्यू समुदायाचे लोक सकाळी प्रार्थना करत होते, तेव्हा हे स्फोट झाले.. या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झालाय. तर 36 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत... पहिला स्फोट प्रार्थनास्थळाच्या मध्यभागी झाला.. तर त्यानंतर हॉलच्या दोन्ही बाजुंना स्फोट झाले.. या प्रार्थनास्थळी ज्यू नागरिक उपस्थित होते.. तसंच प्रार्थनास्थळाच्या आसपासही मोठ्या संख्येने ज्यू नागरिक राहत असल्याची माहिती मिळतेय.. दोन दिवसांआधी एर्नाकुलममध्येच हमासच्या समर्थनासाठी रॅली निघाली होती. तेव्हा प्रार्थनास्थळातले ज्यू नागरिक निशाण्यावर होते का या दिशेनं तपास सुरु झालाय.. आयबी तसंच एनआयएची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. घटनास्थळावरुन स्फोटक पदार्थ मिळाल्याची माहिती केरळच्या पोलीस महासंचालकांनी दिलीय.. 

29 Oct 2023, 12:41 वाजता

संजय राऊतांविरोधात मराठा समाज आक्रमक

 

Sanjay Raut : संजय राऊतांविरोधात मराठा समाज आक्रमक झालाय...राऊतांच्या दौंडमधील दौ-याला मराठा समाजाने विरोध केलाय...राऊत थांबलेल्या हॉटेल बाहेर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केलीय...'संजय राऊत चले जाव'च्या घोषणा देण्यात आल्यायत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-