Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीचं भवन पेटवलं

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Oct 30, 2023, 22:42 PM IST
Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीचं भवन पेटवलं

30 Oct 2023, 22:27 वाजता

 श्री क्षेत्र मांढरदेवी उद्या बंद 

 

Mandhardevi Close Tomorrow : - श्री क्षेत्र मांढरदेवी उद्या बंद ठेवण्यात येणार. मांढरदेवी गावातील संपूर्ण दिवस व्यवहार, बाजार, दुकाने उद्या बंद राहणार. तसेच यापुढे श्री क्षेत्र मांढरदेवी मध्ये राजकीय नेते , मंत्री याना प्रवेश बंद राहणार. मांढरदेवी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढारी ,नेते, मंत्री यांना मांढरदेवीचे दर्शन घेण्यास सक्त मनाई करण्यात आली. उद्या बंदी बाबतच पत्रही ग्रामस्थांनी जारी केले आहे.उद्या जाणाऱ्या भाविकांनी याची नोंद घ्यावी.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 Oct 2023, 21:33 वाजता

राज्यभरात 30 आगारात एसटी वाहतूक ठप्प

 

Maratha Reservation : मराठा आंदोलनाचा  एसटी वाहतुकीला फटका बसलाय. राज्यभरात 30 आगारांत एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीये. मराठा आंदोलनात 2 दिवसांत 13 बसेसची तोडफोड करण्यात आलीये. एसटी वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत.

30 Oct 2023, 20:58 वाजता

बीडमध्ये संचारबंदी लागू 

 

Beed Maratha Reservation : बीडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीय... आज दिवसभर बीडमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनांना हिंसक वळण लागलं... ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्यानं संचारबंदी लागू करण्याचा निर्णय बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी घेतलाय.. त्यानुसार बीड शहर तसेच प्रत्येक तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत आणि जिल्ह्यातील प्रमुख नॅशनल हायवे वर अनिश्चित काळासाठी संचारबंदी आदेश लागू असतील.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 Oct 2023, 20:28 वाजता

उद्या सातारा जिल्हा बंदची हाक

 

Satara Maratha Reservation : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या सातारा जिल्हा बंद ची हाक देण्यात आलीय... एकीकडं जरांगे पाटलांची प्रकृती खालावलीय... तर दुसरीकडं सरकारकडून अजून मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाहीय. साता-यात सोमवारी मराठा आंदोलकांनी विराट मोर्चा काढला होता. आता उद्या सातारा जिल्हा बंद पाळण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चानं केलंय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 Oct 2023, 19:56 वाजता

बीडमध्ये अग्निशमन दलाची गाडी जाळली

 

Beed Fire brigade Vehicle Torched : मराठा आरक्षणासाठी बीड पेटलंय. बीडमध्ये संतप्त आंदोलकांनी अग्निशमन दलाची गाडी जाळलीय. अग्निशमन दलाची गाडी जळून भस्मसात झालीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 Oct 2023, 19:05 वाजता

बीड नगर परिषदेवर दगडफेक

 

Beed Maratha Reservation : बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.संतप्त मराठा आंदोलकांनी बीड नगरपरिषद कार्यालयावर जोरदार दगडफेक केली.. नगरपरिषदेच्या इमारतीच्या काचा आंदोलकांनी दगडफेक करून फोडल्या... माजलगाव नगरपरिषदेला आग लावल्यानंतर बीड नगरपरिषदेवरही दगडफेक झाली... यामुळं बीड शहर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय... 

30 Oct 2023, 18:49 वाजता

भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड 

 

Prashant Bamb : भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलीय... संभाजीनगरच्या गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या आमदार बंब यांच्या कार्यालयात घुसले.. त्यांनी ऑफिसच्या काचा आणि भाजप नेत्यांच्या तसबिरींची तोडफोड केली... 

30 Oct 2023, 18:29 वाजता

बीडमधील संदीप क्षीरसागरांचं ऑफिस पेटवलं

 

Beed Maratha Reservation : बीडमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर  दगडफेक करण्यात आली आहे. संदीप क्षीरसागर यांच्या घराबाहेर असलेल्या कार्यालयाला आग लावली. संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

 

30 Oct 2023, 17:38 वाजता

बीडमध्ये मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीचं भवन पेटवलं

 

Beed Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आंदोलन चिघळलं. आंदोलकांनी राष्ट्रवादीचं भवन पेटवलंय. आगीत राष्ट्रवादी भवन जळून खाक झालंय.

 

30 Oct 2023, 17:02 वाजता

 छगन भुजबळांच्या घराची सुरक्षा वाढवली

 

Chhagan Bhujbal : संतप्त आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंकीचं घर पेटवल्यानंतर छगन भुजबळांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आलीय. त्यांच्या सिद्धगड निवासस्थानाला छावणीचं स्वरूप आलंय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगेंनी केलीय. तर ओबीसीतून आरक्षण देऊ नये असं छगन भुजबळांनी म्हंटलं होतं.

बातमीचा व्हिडीओ पाहा-