31 Oct 2023, 21:43 वाजता
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री, आमदारांना सूचना जारी
NCP : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री, आमदारांना सूचना जारी करण्यात आल्यात.. अनोळखी फोन विनाकारण उचलू नका अशा सूचना नेत्यांना देण्यात आल्यात.. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते फोनवरुन वाद घालत कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करतायत. त्यामुळे खबरदारी म्हणून अजित पवार गटानं या सूचना जारी केल्यात. बीडचे आमदार प्रकाश सोळंकी यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यामुळे मराठा आंदोलकांचा भडका उडाला, त्यांचं घर जाळण्यापर्यंत जनक्षोभ उसळला त्यामुळेच एनसीपी नेत्यांच्या बैठकीत यासंबंधी सूचना देण्यात आल्यात.. मराठा आंदोलनादरम्यान यापूर्वी अनेक नेत्यांच्या ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या होत्या..
31 Oct 2023, 20:40 वाजता
ठाण्यात मराठा आंदोलकांनी जितेंद्र आव्हाडांना रोखलं
Jitendra Awhad : ठाण्यात सुरू असणा-या सकल मराठा समाजाच्या आमरण उपोषणात जितेंद्र आव्हाडांना स्टेजवर येण्यास विरोध करण्यात आलाय. मराठा समाजाला पाठिंबा दर्शवण्याकरिता आमदार जितेंद्र आव्हाड इथं आले असताना मराठा बांधवांनी त्यांना मंचावर येण्यास विरोध केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड उपोषणोकर्त्यांची भेट घेऊन माघारी परतले.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
31 Oct 2023, 19:43 वाजता
मराठा आरक्षणावर उद्या सर्वपक्षीय बैठक
Maratha Reservation : मराठा आरक्षणावर उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली. सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार हजर राहणार. मनोज जरांगेंच्या उपोषणावर सर्वपक्षीय बैठक. उद्या सकाळी 10.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक.
31 Oct 2023, 19:09 वाजता
जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद
Jalna Internet Service Stop : संपूर्ण जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद झालीय.... संध्याकाळी नेमकी मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद सुरू असतानाच नेट बंद पडलं.. त्यामुळं उपोषणाला बसलेले जरांगे चांगलेच संतापले.. इंटरनेट सेवा तातडीनं सुरू करा, नाहीतर टॉवर घरी घेऊन जा, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
31 Oct 2023, 18:24 वाजता
Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'एका उपमुख्यमंत्र्यास काड्या करायची सवय','दांडकं घेऊन आलात तर मर्यादा सोडू','तुमच्यामुळे भाजप राज्यात संपायला आलंय','एक उपमुख्यमंत्री लय कलाकार','काड्या करायची गरज आहे', मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला.
31 Oct 2023, 18:16 वाजता
Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'आधी आंदोलन, तुमची संचारबंदी','धनगर, ओबीसी, ग्रामीण जनता आमच्या बाजूनं','धमक्या देणार असाल तर आम्हीही बघू','त्यांच्यासाठी आमची लेकरं उपाशी मारतंय का?','आमचा हक्क द्या, नाही तर जड जाईल','हक्काचं आरक्षण द्या, नाही तर आंदोलन','किती 307 गुन्हे दाखल करतायत पाहुया?', मनोज जरांगेंचा राज्य सरकारला सवाल.
31 Oct 2023, 18:08 वाजता
Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'सरकारला महाराष्ट्र शांत राहू द्याच नाही का?','पोलीस आंदोलकांना त्रास देतायत','हे प्रकार तातडीनं बंद करा','बीडमधील 10 लाख मराठे जमतील','आम्हाला त्रास दिला तर आम्ही गप्प राहणार नाही','सरकारनं आता शहाणं व्हावं', 'आंदोलकाला त्रास झाला, आम्ही पण त्रास देऊ', 'कुणाला त्रास दिला, मी कलेक्टरसमोर जाणार','बीडमध्ये जातीयवादी अधिकारी', मनोज जरांगे यांचं वक्तव्य.
31 Oct 2023, 18:03 वाजता
Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'सरकारचा एकही निर्णय मान्य नाही','सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं','उद्या आरक्षणावर ठोस निर्णय घ्या','अर्धवट आरक्षणाचा निर्णय मान्य नाही','सरकारला महाराष्ट्र शांत राहू द्याचा नाही का?','काही झालं तर सरकार जबाबदार','उद्यापासून पुन्हा पाणी बंद करणार''ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर पाणी बंद', मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा.
31 Oct 2023, 17:55 वाजता
सांगलीत कर्नाटक राज्याच्या एसटी बसवर दगडफेक
Sangli Maratha Reservation : सांगलीत मराठा आरक्षण मागणीसाठी जत जवळ कर्नाटक सीमेवर बसवर दगडफेक करण्यात आली. कर्नाटक राज्याच्या एसटी बसवर दगडफेक करण्यात आली . दगडफेकीत काही प्रवासी किरकोळ जखमी. जत-विजयपुर मार्गावर दुचाकीवर आलेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी करत दगडफेक.कर्नाटकच्या सातारा - विजयपूर बसवर करण्यात आली दगडफेक.
31 Oct 2023, 17:05 वाजता
राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
Drought Declared in the State : राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय... राज्यात यंदा सरासरीच्या 13.4 टक्के कमी पाऊस झाल्यानं खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्यासाठी तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे. दुष्काळी भागात सवलती देण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेणाराय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-