Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on APRIL 15 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Apr 15, 2025, 19:08 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

15 Apr 2025, 19:01 वाजता

अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टला धमकीला ई-मेल

 

Ayodhya Ram Mandir Threat : अयोध्येतील राम मंदिरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.. राम मंदिर ट्रस्टला धमकीचा ईमेल आलाय.. राम मंदिराची सुरक्षा वाढवली.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

15 Apr 2025, 18:09 वाजता

मुंबईत एकनाथ शिंदे, भूषण गगराणींकडून रस्ते कामांची पाहणी

 

Eknath Shinde on Road Works : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा मुंबईतील रस्ते कामांचा पाहणी दौरा......बॉम्बे हॉस्पिटलपासून हा पाहणी दौरा सुरु झाला.. मुंबईकरांना चांगले रस्ते मिळणार, भविष्यात रस्ते खोदण्याचं काम पडणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आश्वासन दिलंय.. मुंबईत 100 टक्के कॉंक्रिटीकरणाचे रस्ते होतील असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय.

15 Apr 2025, 17:42 वाजता

मुंबईत पाण्यासाठी शिवसेना UBT आक्रमक

 

Mumbai UBT Morcha : मुंबईत पाण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक.. शिवसेना UBTचा शिवसेना भवन परिसर ते वॉर्ड ऑफिसवर हंडा मोर्चा.. स्थानिक आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा.. पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची बाचाबाची.. पोलिसांकडून आंदोलक शिवसैनिकांची धरपकड.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

15 Apr 2025, 17:25 वाजता

राज्यात कॉंग्रेस कार्यकारिणीचं चित्र पालटणार

 

Congress Changes : महाराष्ट्र कॉग्रेस कार्यकारिणीचं चित्र लवकरच पालटणार.. गुरुवारी महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारिणी नियुक्त होणार.. तरुण आणि लोकांमधून निवडून येणाऱ्या व्यक्तींना प्रदेश कार्यकारिणीत प्राधान्य देणार.. काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीसाठी प्रभारींच्या उपस्थितीत बैठक.. 17 एप्रिलला टिळक भवनात होणार बैठक.. काँग्रेस कार्यकारिणीचं चित्र पालटणार.

15 Apr 2025, 16:01 वाजता

पुण्यातील उद्योजकाचा बिहारमध्ये खून

 

Pune Businessman Murder in Bihar : पुण्यातील उद्योजक लक्ष्मण शिंदे यांचा बिहारमध्ये खून झाल्याचं समोर आलंय.. व्यवसायानिमित्त लक्ष्मण शिंदे बिहार राज्यात गेले तिकडेच गुंडांनी त्यांचा खून केला.. पुण्यातील कोथरूड पोलिसांत ते हरवल्याची तक्रार दाखल होती.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

15 Apr 2025, 14:39 वाजता

कुस्ती पंच नितीश काबलिये 3 वर्षांसाठी निलंबित

 

Maharashtra Kusti Punch : आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांना तीन वर्षांसाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सहभागास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. अहिल्यानगर येथे झालेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये पै. पृथ्वीराज मोहोळ व पै. शिवराज राक्षे यांच्या कुस्तीस मुख्य पंच म्हणुन काबलिये काम करत होते. कुस्ती दरम्यान त्यांनी दिलेल्या चितपटीच्या निकालावरून प्रचंड गोंधळ झाला नितीश काबलिये यांनी वादग्रस्त निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत एक समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत काबलिये यांना दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे त्यांना आता तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने नितीश काबलिये यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

15 Apr 2025, 13:55 वाजता

जालन्यात अतिवृष्टी अनुदानात घोटाळा

 

Jalana : जालना जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान वाटपात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय.. बोगस शेतक-यांची नावं दाखवून त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आलीये.. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांकडून हा कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय.. अतिवृष्टी अनुदान वाटपात घोटाळा झाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिका-यांनी त्रिस्तरीय चौकशी समिती गठीत केली असून अंबड आणि घनसावंगी तालुक्यात चौकशी करण्यात येतंय.. लवकरच चौकशीचा अहवाल समोर येणार असल्याची माहिती आहे...

15 Apr 2025, 13:16 वाजता

भंडारा जिल्हात 45 उष्माघात कक्षाची उभारणी

 

Bhandara : भंडारा जिल्ह्यातील तापमान सध्या 42 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे....पुढील काही दिवसांत पारा 46 ते 48 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे... उष्माघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारे 45 उष्माघात कक्षांची उभारणी करण्यात आली आहे...या कक्षांमध्ये 33 प्राथमिक आरोग्य केंद्र, 7 ग्रामीण रुग्णालये, 2 उपजिल्हा रुग्णालये, 1 जिल्हा रुग्णालय आणि 2 नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

15 Apr 2025, 12:59 वाजता

बुलढाण्यात एसटी आणि टेम्पोची धडक, 4 मृत्यू, 15 जखमी

 

Buldhana Accident :  बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर भीषण अपघात झाला आहे.. विटा वाहून नेणारा मेटाडोर आणि मध्यप्रदेश परिवहन ची एसटी मध्ये समोरासमोर धडक झाली आहे.. झालेल्या या अपघातात विटा वाहून नेणाऱ्या मेटाडोर मधील तीन जण जागीच ठार झाले आहेत.. तर एसटी बसमधील एक जण ठार झाला  एसटीतील दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत.. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात तसेच खामगावा चे रुग्णालयात हलवण्यात आल आहे.. पोलीस आणि स्थानिकांच्या सहाय्याने मदत कार्य या ठिकाणी सुरू आहे..

15 Apr 2025, 12:09 वाजता

पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा कायम

 

Pooja Khedkar : वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळालाय...पुढील सुनावणीपर्यंत पूजा खेडकरला अटक करता येणार नाहीये...याप्रकरणी कोर्टाने 7 दिवसांची मुदत वाढवलीये....आता पूजा खेडकरप्रकरणी पुढील सुनावणी 21 एप्रिल रोजी होणार आहे....