27 Aug 2024, 20:21 वाजता
'शरद पवारांनी किती मंदिरं बांधली?',नारायण राणेंचा सवाल
Narayan Rane on Chhatrapati Shivaji maharaj statue : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेला नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलंय...शरद पवारांनी किती देवळं बांधली आणि राहुल गांधी यांचा धर्म कोणता हेच कळत नसल्याची टीका राणेंनी केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
27 Aug 2024, 17:45 वाजता
'छ. शिवरायांच्या पुतळ्यातही भाजपकडून भ्रष्टाचार', आदित्य ठाकरेंची टीका
Aditya Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय...याबाबत एक्स या सोशल मीडिया साईटवर आदित्य ठाकरेंनी एक पोस्ट केलीये....आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतही भाजप भ्रष्टाचार करेल असं वाटलं नव्हतं असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका केलीये...त्याचबरोबर इथेही त्यांचा एक कॉन्ट्रॅक्टर मित्र असून कामाचा दर्जा भयानक असल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय.
27 Aug 2024, 16:55 वाजता
मुंबईत दहीहंडीदरम्यान 41 गोविंदा जखमी
Dahi Handi 2024 : मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्साह पहायला मिळतोय...मात्र या उत्साहामध्ये अपघात होऊन आतापर्यंत 41 गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळतेय...सरकारी आणि खासगी रुग्णालयात जखमी गोविंदांना भरती करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळतेय...41 पैकी 8 गोविंदांना रुग्णालयात भर्ती करण्यात आलंय...26 जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आलंय...7 जणांना भर्ती करून उपचार करण्यात आले आणि त्यांना घरी सोडण्यात आलं...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
27 Aug 2024, 13:33 वाजता
पुतळा कोसळणं हा अपघात - केसरकर
Deepak Kesarkar : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा अपघात आहे. वाईटातून चांगलं घडायचं असेल, यासाठी हा अपघात झालाय, असा अजब तर्क मंत्री दीपक केसरकरांनी काढलाय.. त्यांच्या या अजब दाव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.. त्यांच्या या विधानामुळे शिव प्रेमींकडूनही संतप्त भावना उमटण्याची शक्यता आहे..
27 Aug 2024, 12:21 वाजता
पुण्यात महिलेची निर्घृण हत्या
Pune Crime : पुण्यात महिलेची निर्घृण हत्या करण्यात आलीय. हात-पाय कापून धड नदीत फेकल्याचा प्रकार समोर आलाय. एका अनोळखी महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आलेत. खराडी इथल्या नदीपात्रात महिलेचं धड आढळले. हत्या झालेल्या महिलेचं वय अंदाजे 18 ते 30 असल्याची माहिती आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल आलाय..
बातमी पाहा - पुण्यात तरुणीचं मुंडकं कापलं; मृतदेहाचे तुकडे करुन धड नदीपात्रात फेकलं; एकच खळबळ
27 Aug 2024, 11:17 वाजता
राहुल गांधींचा 5 सप्टेंबरला सांगली दौरा
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी 5 सप्टेंबरला सांगली दौ-यावर येणार आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णकृती पुतळयाचं लोकार्पण राहुल गांधींच्या हस्ते होणारेय, अशी माहिती आमदार विश्वजित कदमांनी दिलीय. काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथअण्णा रेड्डी यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी कडेगावमध्ये मोठी सभाही पार पडणारे असल्याचं विश्वजीत कदमांनी म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Aug 2024, 10:42 वाजता
Mazgaon Court : महिलेला पाहून डोळा मारणे विनयभंग ठरतो, असा निर्णय माझगाव दंडाधिकारी न्यायालयानं दिलाय. या प्रकरणात कोर्टानं भायखळा इथल्या एक 20 वर्षीय तरुणाला दोषी ठरवलं. आरोपीनं हात पकडून डोळा मारल्याचा आरोप तक्रारदार महिनेनं केला होता. याप्रकरणी कोर्टानं हा विनयभंगाचा गुन्हा असल्याचं म्हटलंय. कोर्टानं आरोपीला दोन हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Aug 2024, 10:22 वाजता
विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार?
Vidhansabha Election : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. काऱण पोलिस बदल्यांबाबतच्या सुनावणीदरम्यान राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी दिलेत... नोव्हेंबर 2024 साली विधानसभा निवडणूक होणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगानं दिली होती. त्यानुसार पोलिसांच्या बदल्या करण्याचे निर्देश आयोगान राज्य सरकारला दिले होते..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Aug 2024, 08:54 वाजता
2 वृद्धांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Solapur : सोलापुरातील बार्शीमध्ये 2 वृद्धांनी एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.. चॉकलेट, पैशाचं अमिष दाखवून या दोन्ही वृद्धांनी या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला... पीडितेच्या आईला हा सर्व प्रकार लक्षात येताच दोन्ही वृद्धांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Aug 2024, 08:38 वाजता
रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा - संजय राऊत
Sanjay Raut : मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर खासदार संजय राऊत आक्रमक झालेत. रवींद्र चव्हाणांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केलीय. श्रेय घेण्याच्या घाईमुळे हे घडल्याचा आहोप राऊतांनी 'एक्स' या सोशल मीडियाच्या हँडलवरून केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -