Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on AUGUST 29 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Aug 29, 2024, 22:14 PM IST
twitter
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

29 Aug 2024, 22:13 वाजता

काँग्रेस-NCPशी आयुष्यात जमलं नाही - तानाजी सावंत

 

Dharashiv Tanaji Sawant : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी अजब विधान केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यात जमलं नाही. आज जरी मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर येऊन उलट्या होतात, असं वादग्रस्त विधान तानाजी सावंत यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीया वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Aug 2024, 20:46 वाजता

मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल

 

Mumbai-Goa Express Way : मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाची पोलिसांकडून अंमलबजावणी करण्यात आली असून, संबंधित कंपनीतील कर्मचा-यांना आरोपी करण्यात आलंय. महामार्ग कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. रायगडच्या माणगाव पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंदवलाय. तर समन्वयक अभियंत्याला पोलिसांनी अटक केलीये. 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला होता. तेव्हा बेजबाबदार ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Aug 2024, 20:11 वाजता

पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

 

Palghar : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. मोदी उद्या पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन करणार आहेत. सुमारे 76 हजार कोटी रुपयांचा वाढवण बंदर प्रकल्प आहे. समुद्रात खोल पाण्यातील बंदरांपैकी वाढवण हे भारतातील सर्वात मोठं बंदर असणार आहे. यामुळे भारताचा सागरी संपर्क वाढणार असून, जागतिक व्यापार केंद्र म्हणून भारताची भूमिका अधिक सक्षम होणार आहे. वाढवण बंदर प्रकल्प भूमिपूजनासोबतच मोदी 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्य प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणीही करणार आहेत. तसंच ते मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024ला संबोधित करतील. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Aug 2024, 18:37 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागितली माफी

 

Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितलीये...विरोधकांनाही त्यांनी राजकारण न करण्याचं आवाहन यावेळी केलंय...त्याचबरोबर सर्व परिस्थितीसह वातावरणाचा अभ्यास करून लवकरातलवकर भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Aug 2024, 17:56 वाजता

मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा

 

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार दिलाय...29 सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे आमरण उपोषणाला सुरूवात करणारेत...मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केलाय...मनोज जरांगेंच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं...त्यानिमित्त अंतरवाली येथे गोदाकाठच्या 123 गावातील मराठा बांधवांची बैठक झाली...या बैठकीमध्ये मनोज जरांगे यांनी उपोषणाची घोषणा केली...तर उपस्थित आंदोलकांनी त्यांना उपोषण न करण्याची विनंती करत गोंधळ घातला...

29 Aug 2024, 16:42 वाजता

जुन्नर विधानसभेत सांगली पॅटर्न?

 

Junnar : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला असून, जुन्नर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक आहेत. तर महायुतीतही अनेकांची नाव चर्चेत आहेत. अशात काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी जुन्नरमधील काँग्रेसचे सत्यशील शेरकर मविआकडून जुन्नर विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले. विशेष म्हणजे काही दिवसांपासून शेरकर यांची शरद पवार पक्षाशी जवळीक वाढत आहे. त्यामुळे जुन्नर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शेरकर प्रबळ दावेदार मानले जातात. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Aug 2024, 15:43 वाजता

पुण्यात बनावट टेलिफोन एक्सचेंजवर छापा

 

Pune ATS : गणेशोत्सवाच्या पार्श्वभमीवर दहशतवादविरोधी पथकानं पुण्यात बनावट टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकलाय. या छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड सात सिम बॉक्स  वाय फाय आणि सिम्बॉक्स चालविण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना, लॅपटॉप सह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकानं जप्त केलाय. या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या 22 वर्ष तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Aug 2024, 13:39 वाजता

देशातील ऑनलाईन पासपोर्ट सेवा 5 दिवस बंद

 

Passport : देशभरातील ऑनलाईन पासपोर्ट सेवा 5 दिवसांसाठी बंद राहणार आहे... पासपोर्ट विभागाने याबाबत माहिती दिलीये.. तांत्रिक देखभालीमुळे पासपोर्ट सेवा पोर्टल आज रात्री 8 वाजल्यापासून ते 2 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत बंद राहणार आहे... या कालावधीत पासपोर्ट केंद्रांवर कोणत्याही नवीन पासपोर्ट दिले जाणार नाही. .. त्यामुळे जर तुम्हाला नवीन पासपोर्ट काढायचा असेल तर त्यासाठी 15 दिवस वाट पाहावी लागणार आहे...तसंच जर तुम्ही आधीच नवीन पासपोर्टसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला त्यासाठी 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान तारीख मिळाली असेल, तर ती देखील रद्द केली जाईल आणि वाढवली जाईल.

29 Aug 2024, 13:15 वाजता

'अत्याचार होऊ न देणे समाजाचे कर्तव्य', महिला अत्याचारामुळे राष्ट्रपती संतप्त

 

Draupadi Murmu : देशात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरुन राष्ट्रपती द्रौपती मुर्मू संतप्त झाल्यात... आता बस झालं असं म्हणत त्यांनी कोलकाता बलात्कार, हत्या प्रकणी त्यांनी परखड प्रतिक्रिया दिलीये... कोलकात्यामधील घटनेनं आपण भयभीत आणि हाताश झाल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिलीये.. महिलांवर अत्याचार करण्याची फोफावलेली विकृती आणि महिलांना कमी लेखण्याच्या मानसिकतेचा प्रतिकार करा असं आवाहन त्यांनी केलंय... सुसंस्कृत समाजात अत्याचाराला जागा नाही.. समाज म्हणून आपण कुठे चाललोय असा सवालही त्यांनी उपस्थीत केलाय.. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरुन खासदार संजय राऊतांनी टीका केलीये. राष्ट्रपतींना पश्चिम बंगालची चिंता आहे महाराष्ट्राची नाही असा टोला राऊतांनी लगावलाय तर राष्ट्रपती संपूर्ण देशाच्या आहेत त्यामुळे बदलापूरमधील घटनेबाबतही त्यांनी मत व्यक्त करायला हवं अशी टाका महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

29 Aug 2024, 12:49 वाजता

'शिवरायांच्या डाव्या डोळ्यावर खोप का?',अमोल मिटकरींचा सवाल

 

Amol Mitkari : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार्‍या कंत्राटदार जयदीप आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहेय.. महाराजांच्या डाव्या डोळ्यावर खोप आपटे यांनी जाणीवपूर्वक दाखवल्या आरोप यावेळी मिटकरींनी केला आहेय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-