Live Now

Mahavikas Aghadi Meeting : मविआ जागावाटपासंदर्भात सोमवारपासून चर्चा-सूत्र

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on AUGUST 30 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Mahavikas Aghadi Meeting : मविआ जागावाटपासंदर्भात सोमवारपासून चर्चा-सूत्र
30 August 2024 05:57 PM (IST)

मविआतील जागावाटप करताना मेरिटवर निर्णय घेतला जाणार-सूत्र...

मविआतील जागावाटप करताना मेरिटवर निर्णय घेतला जाणार-सूत्र

 

Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीतील जागा वाटपासंदर्भात सोमवारपासून चर्चेला सुरूवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.. तीनही पक्षाचे नेते जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं समजतंय.. तर जागावाटप करताना मेरिटवर निर्णय घेतला जाणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय... जागा वाटपाचा निर्णय राज्यातील नेतेच घेणार असल्याचीही माहिती समोर येतेय... तर जागा वाटपासंदर्भात दिल्लीत बैठक घेण्याची गरज पडणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

 

30 August 2024 04:39 PM (IST)

शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी मागितली जाहीर माफी...

शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी मागितली जाहीर माफी

 

PM Narendra Modi's Public Apology : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची तसंच शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली आहे... मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो आणि शिवरायांची पूजा करणाऱ्यांची देखील माफी मागतो. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफी मागितली आहे. सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच मोदींच्या हस्तेच डिसेंबर 2023 मध्ये उद्घाटन झालं होतं. मात्र 26 ऑगस्टला शिवाजी महाराजांचा हा पुतळा अचानक कोसळला होता. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. मात्र वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणात जाहीर माफी मागितली आहे... आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत असं म्हणत मोदींनी माफी मागितलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

30 August 2024 02:14 PM (IST)

पुतळा कोसळल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार,अजित पवारांची माहिती...

'पुतळा कोसळल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार',अजित पवारांची माहिती

 

Ajit Pawar : अजित पवार राजकोट किल्ल्याची पाहणी केलीय.. शिवरायांचा पुतळा कोसळ्याच्या दुर्घटनेची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून समजून घेतलीय.. दोषींना सोडणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय.. तसेच विरोधकांनी राजकारण करू नये असं आवाहनही त्यांनी केलंय... 

30 August 2024 01:34 PM (IST)

शरद पवारांनी Z+ सुरक्षा नाकारली...

शरद पवारांनी Z+ सुरक्षा नाकारली

 

Sharad Pawar : केंद्र सरकारनं दिलेली झेड प्लस सुरक्षा शरद पवारांनी नाकारलीये.. केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिल्यानंतर गृह मंत्रालयाचे अधिकारी दिल्ली इथं शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.. 15 अधिका-यांनी याबाबत शरद पवारांशी चर्चा केली.. मात्र त्यानंतर शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा घेण्यास नकार दिला..

30 August 2024 01:26 PM (IST)

कोल्हापुरातील गोकुळच्या सभेत राडा...

कोल्हापुरातील गोकुळच्या सभेत राडा

 

Kolhapur Gokul Sabha Rada : कोल्हापुरातील गोकुळच्या सभेत राडा..हाती पोस्टर घेऊन सदस्यांनी घातला गोंधळ....गोकुळच्या गेटवरच सदस्यांनी गर्दी केलीय... सभागृहात जाण्यासाठी मोठी गर्दी झालीय..त्यामुळे सभागृहात आता गोंधळ होताना दिसतंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 August 2024 01:13 PM (IST)

अजितदादा तिसरी आघाडी स्थापन करणार, आमदार रोहित पवारांचा दावा...

'अजितदादा तिसरी आघाडी स्थापन करणार', आमदार रोहित पवारांचा दावा

 

Rohit Pawar : मविआची मतं खाण्यासाठी राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा, रोहित पवार यांनी केलाय. या तिसऱ्या आघाडीत अजित पवार आणि मनसे हा पक्ष देखील असण्याची शक्यता आहे, असंही रोहित पवार यांनी दावा केलाय. 

30 August 2024 12:22 PM (IST)

झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकरांची काँग्रेसमधून हकालपट्टी...

झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकरांची काँग्रेसमधून हकालपट्टी

 

Nana Patole on Zeeshan Siddique  : आमदार झिशान सिद्दीकी आणि आमदार जितेश अंतापूरकर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ही माहिती दिलीय. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा अंतापूरकर यांच्यावर आरोप होता. ते भाजपमध्ये दाखल जाणार आहे.. तर झिशान सिद्दीक हे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 August 2024 12:09 PM (IST)

खेकड्यामुळे धरण फुटलं म्हणणारे काहीही बोलतात, मिटकरींची तानाजी...

'खेकड्यामुळे धरण फुटलं म्हणणारे काहीही बोलतात', मिटकरींची तानाजी सावंतांवर टीका

 

Amol Mitkari On Tanaji Sawant : तानाजी सावंत यांच्या टीकेला आता अमोल मिटकरींनी उत्तर दिलंय.. खेकड्यामुळे धरण फुटलं असं म्हणणारे मळमळ मंत्री सावंत असल्याची टीका त्यांनी केलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 August 2024 11:21 AM (IST)

संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात महिलेचा विनयभंग...

संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात महिलेचा विनयभंग

 

Sambhajinagar Ghati Hospital : संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय. एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या महिलेचा 25 ऑगस्टला कंत्राटी कर्मचा-याने विनयभंग केल्याचं समोर आलंय. महिलेच्या नातेवाईकांनी कर्मचा-याला चोपही दिला होता. मात्र, रुग्णआलय प्रशासनानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला. अखेर तीन दिवसांनंतर या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 August 2024 11:01 AM (IST)

भाजपची आज महत्त्वाची बैठक...

भाजपची आज महत्त्वाची बैठक

 

BJP :  महाराष्ट्र प्रदेश भाजपची आज महत्त्वाची बैठक होणाराय..देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप कोर कमिटीची बैठक होणार आहे.....संघाच्या पुढाकारानंतर भाजपच्या हालचालींना वेग आलाय....या बैठकीत मुंबईतील उमेदवारांच्या संदर्भात निश्चिती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. तसेच राज्यातील विभागांचा आढावा आणि भाजप नेत्यांच्या दौऱ्यांबाबत माहिती सुद्धा घेतली जाणार आहे..या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह सहप्रभारी अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह कोअर कमिटीचे महत्त्वाचे सदस्य उपस्थित राहणार आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 August 2024 10:39 AM (IST)

वर्षा गायकवाड राहत्या घरी स्थानबद्ध ...

वर्षा गायकवाड राहत्या घरी स्थानबद्ध 

 

Varsha Gaikwad : .. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौ-यादरम्यान काँग्रेसकडून आंदोलन करणार असल्यानं वर्षा गायकवाड यांना राहत्या घरी स्थानबद्ध करण्यात आलंय.. वर्षा गायकवाडांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त....कार्यकर्त्यांना भेटण्यास परवानगी नाही...एका कार्यकर्त्यालाही पोलिसांनी घेतलं ताब्यात

30 August 2024 10:18 AM (IST)

गोरेगावात भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू...

गोरेगावात भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

 

Mumbai Hit And Run Case : मुंबईच्या गोरेगावात हिट अँड रनची घटना घडलीये.. एका भरधाव कारनं दुचाकीस्वाराला चिरडलं.. या दुर्घटनेनंतर कार चालक घटनास्थळावरुन पळून गेला.. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं तिघांना अटक केलीये.. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय.. पोलिसांनी अपघातग्रस्त कारही जप्त केलीये.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 August 2024 09:54 AM (IST)

पुण्यातील मतदारांच्या संख्येत मोठी वाढ...

पुण्यातील मतदारांच्या संख्येत मोठी वाढ

 

Pune Voters Increased : पुण्यात मतदारांच्या संख्येत मोठी वाढ...दोन लाख सात हजारांपेक्षा अधिक मतदारांची वाढ झाली आहे....पुणे जिल्ह्याची मतदारसंख्या ८६ लाख ४७ हजारापर्यंतच पोहोचली आहे...यादीत महिलांपेक्षा पुरुष मतदारांची संख्या अधिक आढळली आहे....अंतिम मतदारयादी ही लवकरच जाहीर होणार आहे...पुणे जिल्ह्यात सहा ऑगस्टपासून राबविलेल्या मतदारनोंदणी अभियानादरम्यान झालेली मतदार नोंदणी आणि यापूर्वीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. 
 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 August 2024 09:10 AM (IST)

शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेत वैभव नाईकांचा हात तर नाही ना?निलेश राणेंचा...

'शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेत वैभव नाईकांचा हात तर नाही ना?'निलेश राणेंचा सवाल

 

Nilesh Rane on Shivaji Maharaj Statue Collapsed : भाजप नेते निलेश राणेंनी मालवण दुर्घटनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलंत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेत वैभव नाईकांचा हात तर नाही ना? असा सवाल निलेश राणेंनी केलाय.
 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

30 August 2024 08:38 AM (IST)

 मराठवाड्यात काँग्रेसला धक्का, जितेश अंतापूरकर आज भाजपात...

 मराठवाड्यात काँग्रेसला धक्का, जितेश अंतापूरकर आज भाजपात प्रवेश करणार

 

MLA Jitesh Antapurkar will join BJP : मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक धक्का...काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांचा आमदारकीचा राजीनामा... अंतापूरकर आज संध्याकाळी पाचच्या सुमारास भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती...विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा अंतापूरकर यांच्यावर आरोप...आमदार जितेश अंतापूरकर भाजप नेते अशोक चव्हाण यांचे समर्थक....अशोक चव्हाण, बसवराज पाटील, अर्चना चाकूरकर यांच्या पाठोपाठ मराठवाड्यातील आणखी एका नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 August 2024 08:11 AM (IST)

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज वाढवण बंदराचं भूमिपूजन ...

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज वाढवण बंदराचं भूमिपूजन 

 

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. मोदी आज पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन करणार आहेत. सुमारे 76 हजार कोटी रुपयांचा वाढवण बंदर प्रकल्प आहे. समुद्रात खोल पाण्यातील बंदरांपैकी वाढवण हे भारतातील सर्वात मोठं बंदर असणार आहे. यामुळे भारताचा सागरी संपर्क वाढणार असून, जागतिक व्यापार केंद्र म्हणून भारताची भूमिका अधिक सक्षम होणार आहे. वाढवण बंदर प्रकल्प भूमिपूजनासोबतच मोदी 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्य प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणीही करणार आहेत. तसंच ते मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024ला संबोधित करतील. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 August 2024 07:39 AM (IST)

मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी चेतन पाटीलला अटक...

मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी चेतन पाटीलला अटक

 

Malvan Shivaji Maharaj Statue collapse case : मालवणमधील शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणी चेतन पाटीलला अटक...चेतन पाटील पुतळ्याचे स्टक्चरल कन्सल्टंट...गुन्हा दाखल झाल्यापासून चेतन पाटील फरार...कोल्हापुरातून केली चेतन पाटील याला अटक

30 August 2024 07:34 AM (IST)

अजित पवार आज राजकोट किल्ल्याची पाहणी करणार...

अजित पवार आज राजकोट किल्ल्याची पाहणी करणार

 

Ajit Pawar : अजित पवार आज सकाळी राजकोट किल्ल्याची पाहणी करणार आहेत. महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर माफी मागितली होती.. त्यानंतर आज ते स्वतः या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत...उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल... चिपी विमानतळावरून राजकोट येथे रवाना..

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS: