Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on AUGUST 31 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Aug 31, 2024, 22:23 PM IST
twitter
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

31 Aug 2024, 22:22 वाजता

राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

 

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा कोर्टानं राज ठाकरेंविरोधात अटक वारंट जारी केलंय. 16 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात त्यांना वॉरंट बजावण्यात आलंय. 16 वर्षापूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या बसगाडीची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. त्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे राज ठाकरेंना निलंगा कोर्टात हजर रहावं लागणार आहे. काही वर्षांपूर्वी ते याच प्रकरणी निलंगा कोर्टात हजर झाले होते. 

31 Aug 2024, 20:08 वाजता

संघाच्या मैदानात दादा 'दक्ष'

 

Nagpur Ajit Pawar : नागपुरातून सर्वात मोठी बातमी समोर येतेय... संघाच्या मैदानात अजित पवार दक्ष असल्याचं समोर आलंय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतीभवनास भेट दिली... मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र तेथे जाणं टाळलंय... नागपूरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजी यांच्या समाधी स्थळाला भेट देत वंदन केलं...मात्र अजित पवारांनी समाधीस्थळाकडे जाणं टाळलंय... अजित पवारांना सोबत घेऊन भाजपाने स्वतःची किंमत केली, अशा प्रकारची टीका संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून करण्यात आली होती. त्यानंतर संघाशी संबंधित 'विवेक' साप्ताहिकांतूनही अजित पवारांवर टीका करण्यात आली होती. त्यामुळेच अजित पवार संघाच्या माजी प्रमुखांच्या समाधीस्थळावर न जाता थेट निघून गेले.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

31 Aug 2024, 19:34 वाजता

शिल्पकार जयदीप आपटेला कुणी पळवलं? - पृथ्वीराज चव्हाण

 

To The Point Prithviraj Chavan : शिवाजी महाराजांचा पुतळा साकारणा-या शिल्पकारावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक आरोप केलाय.. शिल्पकार जयदीप आपटेला कुणी पळवलं असा खळबळजनक आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाणांनी शिवरायांच्या पुतळ्याच्या शिल्पकाराबाबत हा मोठा आरोप केलाय.. शिवाजी महाराजांचा पुतळा साकारण्यासाठी जयदीप आपटेने 3 वर्ष मागितली होती. मात्र त्याला सहाच महिने का देण्यात आले.. असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

31 Aug 2024, 17:57 वाजता

शेतकऱ्यांसाठी आंदोलन पुकारणार - मनोज जरांगे

 

Solapur Manoj Jarange : राज्य सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत शेतक-यांना न्याय दिला पाहिजे, अन्यथा शेतक-यांसाठी राज्यभर आंदोलन पुकारणार, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय.. तर सर्व शेतक-यांनी विधानसभा निवडणुकीत सरकारला धडा शिकवण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय.. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे. त्यानंतर मुस्लीम, धनगर आणि शेतक-यांच्या प्रश्नावर मागे लागणार असल्याचंही जरांगेंनी म्हटलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

31 Aug 2024, 17:14 वाजता

हाकेंचं विसर्जन होणार नाही याची काळजी घ्या - अमोल मिटकरी

 

Amol Mithkari : गणेश चतुर्थीच्या आधीच गणेश हाके यांचं विसर्जन होणार नाही याची काळजी हाकेंनी घ्यावी असं प्रत्युत्तर अमोल मिटकरींनी दिलंय. त्यांना कवडीचीही किंमत देत नाही असंही मिटकरींनी म्हटलंय

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

31 Aug 2024, 14:03 वाजता

'पुन्हा बसून जागावाटपावर मार्ग काढू', अजित पवारांची माहिती

 

Ajit Pawar On Mahayuti Seats Sharaing : विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची पहिली फेरी संपली...पुन्हा एकदा बसून जागा वाटपावर मार्ग काढू....जागा वाटपांवर अजित पवारांची माहिती....पुढील फेरीत 288 जागांवर चर्चा होईल-अजित पवार

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

31 Aug 2024, 13:45 वाजता

पत्राचाळप्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीत वाढ?

 

Mumbai Patra Chawl Scam : पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.. पत्राचाळ जमीन घोटाळ्यातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केलेत.. पत्राचाळ प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप स्वप्ना पाटकरांनी केलाय.. याबाबत त्यांनी ईडीच्या अतिरिक्त संचालकांना एक पत्र लिहिलंय.. आपल्या जिवाला धोका असल्याचं त्यांनी या पत्रातून म्हटलंय.. त्यांच्या या पत्रामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

बातमीचा व्हिडीओ पाहा-

31 Aug 2024, 13:26 वाजता

'निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोदींनी माफी मागितली', संजय राऊतांची  टीका

 

Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी राजकीय माफी आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी मोदींवर टीका केलीय. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माफी मागितली. मोदींना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राविषयी प्रेम... आत्मियता नाही, असा आरोपही राऊतांनी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

31 Aug 2024, 12:44 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तानाजी सावंतांवर नाराज

 

CM Eknath Shinde on Tanaji Sawant : तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुख्यमंत्री नाराज झालेत.. 24तासांत दोन वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मंत्री तानाजी सावंत वादाच्या भोव-यात अडकलेत.. अजित पवारांच्या पक्षाबद्दल केलंल्या वक्तव्याचा वाद शमतो न शमतो तोच सावंत काल पुन्हा एका शेतक-यावर संतापले.. त्यामुळे शेतकरी वर्गातही नाराजी पसरलीये.. याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून मुख्यमंत्री तानाजी सावंतांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये

बातमीचा व्हिडीओ पाहा-

31 Aug 2024, 12:29 वाजता

'पुतळ्यावरून कुणीही राजकारण करू नये', उदयनराजेंचं प्रसिद्धीपत्रक जारी 

 

Udayanraje Bhosale on  Shivaji Maharaj Statue Collapsed : राजकोट येथील छत्रपाती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेप्रकरणी उदयनराजे भोसलेंनी प्रसिद्धिपत्रक जारी केलंय.. या दुर्घटनेचं कुणीही स्वताच्या लाभासाठी राजकीय भांडवल करु नये असं आवाहन त्यांनी या प्रसिद्धी पत्रातून केलंय..
कच्चे दुवे आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे हा पुतळा कोसळल्याचं त्यांनी म्हटलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-