17 Dec 2024, 22:46 वाजता
अखेर महायुतीचं खातेवाटप ठरलं- सूत्र
Mahayuti : बहुप्रतिक्षित महायुतीचं खातेवाटप अखेर निश्चित झाल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळतेय. विशेष म्हणजे यंदाच्या खातेवाटपात मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. शिवसेनेकडचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला दिलं जाणार आहे. तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं शिवसेनेला मिळणार आहे. अपेक्षेनुसार गृहखातं भाजपकडेच राहणार आहे. तर नगरविकास खातं शिवसेनेकडेच असणार आहे. त्याचवेळी अर्थखातं राष्ट्रवादीकडेच कायम असणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
17 Dec 2024, 22:09 वाजता
मुंबईतील सोमय्या कॉलेजमध्ये बोगस प्रवेश
Somaiya College : मुंबईतील के जे सोमया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये तब्बल 50 विद्यार्थ्यांनी बनावट मार्कशिट आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटच्या आधारे अकरावीमध्ये प्रवेश घेतल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांची सही आणि लोगो असलेल्या खोट्या मार्कशिटही तयार करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी कॉलेजच्या प्राचार्यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं असून, यामध्ये कॉलेजमधील 2 क्लार्कचाही समावेश आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून प्रवेशासाठी रोख रक्कम घेतल्याचं उघड झालंय.
17 Dec 2024, 21:44 वाजता
उद्या दुपारपर्यंत मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता- उदय सामंत
Uday Samant : उद्या दुपारपर्यंत मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता...मंत्री उदय सामंतांकडून खातेवाटपाबाबत संकेत... मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या खातेवाटप होण्याची शक्यता...'महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय होणार'..मंत्री उदय सामंतांची खातेवाटपाबाबत माहिती
बातमीचा व्हिडीओ पाहा-
17 Dec 2024, 20:31 वाजता
छगन भुजबळांची उद्या पत्रकार परिषद
Chhagan Bhujbal : मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाराज होत हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकमध्ये दाखल झालेत...उद्या भुजबळ पत्रकार परिषद घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत.. उद्या 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
17 Dec 2024, 20:16 वाजता
गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास शिक्षेची तरतूद, विधानसभेत विधेयक मंजूर
Devendra Fadnavis on Shivneri Fort : छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ फडणवीस सरकारनी मोठी घोषणा केलीये... शिवनेरी किल्ल्यावर सर्वात मोठा स्वराज्यध्वज लावला जाणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये.... गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास आता शिक्षेची तरतूद करण्यात आली असून एक लाख आणि तुरुंगवासाची शिक्षा असणार असल्याचं विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आलं आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
17 Dec 2024, 19:17 वाजता
मनीषा कायंदेंची विधानपरिषद मुख्य प्रतोदपदी नियुक्ती
Manisha Kayande : मनीषा कायंदेंची विधानपरिषद मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आलीये...कायंदे शिवसेना पक्षाच्या विधानपरिषद मुख्य प्रतोद...मनीषा कायंदेंची शिवसेना पक्षाकडून मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आलीये..
17 Dec 2024, 18:21 वाजता
वृक्षतोडी संदर्भातील विधेयकाला स्थगिती
Kokan : कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी... वृक्षतोडी संदर्भातील विधेयकाला स्थगिती देण्यात आलीये.. झाड तोडल्यानंतर होता 50 हजार रुपये दंड... एक झाड तोडल्यानंतर होणा-या दंडाला स्थगिती देण्यात आलीये...50 हजार रुपये दंडाची रक्कम कमी करण्याचा विचार.. मंत्री उदय सामंत यांची माहिती
बातमीचा व्हिडीओ पाहा-
17 Dec 2024, 17:15 वाजता
मुख्यमंत्री फडणवीस राहुल नार्वेकरांच्या भेटीला
CM Devendra Fadnavis meets Rahul Narvekar : मुख्यमंत्री फडणवीस नार्वेकरांच्या भेटीला...राहुल नार्वेकरांच्या दालनात फडणवीस, महाजन यांच्यात चर्चा
17 Dec 2024, 16:26 वाजता
दादा एकच वादा, शब्दप्रमाण काय कामाचे?- छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा थेट अजित पवारांवर निशाणा...दादा एकच वादा, हे शब्दप्रमाण काय कामाचे?-भुजबळ...उमेदवारी देताना अजितदादांनी मनमानी केली- भुजबळ...फडणवीसांनी सांगूनही अजितदादा ऐकले नाहीत... येवल्यात भुजबळांनी अजितदादांना सुनावलं
बातमीचा व्हिडीओ पाहा-
17 Dec 2024, 16:06 वाजता
वि.प.सभापतीसाठी राम शिंदेंचं नाव चर्चेत-सूत्र
Ram Shinde : वि.प.सभापतीसाठी राम शिंदेंचं नाव चर्चेत...राम शिदेंच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब-सूत्र