19 Dec 2024, 13:45 वाजता
अधिवेशनानंतर खातेवाटप होईल - जयंत पाटील
Jayant Patil On Khatevatap : खातेवाटप अधिवेशन झाल्यावरच होईल असं वाटतंय, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिलीय. महायुतीत खात्यांवरून चढाओढ असल्याचंही त्यांनी म्हटलंय
बातमीचा व्हिडीओ पाहा -
19 Dec 2024, 13:15 वाजता
मुंबईसाठी अनेकांनी बलिदान दिलं - अंबादास दानवे
Ambadas Danve On Laxman Savadi : मुंबईला केंद्रशासित राज्य करण्याच्या मागणीवर अंबादास दानवे यांनी तीव्र शब्दात आपली प्रतिक्रिया दिलीय. कोणाच्या मनगटात एवढा जोर नाही ,की मुंबईला केंद्रशासित करण्याची ,मुंबईसाठी अनेक लोकांनी बलिदान दिलंय असं दानवे म्हणालेत
19 Dec 2024, 12:40 वाजता
महाराष्ट्र सागरी मंडळाकडून प्रवासी बोटींची तपासणी
Mumbai Boat Security Checking : मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रातल्या दुर्घटनेनंतर यंत्रणांना खडबडून जाग आलीय. महाराष्ट्र सागरी मंडळ प्रवासी बोटींची कसून तपासणी करत आहे. नियमभंग केल्यास अथवा सुरक्षेसंदर्भात हलगर्जीपणा केल्यास परवाना रद्द इशारा करण्याचा मंडळानं दिला आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
19 Dec 2024, 12:37 वाजता
वसईत हिट अँड रनची घटना, 15 वर्षीय मुलीचा मृत्यू
Vasai Hit And Run : वसईतील पापडी गावात 15 वर्षीय विद्यार्थिनीचा भरधाव बाईकच्या धडकेत मृत्यू झालाय... शाळेतून घरी जात असताना भरधाव बाईकने मुलीला धडक दिली...ती गंभीर जखमी झाली. स्थानिक रहिवाशांनी तिला तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केलं... रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय... वसई पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.. पोलीस आरोपीचा शोध घेतायत.
19 Dec 2024, 12:32 वाजता
लक्ष्मण सवदींनी माफी मागावी - सचिन अहिर
Sachin Ahir On Laxman Savadi : सचिन अहिर यांनी लक्ष्मण सवदींच्या वक्तव्याचा निषेध केलाय.. लक्ष्मण सवदींनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केलीये. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले..
19 Dec 2024, 12:16 वाजता
विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे विराजमान
Nagpur Ram Shinde : विधानपरिषदेच्या सभापतीपदी भाजपचे आमदार राम शिंदे यांची निवड झाली. सभागृहात एकमताने राम शिंदे यांची निवड करण्यात आली... यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे आभार मानले..
19 Dec 2024, 12:01 वाजता
मुंबईत केंद्रशासित करण्याची मागणी पोरकटपणाची - जयंत पाटील
Nagpur Jayant Patil : मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी पोरकटपणाची असल्याचं जयंत पाटील म्हणालेत.. बेळगाव केंद्र शासित करावं असा पलटवार जयंत पाटील यांनी केलाय.. बेळगाव केंद्रशासित करून नंतर ते महाराष्ट्रात सामील करावा अशी मागणी जयंत पाटलांनी केलीय..
19 Dec 2024, 11:56 वाजता
कर्नाटक काँग्रेस आमदाराची महाराष्ट्र तोडण्याची भाषा
Karnatak Congress MLA : बेळगावला केंद्रशासित प्रदेश करायचं असेल तर मुंबईला सुद्धा केंद्रशासित प्रदेश करा.. अशी वादग्रस्त मागणी कर्नाटकचे काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी कर्नाटक विधानसभेत केलीये.. यासाठी केंद्राकडे प्रस्ताव देखील पाठवण्याची मागणी त्यांनी केलीये..
19 Dec 2024, 11:23 वाजता
जळगावमध्ये कृषी केंद्राला भीषण आग
Jalgaon Fire : जळगावच्या पाचोरामध्ये नगरपालिकेसमोरच्या कृषी केंद्राला भीषण आग लागलीय.. आगीने रौद्ररूप धारण केल्याने कृषी केंद्राशेजारील 2 दुकानांचंह नुकसान झालंय...तर कृषी केंद्रातील बियाणे, कीटकनाशके जळून खाक झालेत..सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीय.. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
19 Dec 2024, 11:13 वाजता
कर्नाटक सरकराची आरेरावी वाढली - शंभुराज देसाई
Nagpur Shambhuraj Desai : कर्नाटक सरकारची आरेरावी सुरू आहे.. बेळगाव प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकारनं प्रयत्न केला.. त्यासाठी मंत्र्यांची समन्वय समितीही नेमण्यात आल्याचं शंभूराज देसाई म्हणालेत.. बेळगावातील साडेआठशे गावातील लोकांना महाराष्ट्रात याचचं असल्याचं शंभुराज देसाई म्हणालेत..