Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 28 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas on Prajakta Mali : भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळींसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद पेटलाय. अभिनेत्री प्राजक्ता यांनी धस यांच्याविरोधात महिला आयोगात धाव घेतली आहे. धस यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी माझी जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्राजक्तानं केलीय. सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी समस्त महिलांचा अपमान केल्याचा आरोपही प्राजक्ता माळीनं केलाय.
मात्र आपण प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नसल्याचं प्रत्युत्तर आमदार सुरेश धस यांनी दिलंय. आपण काहीच आक्षेपार्ह बोललो नसल्याचा दावा धस यांनी केलाय. इतकंच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही धस यांनी केलाय.बातमीचा व्हिडीओ पाहा -
सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी- प्राजक्ता माळी
Prajakta Mali on Suresh Dhas : भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील कार्यक्रमांबाबत आणि इव्हेंट पॉलिटिक्सबाबत केलेल्या विधानाचा अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी निषेध केलाय...तसेच सुरेश धस यांनी यबाबात माफी मागण्याची मागणी देखील प्राजक्ता माळी यांनी केलाय....मात्र प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नसल्याचं आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय...बीड प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप धस यांनी केलाय.
भाजप आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यामुळे माझी बदनामी झालीय. यामुळे धस यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केलीय. तर याबाबत आपण महिला आयोगाकडे तक्रार केल्याचंही प्राजक्ता माळी यांनी म्हटलंय.बातमीचा व्हिडीओ पाहा -
मुंबईत अभिनेत्री उर्मिला कोठारेंच्या कारचा अपघात
Urmila Kothare Car Accident : शूटिंगवरून परतताना मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या कारचा अपघात झाला. मुंबईच्या कांदिवलीमधली ही घटना आहे. उर्मिला कोठारे यांची गाडी चालक चालवत होता. त्यानं दोन मजुरांना उडवलं, यात एकाचा मृत्यू झालाय, तर एक गंभीर जखमी आहे.. उर्मिला कोठारे आणि त्यांचा चालकही या अपघातात जखमी झालेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा- मनोज जरांगे
Beed Manoj Jarange : संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केलीये...आरोपींना अटक करता येत नसेल तर मंत्र्यांच्या कुटुंबालाही पकडून आत टाकण्याची मागणीही मनोज जरांगे यांनी केलीये.. बीडमध्ये साप पोसू नका, पोसलं तर चरबी उतरू असं विधान मनोज जरांगे यांनी केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मतदारांना धमकावून मतं मिळवली- धस यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
Beed Suresh Dhas : सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मूकमोर्चा काढण्यात आला....यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचं मताधिक्य बोगस आहे असं म्हणत धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.. मतदारांना धमकावून मतं मिळवली.. असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर केलाय.. धनंजय मुंडे बोगस मतांनी निवडून आले असल्याचं विधान धस यांनी केलंय तर संतोष देशमुखांच्या घरी का नाही गेल्या?.. सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंना सवाल.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
Dr. Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आज अनंतात विलीन झालेत. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दिल्लीतल्या शासकीय इतमामात निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार झालेत. यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांचा शेवटचा निरोप घेण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि किरेन रिजिजू या भाजपच्या नेत्यांनी त्यांचा अखेरचा निरोप घेतला. तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.
वर्ध्यात हिट अँड रनची घटना, दुचाकीस्वाराचा मृत्यू
Wardha Hit And Run : वर्ध्यातील तळेगाव-श्यामजी पंत इथं भरधाव डंपरनं दुचाकीला धडक दिलीये.. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय तर एकजण गंभीर जखमी झालाय.. यातील डंपरचालक दारुच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.
राजगुरुनगरमध्ये कडकडीत बंद
Rajgaurnagar Band : राजगुरुनगर शहरात आज कडकडीत बंद पुकारण्यात आलाय.. शहरात दोन चिमुकल्यांवर अत्याचार करुन त्यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलाय.. शहरातील सर्व शाळा, कॉलेजेसलाही सुट्टी देण्यात आलीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
संतोष देशमुख हत्येप्रकरणी अंजली दमानियांचा गौप्यस्फोट
Anjali Damaniya : संतोष देशमुख हत्येप्रकरणी अंजिल दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. तीनही प्रमुख आरोपीचा खून झालाय, असा निनावी फोन आल्याचा दावा दमानिया यांनी केलाय. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे, शरद पवारांवरही टीका केलीय. वाल्मिक कराड कोण आहे? हे शरद पवार, धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांना माहितेय, असंही दमानिया यांनी म्हटलंय.
साकिनाका भागात गोदामांना आग
Mumbai Sakinaka Fire : मुंबईतील साकिनाका भागात गोदामांना भीषण आग लागलीये.. दोन गोदामं या आगीच्या विळख्यात सापडलीत.. खैराणी रोड-साकिनाका परिसरात ही आग लागलीये.. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.. हा झोपडपट्टीचा भाग असल्यानं आग विझवण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.. सुदैवानं या आगीत कोणतिही जीवितहानी झालेली नाहीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Sanjay Raut On BJP : भाजपचं अॅक्शन मोड म्हणजे EVM ताब्यात घेणं... पैसे जमा करणे, असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी भाजपवर केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची खरी ताकद कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर निवडणुका लढवणार, असं राऊतांनी म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
अमरावतीला अवकाळी पावसानं झोडपलं
Amravati Rain : अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.. या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडाली. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने हरभरा, गहू, तूर, कापूस पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. या अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडलाय.. दरम्यान पुढील 2 दिवस हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला असून शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
नाशिकच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा कहर
Nashik Rain : नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्री अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.. निफाड, पिंपळगाव भागात दमदार पाऊस झाला.. मनमाड शहर परिसरात सोबत येवला तालुक्यातील अनेक भागाला जोरदार पावसाने झोडपून काढलं... या भागात ऐन हिवाळ्यात पावसाळ्यासारखा पाऊस कोसळला.. या अवकाळी पावसाचा फटका रब्बीच्या हंगामातील सर्वच पिकांना बसणार असून द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतक-यांचीही चिंता वाढलीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
बीडमध्ये आज मूकमोर्चाचं आयोजन
Beed Protest : संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज आरोपींना अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज मूक मोर्चा आयोजन करण्यात आलेला आहे सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी या मोर्चाची हाक दिलेले आहे या मोर्चाला अनेक नेत्यांची देखील उपस्थिती असणार आहे बीड जिल्ह्यातील आजी-माजी आमदार आणि मंत्र्यांसह महाराष्ट्रातील अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालया वरती धडकणार आहे सकाळी 11 च्या दरम्यान या मोर्चाला सुरुवात होईल
बातमीचा व्हिडीओ पाहा -
डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
Dr. Manmohan Singh Funeral : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहे.. दिल्लीतील निगमबोध घाट इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.. सकाळी साडे आठ ते साडे दहा वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे.. सकाळी साडे दहा वाजेनंतर त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर दिल्लीतील निगमबोध घाट इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.. शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -