Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 28 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

28 Dec 2024, 09:51 वाजता

खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

 

Sanjay Raut On BJP : भाजपचं अ‍ॅक्शन मोड म्हणजे EVM ताब्यात घेणं... पैसे जमा करणे, असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी भाजपवर केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची खरी ताकद कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर निवडणुका लढवणार, असं राऊतांनी म्हटलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Dec 2024, 09:10 वाजता

अमरावतीला अवकाळी पावसानं झोडपलं

 

Amravati Rain : अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.. या पावसामुळे  शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडाली. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने हरभरा, गहू, तूर, कापूस पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. या अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडलाय.. दरम्यान पुढील 2 दिवस हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला असून शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Dec 2024, 09:06 वाजता

नाशिकच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा कहर

 

Nashik Rain : नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्री अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.. निफाड, पिंपळगाव भागात दमदार पाऊस झाला.. मनमाड शहर परिसरात सोबत येवला तालुक्यातील अनेक भागाला जोरदार पावसाने झोडपून काढलं... या भागात ऐन हिवाळ्यात पावसाळ्यासारखा पाऊस कोसळला.. या अवकाळी पावसाचा फटका रब्बीच्या हंगामातील सर्वच पिकांना बसणार असून द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतक-यांचीही चिंता वाढलीये..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Dec 2024, 08:36 वाजता

बीडमध्ये आज मूकमोर्चाचं आयोजन

 

Beed Protest : संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज आरोपींना अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज मूक मोर्चा आयोजन करण्यात आलेला आहे सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी या मोर्चाची हाक दिलेले आहे या मोर्चाला अनेक नेत्यांची देखील उपस्थिती असणार आहे बीड जिल्ह्यातील आजी-माजी आमदार आणि मंत्र्यांसह महाराष्ट्रातील अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालया वरती धडकणार आहे सकाळी 11 च्या दरम्यान या मोर्चाला सुरुवात होईल

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Dec 2024, 07:39 वाजता

डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

 

Dr. Manmohan Singh Funeral : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहे.. दिल्लीतील निगमबोध घाट इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.. सकाळी साडे आठ ते साडे दहा वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे.. सकाळी साडे दहा वाजेनंतर त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर दिल्लीतील निगमबोध घाट इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे..  शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -